Showing posts with label मराठा सेवा संघ. Show all posts
Showing posts with label मराठा सेवा संघ. Show all posts

15 May 2017

आदर्श समाजासाठी मराठा आचारसंहिता

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढाकाराने काही दिवसापुर्वी मराठा आमसभा संपन्न झाली. मराठा मोर्च्यामध्ये मराठा समाज एकत्र आला आणि मराठा समाजाच्या ज्वलंत समस्या विषयी संशोधन सुरु झाले. अशा वेळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजन करण्यासाठी आदर्श आचार संहितेची गरज असल्याचे स्पष्ट झाले; त्यामुळे अनिष्ट रुढी-परंपरात अडकलेल्या मराठा समाजाला बाहेर काढण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर येथे मराठा महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मराठा समाजाची आदर्श आचारसंहिता बनवण्यात आली आहे. परंतु अनिष्ट रुढी-परंपरात आणि जातीच्या व्रुथा अभिमानात अडकलेला आणि त्या कालबाह्य परंपरेलाच प्रतिष्ठा मानणारा मराठा समाज या आदर्श आचारसंहिताचे पालन कितपत करतो हे सांगणे कठीण आहे. अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी - परंपरात तथा हुंडाबळी सारख्या समस्या मराठा समाजाबरोबर इतर समाजातचही मोठ्या प्रमाणात आहेत. पण मराठा समाज हा सगळ्यात मोठा असल्याने त्या समाजातील त्रुटी लगेच द्रुष्टीस पडतात हे सत्य असले तर जातीचा व्रुथा अभिमान बाळगण्यात मराठा समाज नेहमीच अग्रेसर असतो हे शास्वत सत्य आहे. जातीचा अभिमान वाईट नाही पण व्रुथा अभिमान समाजाच्या सर्वांगिण विकासामध्ये अडथळा ठरतो. मराठा समाज जातीच्या व्रुथा अभिमानामध्ये एवढा गुरफ़टलेला आहे की कोणीही केवळ जातीच्या नावाने मराठा समाजाचा स्वत:च्या हितासाठी वापर करू शकतो. यातून प्रथमत: मराठ्यांनी स्वत:ची सूटका करवून घेतली पाहिजे.
           राजकारण आणि मराठा समाजाचे अतुट नाते बनलेले आहे. राजकारण संकल्पना केवळ मराठ्यांना द्रुष्टी समोर ठेवूनच उदयास आली आहे की काय असे वाटावे इतके अतुट नाते. राजकारणामुळे मराठा समाजाचे खुप नुकसान झालेले आहे. शिवाजी महाराजांच नाव घेऊन राजकारण्यांनी आणि धर्मवाद्यांनी मराठा तरुणांचा खुप वापर केला. त्यामुळे चांगलं शिक्षण घॆऊन नोकरी - व्यवसाय करण्याच्या वयात राजकीय पक्षासाठी आणि धर्मासाठी रस्त्यावर उतरुन दंगा करण्यात जास्त वेळ घालवणे हे मराठा तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे आजपर्यंत. पण राजकारण काय नी धर्मवाद काय दोन्हीमुळे मराठ्यांचे केवळ नुकसान झाले आहे. मराठा समाजाला ना राजकारणाने काही दिले ना धर्माने. धर्मवाद्यांनी केवळ देव-धर्मासाठी मराठ्यांच्या शक्तीचा केवळ वापर केला परंतू मराठा समाजाच्या समस्येकडे कायमच साफ़ दुर्लक्ष केले. त्यामुळे आता मराठा समाजाने आत्मपरिक्षण केले पाहिजे. कायम देणंच माहीत असणार्या मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ येणे ही बाब मराठ्यांसाठी शोभणीय नाही. महाराष्ट्राला कायम भरभरून देणार्या समाजाची आज ही अवस्था का झाली याची कारणे मराठा समाजाने शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांगीण विकासासाठी पहिली वाटचाल म्हणुन मराठ्यांनी प्रथमत: धार्मिक गुलामी झुगारून सुरुवात केली पाहिजे. अतिधार्मिकता मराठ्यांच्या प्रगतीमध्ये मोठा अडथळा बनली आहे. म्हणूनच आज कितीही गरीबीत असला तरी मराठा समाज कर्ज काढून धार्मिक सण - उत्सव तथा विधी करत असतो हे थांबवणे किंवा याचे प्रमाण कमी करणे अत्यंत गरजचे आहे, तरच मराठा समाजामध्ये सुधारणा शक्य आहे.
शहाण्णव कुळीचा बाऊ नको, बुवाबाजी हाकला : अखिल भारतीय मराठा महासंघ
         अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी - परंपरात गुरफ़ट जाणार्या मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नती आणि विकासासाठी महासंघाने आमसभेमध्ये  मराठा समाजासाठी आदर्श आचार संहिता निर्माण केली. त्यामध्ये बुवाबाजीला थारा नको, घरोघरी महाप्रसादाची प्रथा नको, विवाह ठरवताना शहाण्णव कुळीचा बाऊ नको, की अनाठायी खर्च नको, मराठा संस्कृती टिकविण्यासाठी समाजाने पुढाकार घेऊन मराठा समाजाचा विकास घडवावा,  असे आवाहन करण्यात आले.
आदर्श मराठा समाज घडवण्यासाठीची आचारसंहिता अशी
          वास्तुशांती, लग्नकार्य समारंभ इत्यादी कार्यक्रमामध्ये छ.शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करणे.  मराठा संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे व समाजावर संस्कार करणे. समाजाच्या पूर्वजांची व वीरतेची कुलदैवते, कुलस्वामीनी (उदा. जोतिबा, खंडोबा, तुळजाभवानी) यांची मनोभावे पूजा व्हावी. या दैवतांमध्ये अनावश्‍यक वाढ होऊ नये. बुवाबाजीला थारा नको. घरोघरी महाप्रसादाची प्रथा नको.
          शहाण्णव कुळी समाजाची संभ्रमावस्था आहे. यात विभागणी होऊ नये. सर्व एकच आहोत, ही भावना वाढीस लावावी. यासाठी संशोधकांची मदत घ्यावी. विवाह ठरवताना शहाण्णव कुळीचा बाऊ करू नये. कर्तृत्त्वाला महत्त्व द्या. जन्मकुंडलीचा सांगोपांग विचार करून कालबाह्य रूढी झुगारून द्या व विज्ञानाची कास धरून रक्तगट तपासणी व्हावी. विवाहापूर्वी एच. आय. व्ही. च्या तपासणीला हरकत नाही.
विवाहातील बडेजाव व अट्टहास - 1) मुहूर्तमेढ - आंब्याच्या फांदीऐवजी कुंडीतील आंब्याचे कलमी रोप वापरावे.  2) आहेर - खोट्या प्रतिष्ठेपायी 100 ते 500 व्यक्तींपर्यंत आहेर करण्याची प्रथा बंद करावी, असा एकमुखी निर्णय. 3) काव्याक्षतांची नासाडी थांबवावी. 4) लग्न कार्यातील वधू-वरांना उचलण्याचा अट्टहास, काव्याक्षता फेकाफेकी व वरातीत डॉल्बी व दारूच्या वापराने तंटे होतात. त्यामुळे वरातीसारख्या पद्धती बंद व्हाव्यात. 5) अनाठायी खर्च टाळावा. 6) हुंडा व सोन्याच्या मोहापायी कर्जबाजारी होऊन होणारे अनर्थ टाळूया. 7) सामुदायिक विवाह पद्धतींना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करणे.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनावश्‍यक रूढींचे प्रदर्शन थांबवावे. 1) बारा दिवसांचा दुखवटा काळ कमी करणे (पाच ते सात दिवस). 2) एक कलश रक्षा नदीमध्ये विसर्जित करावी व बाकी रक्षाकुंडात विसर्जित करावी किंवा शेतीमध्ये विसर्जन करून प्रिय व्यक्तीच्या स्मृती जागृत ठेवाव्यात. 3) रक्षा विसर्जनानंतर नैवेद्य रूपाने होणारी अन्नाची नासाडी टाळावी. घरच्या व्यक्तींनीच मृत व्यक्तीच्या आवडीचा पदार्थ ठेवण्यास हरकत नाही.  4) कालानुरूप वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन सकाळी नऊ ते दहाच्या आत रक्षा विसर्जन होण्यासाठी दक्ष राहावे.  कारण व्यावसायिक व नोकरदार यांना सोयीचे होईल. 6) दिवसकार्याप्रसंगी भेटवस्तू (भांडी) वाटप बंद करावे. 7) दिवस कार्यानंतर पै-पाहुण्यांकडून नव्याने येऊ घातलेली मटण भोजनाची प्रथा पूर्णपणे बंद करावी. 8) वास्तुशास्त्र-घर बांधणीमध्ये हवा, प्रकाश या पुरताच हा विषय मर्यादित ठेवावा. यामध्ये थोतांड करणाऱ्यांना आळा घालून जरब बसविणे. वास्तुशांती छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने करावी. 9) प्रत्येक गोष्टीची विज्ञानाच्या दृष्टिकोनातून चिकित्सा करावी. 10) मुलगा-मुलगी भेद नको. दोघांना समान वागणूक द्यावी. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी मराठा समाजाने प्रयत्न करणे. 11) गावच्या जत्रा, माही पूर्वीप्रमाणे आप्तांच्या पुरत्याच मर्यादित ठेवाव्यात. कर्ज काढून मोठ्या प्रमाणात भोजनावेळी बंदी व्हाव्यात. यामध्ये दारूचा वापर थांबवावा.
          मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मराठा आमसभेमध्ये ठरवलेल्या आचारसंहितेशिवाय पर्याय नाही. आदर्श आचारसंहिता मराठा समाजाबरोबरच इतर समाजासाठीही तेवढीच महत्वाची आहे. प्रबोधन हे केवळ बोलण्या - लिहिण्यापुरतेच राहू नये त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जन्म संगोपनाने विचार करुन कालबाह्य रुढी झुगारुन दिल्या पाहिजेत. मराठा समाजातील गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक तथा वैद्यकिय मदत तसेच निराधारांना विविध प्रकारचे सहकार्य करणे हे मराठा समाजासाठी आद्यकर्तव्य आहे त्याचे पालन झाले पाहिजे.केवळ मोठ्या संख्येने एकत्र न येता एकमेकांच्या मदतीसाठीही मराठा समाजने हिंदुत्ववाद, बहुजनवाद असले वाद बाजुला सारून केवळ एक मराठा म्हनून एकत्र आले पाहिजे आपल्या मराठा समाजासाठी. आज समता-समानता म्हनूण कितीही ओरडले तरी मराठ्यांनी आपल्या जातीसाठी मराठा म्हणून एकत्र यावे आणि आपल्या समाजाच्या कल्याणासाठी वचनबद्ध व्हावे हिच काळाची गरज आहे. मराठा आमसभेमध्ये ठरवल्या गेलेल्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करुन मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आदर्श समाज व्यवस्थेच्या नवनिर्माणासाठी कृती करावी.
जय शिवराय जयोस्तु मराठा जय महाराष्ट्र

13 April 2014

इतिहासावरील विषाणू दाखवणारा लेखक

             आपल्या देशाचा इतिहास म्हणजे गुलामगिरीचा इतिहास होय. हिंदुस्तान आणि महाराष्ट्राचा विचार केला तर बाहेरून आलेल्या आर्यांच्या टोळ्यांनी इथल्या मुळ रहिवाशी महारट्ठ यांना जिंकुन इथला मुळ इतिहास मिटवण्याचे काम या टोळ्यांनी केले. राजमाता जिजाऊ, विश्ववंद्य शिवराय यांनी गुलामगिरीचा इतिहास बदलला आणि स्वराज्याची स्थापना केली.नंतर फ़ुले, शाहू, आंबेडकरांनी [यामध्ये केळुस्कर गुरुजी आणि जवळकर यांचेही मोलाचे योगदान आहे.] आपल्या इतिहासात घुसखोरी करणार्या विषाणूंना नष्ट केले व स्वत: इतिहास समोर आणला. परंतू [अजुनही] आपल्या इतिहासात विषाणू लपून बसले आहेत हे विषाणू दाखविण्याचे काम डॉ.बालाजी जाधव हे करीत आहेत.
डॉ.बालाजी जाधव समिक्षक, विचारवंत आणि नव्या पिढीचे लेखक आहे. मराठा सेवा संघाची मराठवाडा विभागाची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. महाराष्ट्रभर त्यांचे व्याख्यानाचे कार्यक्रम होत असतात. त्यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. शिवाय ते उच्चशिक्षित बी. एच. एम. एस डॉक्टर आहेत. सध्या एम. डी. चेही शिक्षण चालू आहे. तरूण वयात अल्पावधीतच त्यांनी हे यश प्राप्त केलं आहे. समाजसेवेचे व्रुत्त घॆऊन ते काम करत आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी मराठ्यांना संघटीत होण्याचे आवाहन केले आहे. त्यांची घेतलेली ही मुलाखत.
खंरत्नाकर डागळे : आपण लेखक म्हणून परिचीत आहात त्याच बरोबर मराठा सेवा संघाचे कार्य ही चालू आहे. या विचाराकडे आपण कसे वळलात ?
डॉ.जाधव साहेब : तसा मी कट्टर शिवसैनिक होतो. घरातही हिंदुत्ववादी वातावरण. माझ्या घरात बाळासाहेब ठाकरे यांचे फ़ोटो असायचे. सामना या दैनिकातील कात्रणं मी काढून ठेवत. ते आजही माझ्याकडे आहेत.मी कट्टर हिंदुत्ववादी होतो.आज अगदी या विरोधी आहे.
रत्नाकर खंडागळे : मग परिवर्तनवादी विचाराकडे कसे ?
डॉ.जाधव साहेब : मी प्रथम कट्टर हिंदुत्ववादी होतो. मी कुणाचेही काही ऐकत नव्हतो. माझ्या भावांनी मला एकदा प्रश्न केला की, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध का झाला ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. त्यांनी दुसरा प्रश्न केला की, तुकाराम महाराज वैकुंठी गेले की त्यांच्या खून झाला ? याही प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. मात्र भावाने असे प्रश्न केल्याने मी मात्र भावावर खवळलोच तेंव्हा भावाने मला आ.ह.साळूंके यांचे विद्रोही तुकाराम, मा.म.देशमुख यांचे रामदास पेशवाई आणि गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचण्यास सांगितले. दुसरा प्रसंग असा घडला की, मी लातुरला १२ वी इंटरशीपला असतांना माझा मित्र भोसले मला मा.म.देशमुख यांच्या केडर कॅंपला घेऊन गेला होता. तेंव्हा मला त्यांचे विचार आवडले आणि डोळ्यावरची हिंदुत्ववादाची झाडप गळून पडली. आपणही समाजासाठी काहीतरी करावं असं ठरवलं. त्यावेळेस मा.म.देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी शिक्षण विचारलं, मी १२ वी इंटरशिपला असल्यामुळे त्यांनी नंतर या तुमचं समाजासाठी काम करण्याचं वय नाही असे सांगितले. ही आपलेपणाची भावना मला पटली कारण असे कोणीही सांगत नाही तेंव्हा पासून मी या चळवळीत कार्य करायचं ठरवलं व त्याप्रमाणे मी कार्य करत आहे.
रत्नाकर खंडागळे : आपण लिखानाकडे कसे वळलात ? 
डॉ.जाधव साहेब : मराठा सेवा संघाचे किर्तन ऐकले व जेम्स लेन हे प्रकरण झालं तेंव्हा अक्षरशा मी रडलो. यावेळेस मी या विषयावर अनेक पुस्तकं वाचली यावरच मी माझ्या शैलीत एक प्रकरण लिहिले या प्रकारे मी लेखनाकडे वळलो. एक द्रुष्टी मिळाली ओळीचा मतिअर्थ समजला.
रत्नाकर खंडागळे : आपले पहिले पुस्तक कोणते ? काही अडचणी आल्या का ?
डॉ.जाधव साहेब : रामदासी पेशवे शिवाजी महाराजांवर शिंतौडे उडवत होते. तेंव्हा मराठा हा झोपलेलाच होता त्यांना जागे करण्यासाठी मराठ्यांनो षंड झालात काय ? हे पहिले पुस्तक लिहिले.अडचण म्हणजे हे पुस्तक छापायला कोणी प्रकाशक तयार नव्हता. मुद्रकही छापायला तयार नव्हता. तेंव्हा नाव न टाकण्याच्या अटीवर एक मुद्रक तयार झाला व मी ही आईच्या नावाने पंचफ़ुला प्रकाशन मार्फ़त पहिले पुस्तक छापले. ह्या पुस्तकाची दोन वर्षात १५००० प्रति विकल्या गेल्या. काही पुस्तके तर आमच्या बौद्ध बांधवांनी स्वत: वाटली.७ हजार पुस्तके जिजाऊ स्रुष्टीवर दोन तासात विकल्या गेली या पुस्तकाच्या सात आव्रुत्या आहेत.
रत्नाकर खंडागळे : आगामी कुठलं पुस्तक येतय ? किती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.
डॉ.जाधव साहेब : सध्या खेडेकर साहेबांच्या जिजाऊ कहे शिवबासे या पुस्तकाचे अनुवाद चालू आहेत. त्याच वाघ्या कुत्र्यावर ही पुस्तक येतय. माझी पाच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये मराठ्यांनो षंड झालात काय ?, नाठाळांच्या काठी हानू माथा,ब्राह्मणांना का झोडपू नये, जेम्स लेन पुस्तकातील ब्रह्मराक्षस हे पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
रत्नाकर खंडागळे : शिवधर्माबद्दल थोडं सांगा.
डॉ.जाधव साहेब : शिवधर्म म्हणजे एक जाती अंताची चळवळ आहे. इथला बहुजन समाज अठरा पगड जातीत विभागला आहे.त्यांना स्वत:ची ओळख नाही. त्यांना ओळख देण्याचे काम आम्ही करतो. बौद्ध धर्म आणि शिवधर्माच्या माध्यमातून आम्ही जाती अंताचा लढा लढतोय.
रत्नाकर खंडागळे : मराठा आरक्षणा बाबत काय मत आहे ?
डॉ.जाधव साहेब : मराठा समाज हा शिक्षणापासून दुर आहे.आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब देशमुख यांनी दिले आहे. सामाजिक,शैक्षणिक आणि मागासलेपण दुर करण्यासाठी दिले आहे. परंतू कुणबी आणि मराठा असा भेद करून ते नाकारले गेले आहे. त्यासाठी आम्ही लढत आहोत. ओबीसी ला आमचा विरोध नाही ते आमचे बंधुच आहेत.वैदिक विरुद्ध अवैदिक असा हा लढा आहे.
रत्नाकर खंडागळे : तरुणांना काय संदेश द्याल ?
डॉ.जाधव साहेब : मराठा तरुणांमध्ये एक दुर्गुण आहे ते एकमेकांच्या जवळ येत नाहीत. जेम्स लेन प्रकरणात ब्राह्मण समाज एक झाला परंतू आमचा मराठा समाज एक होत नाही. त्यांच्या अहंमपणाची भावना आहे.
ही भावना टाकून आज तरुणांनी संघटित व्हावे. आज विचार, देवान-घॆवान करणं महत्वाचं आहे. मोठा भाऊ म्हणून काम करावं तेंव्हा इतिहास सांगण्याचा व शिकवण्याचा अधिकार राहिल.
मुलाखत : रत्नाकर खंडागळे

16 January 2014

मराठा सेवा संघ बदलतो आहे?

             सिंदखेडराजाला १२ जानेवारीला होणारा मराठा सेवा संघाचा जिजाऊ महोत्सव. या सार्‍या उत्सवांना लाखोंची गर्दी असते. हे उत्सव आयोजित करणार्‍या संस्था, संघटना या महाराष्ट्राचे राजकारण व समाजकारणावर निर्णायक प्रभाव टाकणार्‍या असल्याने स्वाभाविकच या उत्सवांमध्ये कुठले निर्णय होतात, कार्यकर्त्यांना कुठली दिशा दिली जाते, याकडे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबतच माध्यमांचंही बारकाईने लक्ष असतं.
महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्‍याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा उत्सव आणि
         या संघटनांमध्ये मराठा सेवा संघ ही तुलनेने नवी संघटना. मात्र केवळ २४ वर्षांच्या कालावधीत या संघटनेने सार्‍याच क्षेत्रातील दिग्गजांना दखल घेणे भाग पडावे, असे आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच जिजाऊ महोत्सवात काय निर्णय होतात, याबाबत सार्‍यांनाच उत्सुकता असते. मराठा सेवा संघाबद्दल त्यांचे टीकाकार, विश्लेषक काहीही म्हणो, मात्र महाराष्ट्राच्या समाजजीवनात त्यांनी घडविलेले काही बदल कोणालाच नाकारता येणार नाही. मराठा सेवा संघाचं सर्वात मोठं कुठलं योगदान असेल, तर हजारो वर्षे चुकीच्या रूढी-परंपरा आणि कर्मकांडांचा जबरदस्त पगडा असलेल्या बहुजन समाजाला त्यांनी खडबडून जागं केलं. इतिहासाचं जाणीवपूर्वक केलेलं विकृतीकरण या समाजाच्या लक्षात आणून देताना त्यांना त्यांच्या सत्त्वाची जाण सेवा संघाने करून दिली. असं म्हटलं जातं की, पोथी वाचणार्‍या समाजाला सेवा संघानं पुस्तकं वाचायला शिकविली. ते खरंच आहे. धार्मिक पोथी, पुराणांशिवाय काही न वाचणार्‍या समाजाला सेवा संघानं फुले, आंबेडकर वाचायला लावले. हे परिवर्तन खूप मोठं आहे. सामाजिक समरसता वगैरे अशा भंपक गोष्टी न करता एका समाजाची मानसिकता बदलविण्याचं मोठं काम सेवा संघानं केलं आहे. एका मोठय़ा समूहाला आत्मभान देणारं हे परिवर्तन आहे. हा असा बदल घडवायला शेकडो वर्षे जातात. 
         मात्र २५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत सेवा संघाने हे काम केलं. दुसरं महत्त्वाचं कुठलं काम सेवा संघानं केलं असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था अशा जातीयवादी आणि समाजात द्वेषाची पेरणी करणार्‍या संघटनांविरुद्ध ताकदीने शड्ड ठोकला. सरकार नावाची यंत्रणा आणि इतर पुरोगामी संघटना या संस्थांचा मुकाबला करताना सपशेल अयशस्वी ठरत असताना सेवा संघाने वैचारिक मार्गाने आणि वेळप्रसंगी मैदानातही या संघटनांना जबरदस्त आव्हान दिले. बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण करायला निघालेल्या या संघटनांच्या कारवायांना सेवा संघाने बर्‍यापैकी चाप लावला हे कबूल करावंच लागतं. पुरोगामी विचारसरणीचा पुरस्कार करणारा एक जबरदस्त दबाव गट सेवा संघाच्या निमित्ताने महाराष्ट्रात तयार झाला. हे परिवर्तन करताना मराठा सेवा संघालाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखाच द्वेषाचा मार्ग पत्करावा लागला. ब्राह्मण समाजाला टार्गेट करून इतर जातीयवादी संघटनांप्रमाणेच स्वतंत्र विचार न करू शकणारी पिढी सेवा संघाने तयार केली, असा आरोप त्यांच्यावर होतो. या आरोपात काही अंशी तथ्यांश निश्‍चित आहे. सेवा संघाच्या प्रारंभीच्या काळात आणि अगदी आताआतापर्यंतही देशातील प्रत्येक समस्येला ब्राह्मण जबाबदार आहेत, अशी मांडणी सेवा संघाकडून होत होती. कुठलाही अपवाद न करता सरसकट सर्व ब्राह्मणांना सेवा संघाचे नेते आडव्या हाताने घेत होते. ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या सर्व प्रथा, परंपरा मोडित काढल्या पाहिजेत, आर्यांनी (ब्राह्मणांनी) या देशावर आक्रमण केल्यानंतर येथील समाजाला गुलाम केल्यानंतर ज्या-ज्या गोष्टी लादल्या, त्या सार्‍या नाकारायचा चंग सेवा संघानं बांधला. त्यातून मग गुलामगिरीची सारी प्रतीकं झिडकारून लावायचे आवाहनही सेवा संघाच्या विचारपीठावरून करण्यात येत असे. 
         अगदी आताआतापर्यंत महिलांनी मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये, बांगड्या घालू नये, असे ठासून सांगणारे काही वक्ते जिजाऊ महोत्सवात असायचे. हिंदू धर्मातील बहुसंख्य ज्यांना देव म्हणून भक्तिभावानं पूजतात, ते आपले देव असू शकत नाही, असेही सांगितले जात असे. हा सर्व प्रचार सनातन व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारण्यासाठी व्यूहरचना म्हणून कदाचित ठीक असेल, पण यातून सामान्य कार्यकर्त्यांच्या डोक्यात जबरदस्त गोंधळ तयार होत होता. तसंही देवाधर्माच्या विषयात हात टाकला की सॉलिड केमिकल लोचा निर्माण होतो, हा पुरोगामी संघटनांचा नेहमीचा अनुभव आहे. मराठा सेवा संघही सध्या या अवस्थेतून जात आहे. त्यामुळेच परवाच्या जिजाऊ महोत्सवात डॉ. आ. ह. साळुंखे यांनी सुधारित शिवधर्मगाथेबद्दल माहिती देताना मानवी स्वातंत्र्यांचा आदर करण्याचे आवाहन करताना महिलांनी मंगळसूत्र घालावे की नाही, कुंकू लावावे की नाही, बांगड्या घालाव्या की घालू नये, हा त्यांचा अधिकार आहे. या विषयात जबरदस्ती करता येणार नाही, अशी भाषा वापरली तेव्हा सेवा संघाचे अनेक कार्यकर्ते चमकले. सेवा संघ बदलत तर नाही ना, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. जिजाऊ महोत्सवाचे अनेक वर्षांपासून वार्तांकन करणार्‍या वार्ताहरांनाही सेवा संघ बदलतो आहे, काहीसा सौम्य होत आहे, हे या वेळी जाणवले. कधी काळी क्रिकेट या खेळाची तीन लाकडं आणि अकरा माकडं अशा वाक्यात संभावना करणारा सेवा संघ आता एका क्रिकेटपटूला मराठा विश्‍वभूषण पुरस्कार देतो, ही विसंगतीही अनेकांना खटकली. अर्थात, रेखाताई खेडेकरांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यासारख्या अनेक विसंगती सेवा संघाच्या प्रवासात दाखविता येतात. मात्र सेवा संघाच्या विचारपीठावर आणि कोअर मीटिंगमध्ये त्यावर वेळोवेळी मोकळेपणाने चर्चाही होते. या लेखाचा तो विषय नाही. सेवा संघ बदलतो आहे का, हा मुद्दा आहे. या विषयात सेवा संघाच्या जडणघडणीत सुरुवातीपासून सहभागी असलेल्या काही जणांसोबत चर्चा केली असता त्यांनी सेवा संघ निश्‍चितपणे बदलत आहे, हे मान्य केले. मात्र हे बदल वैज्ञानिक बदल असून संघटनेला निकोप वाढीकडे नेणारे बदल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ब्राह्मण समाजाबद्दलचा आक्रमक प्रचार आणि प्रतीक नाकारण्याबाबतचा टोकाचा अट्टाहास याबाबत सेवा संघामध्ये प्रारंभापासूनच दोन मतप्रवाह होते. 
         एक गट इतिहासाचं विकृतीकरण ज्यांनी केलं, ज्यांनी वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था निर्माण करून बहुजन समाजाला हजारो वर्षे गुलामगिरीत ठेवलं त्यांच्याबद्दल आक्रमकतेनेच बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे आणि त्यांनी निर्माण केलेली सारी प्रतीकं उखडून फेकली पाहिजे, नाकारली पाहिजे, या मताचा होता. दुसरा गट मात्र हजारो वर्षांच्या माथी मारलेल्या का होईना परंपरा, प्रतीकं काही दिवसात मोडीत काढता येत नसतात. तसेही माणसं जबरदस्तीने बदलत नसतात. त्यामुळे वैयक्तिक आचरणाबाबत कुठलेही फतवे काढू नयेत. माणसं तयार झालीत की त्यांचे अपसमज आपोआप मोडित निघतात. त्यामुळे टोकाचा विचार न करता चळवळ निकोप आणि सशक्त केली पाहिजे, या मताचा होता. कोणं कोणत्या जातीत जन्माला यावं हे कोणाच्याच हाती नसतं. त्यामुळे ठरावीक समाजाबद्दल न बोलता प्रवृत्तीला विरोध असला पाहिजे, असेही हा गट आग्रहाने सांगत होता. शेवटी डॉ. आ. ह. साळुंखेंसारख्या ज्यांचा इतिहास, धर्म, संस्कृती, समाजशास्त्राबद्दल प्रचंड अभ्यास आहे, त्यांना भूमिका ठरविण्याचे अधिकार देण्यात आले. डॉ. साळुंखे यांचा लौकिक हा अतिशय संतुलित व निकोप विचार करणारा विचारवंत असा आहे. त्यांनी शिवधर्मगाथेतील बदलाबाबत सांगताना, 'लढाई ही ईश्‍वराच्या अस्तित्वाबद्दल कधीच नव्हती. संघर्ष हा शोषणाविरोधातला आहे. त्याविरोधात ठामपणे उभं राहून समतेची शिकवण देणं हाच शिवधर्माचा गाभा आहे,' असे सांगितले. हे त्यांचं सांगणं समजून घेण्याजोगं आहे. 
            विवेकवाद आणि विवेकाचा आधार हीच सुजाण म्हणविणार्‍या सर्वांची जगण्याची पद्धत असली पाहिजे. त्यातही परिवर्तनाच्या चळवळीत काम करणार्‍या माणसांनी चळवळीच्या वाढीसाठी आवश्यक ते बदल स्वीकारले पाहिजे. बदल हा शेवटी माणसाचा स्थायिभाव आहे आणि तसंही कट्टरता ती कोणाचीही असो, शेवटी ती नुकसानच करते. त्यामुळे रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना एका व्यापक उद्देशाने मराठा सेवा संघात सकारात्मक बदल होत असेल, तर त्याचं स्वागतच करायला हवं. 

(लेखक दैनिक 'पुण्य नगरी'चे कार्यकारी संपादक आहेत.) भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

22 September 2013

महापुरुषांना डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घ्या

महापुरुषांना डोक्यावर घेण्याऐवजी महापुरुषांचे कार्य विचार डोक्यात घ्या त्यानेच खरी प्रगती होईल.
                                         - शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब
                                                         (मराठा सेवा संघ संस्थापक)
            संपूर्ण बहुजन समाजाच्या मनात ज्या शिवरायांबद्दल आदर आणि अभिमान आहे त्यांना खरा इतिहास सर्वप्रथम महात्मा फ़ुलेंनीच समोर आणला.महात्मा फ़ुले यांची शिवरायांवर अतोनात श्रद्धा होती.त्यांनीच रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढून पहिली शिवजयंती साजरी केली.शिवरायांचे खरे चरित्र प्रथम महात्मा फ़ुले यांनी लिहिले.शिवरायांचा पोवाडा लिहुन खरे शिवराय गो-ब्राह्मण प्रतिपालक नव्हे तर कुळवाडीभुषण होते हे सत्य सर्वप्रथम मांडले.महात्मा फ़ुलेंनी शिवरायांवर जे लिखाण केले ते त्या काळात जे पुरावे उपलब्ध होते त्यानुसार.शिवरायांना ते कमी लेखत नव्हते.किंबहुना शिवरायांचे श्रेष्ठ्त्व त्यांच्या साहित्यातून दिसून येतेच.शिवराय हे निरक्षर नव्हते.आज याचे पुरावे उपलब्ध आहेत.त्यामुळे महात्मा फ़ुलेंना कोणताही दोष लागत नाही.आज महात्मा फ़ुले हयात नाहीत.ते हयात असताना जर असे पुरावे उपलब्ध झाले असते तर त्यांनी आपल्या भुमिकेत निश्चित बदल केला असता.किंबहुना त्यांना या गोष्टींचा खुप आनंदच झाला असता.महात्मा फ़ुले हे खरे सत्यशोधक छ्त्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते.
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा जोतिबा फ़ुले यांना गुरु मानत होते.महात्मा जोतिबा फ़ुले हे शिवरायांना गुरु मानत होते.छ.शिवाजी महाराज गुरु मानत होते संतशिरोमणी तुकोबारायांना आणि तुकोबारायांच्या गाथे वर तथागत बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता.महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचे दर्शन घॆतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्यांनी जय शिवराय ,छ.शिवाजी महाराजांचा विजय, छ.शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या.अशा रीतीने बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची शिवरायांचे दर्शन घॆऊन केली.बेळगांव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाने ही पत्रे प्रकाशित केलेली आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर लहान असताना "क्रुष्णराव अर्जुन केळूस्कर" गुरुजींनी त्यांना बुद्ध चरित्र भेट दिले होते.या चरित्रामुळे बाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली.केळूस्कर गुरुजी हे एक बहुजन विद्वान होते.छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर "बॅरिस्टर" झाल्यावर त्यांची कोल्हापूर शहारात रथातून मिरवणूक काढून फ़ुले उधळली होती.राजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी सहाय्य केले होते.सयाजीराव गायकवाड हे इ.स. १८७५ ते इ.स.१९३९ सालादरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते.बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
मराठा स्वराज्याचा सक्रिय स्वाभिमान उरी बाळगणार्या महाराजांनी आपल्या पराक्रमाने मराठी मुलुखाची शान भारत खंडात वाढवून भगवा झेंडा मोठ्या अभिमानाने फ़डकत ठेवला;पण त्यांची पायरी कधीच बदलली नाही.परंतू आपला इतिहास न समजलेला बहुजन आजही आपण कोण आहोत हे विसरत आहेत.त्यामुळे आता आपणच ठरवावे की,आपण कोण आहोत ? कारण जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधी इतिहास घडवू शकत नाही असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत.सध्याचा आंबेडकरी भक्त हे फ़क्त आंबेडकरांना डोक्यावर घेऊन जय भिम करून नाचतात पण सच्चा आंबेडकरी अनुयायी हे आंबेडकरी विचार डोक्यात घेऊन समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन समाजप्रबोधन करतात.असेच सर्वच बहुजन महापुरुषांच्या बाबतीत झाले आहे.त्यामुळे बहुजन महापुरुषांचे भक्त सच्चे अनुयायी कधी होतील ? हाच खरा प्रश्न आहे.