Showing posts with label धार्मिक आणि जातीनिहाय. Show all posts
Showing posts with label धार्मिक आणि जातीनिहाय. Show all posts

15 May 2017

आदर्श समाजासाठी मराठा आचारसंहिता

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढाकाराने काही दिवसापुर्वी मराठा आमसभा संपन्न झाली. मराठा मोर्च्यामध्ये मराठा समाज एकत्र आला आणि मराठा समाजाच्या ज्वलंत समस्या विषयी संशोधन सुरु झाले. अशा वेळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजन करण्यासाठी आदर्श आचार संहितेची गरज असल्याचे स्पष्ट झाले; त्यामुळे अनिष्ट रुढी-परंपरात अडकलेल्या मराठा समाजाला बाहेर काढण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर येथे मराठा महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मराठा समाजाची आदर्श आचारसंहिता बनवण्यात आली आहे. परंतु अनिष्ट रुढी-परंपरात आणि जातीच्या व्रुथा अभिमानात अडकलेला आणि त्या कालबाह्य परंपरेलाच प्रतिष्ठा मानणारा मराठा समाज या आदर्श आचारसंहिताचे पालन कितपत करतो हे सांगणे कठीण आहे. अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी - परंपरात तथा हुंडाबळी सारख्या समस्या मराठा समाजाबरोबर इतर समाजातचही मोठ्या प्रमाणात आहेत. पण मराठा समाज हा सगळ्यात मोठा असल्याने त्या समाजातील त्रुटी लगेच द्रुष्टीस पडतात हे सत्य असले तर जातीचा व्रुथा अभिमान बाळगण्यात मराठा समाज नेहमीच अग्रेसर असतो हे शास्वत सत्य आहे. जातीचा अभिमान वाईट नाही पण व्रुथा अभिमान समाजाच्या सर्वांगिण विकासामध्ये अडथळा ठरतो. मराठा समाज जातीच्या व्रुथा अभिमानामध्ये एवढा गुरफ़टलेला आहे की कोणीही केवळ जातीच्या नावाने मराठा समाजाचा स्वत:च्या हितासाठी वापर करू शकतो. यातून प्रथमत: मराठ्यांनी स्वत:ची सूटका करवून घेतली पाहिजे.
           राजकारण आणि मराठा समाजाचे अतुट नाते बनलेले आहे. राजकारण संकल्पना केवळ मराठ्यांना द्रुष्टी समोर ठेवूनच उदयास आली आहे की काय असे वाटावे इतके अतुट नाते. राजकारणामुळे मराठा समाजाचे खुप नुकसान झालेले आहे. शिवाजी महाराजांच नाव घेऊन राजकारण्यांनी आणि धर्मवाद्यांनी मराठा तरुणांचा खुप वापर केला. त्यामुळे चांगलं शिक्षण घॆऊन नोकरी - व्यवसाय करण्याच्या वयात राजकीय पक्षासाठी आणि धर्मासाठी रस्त्यावर उतरुन दंगा करण्यात जास्त वेळ घालवणे हे मराठा तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे आजपर्यंत. पण राजकारण काय नी धर्मवाद काय दोन्हीमुळे मराठ्यांचे केवळ नुकसान झाले आहे. मराठा समाजाला ना राजकारणाने काही दिले ना धर्माने. धर्मवाद्यांनी केवळ देव-धर्मासाठी मराठ्यांच्या शक्तीचा केवळ वापर केला परंतू मराठा समाजाच्या समस्येकडे कायमच साफ़ दुर्लक्ष केले. त्यामुळे आता मराठा समाजाने आत्मपरिक्षण केले पाहिजे. कायम देणंच माहीत असणार्या मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ येणे ही बाब मराठ्यांसाठी शोभणीय नाही. महाराष्ट्राला कायम भरभरून देणार्या समाजाची आज ही अवस्था का झाली याची कारणे मराठा समाजाने शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांगीण विकासासाठी पहिली वाटचाल म्हणुन मराठ्यांनी प्रथमत: धार्मिक गुलामी झुगारून सुरुवात केली पाहिजे. अतिधार्मिकता मराठ्यांच्या प्रगतीमध्ये मोठा अडथळा बनली आहे. म्हणूनच आज कितीही गरीबीत असला तरी मराठा समाज कर्ज काढून धार्मिक सण - उत्सव तथा विधी करत असतो हे थांबवणे किंवा याचे प्रमाण कमी करणे अत्यंत गरजचे आहे, तरच मराठा समाजामध्ये सुधारणा शक्य आहे.
शहाण्णव कुळीचा बाऊ नको, बुवाबाजी हाकला : अखिल भारतीय मराठा महासंघ
         अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी - परंपरात गुरफ़ट जाणार्या मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नती आणि विकासासाठी महासंघाने आमसभेमध्ये  मराठा समाजासाठी आदर्श आचार संहिता निर्माण केली. त्यामध्ये बुवाबाजीला थारा नको, घरोघरी महाप्रसादाची प्रथा नको, विवाह ठरवताना शहाण्णव कुळीचा बाऊ नको, की अनाठायी खर्च नको, मराठा संस्कृती टिकविण्यासाठी समाजाने पुढाकार घेऊन मराठा समाजाचा विकास घडवावा,  असे आवाहन करण्यात आले.
आदर्श मराठा समाज घडवण्यासाठीची आचारसंहिता अशी
          वास्तुशांती, लग्नकार्य समारंभ इत्यादी कार्यक्रमामध्ये छ.शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करणे.  मराठा संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे व समाजावर संस्कार करणे. समाजाच्या पूर्वजांची व वीरतेची कुलदैवते, कुलस्वामीनी (उदा. जोतिबा, खंडोबा, तुळजाभवानी) यांची मनोभावे पूजा व्हावी. या दैवतांमध्ये अनावश्‍यक वाढ होऊ नये. बुवाबाजीला थारा नको. घरोघरी महाप्रसादाची प्रथा नको.
          शहाण्णव कुळी समाजाची संभ्रमावस्था आहे. यात विभागणी होऊ नये. सर्व एकच आहोत, ही भावना वाढीस लावावी. यासाठी संशोधकांची मदत घ्यावी. विवाह ठरवताना शहाण्णव कुळीचा बाऊ करू नये. कर्तृत्त्वाला महत्त्व द्या. जन्मकुंडलीचा सांगोपांग विचार करून कालबाह्य रूढी झुगारून द्या व विज्ञानाची कास धरून रक्तगट तपासणी व्हावी. विवाहापूर्वी एच. आय. व्ही. च्या तपासणीला हरकत नाही.
विवाहातील बडेजाव व अट्टहास - 1) मुहूर्तमेढ - आंब्याच्या फांदीऐवजी कुंडीतील आंब्याचे कलमी रोप वापरावे.  2) आहेर - खोट्या प्रतिष्ठेपायी 100 ते 500 व्यक्तींपर्यंत आहेर करण्याची प्रथा बंद करावी, असा एकमुखी निर्णय. 3) काव्याक्षतांची नासाडी थांबवावी. 4) लग्न कार्यातील वधू-वरांना उचलण्याचा अट्टहास, काव्याक्षता फेकाफेकी व वरातीत डॉल्बी व दारूच्या वापराने तंटे होतात. त्यामुळे वरातीसारख्या पद्धती बंद व्हाव्यात. 5) अनाठायी खर्च टाळावा. 6) हुंडा व सोन्याच्या मोहापायी कर्जबाजारी होऊन होणारे अनर्थ टाळूया. 7) सामुदायिक विवाह पद्धतींना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करणे.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनावश्‍यक रूढींचे प्रदर्शन थांबवावे. 1) बारा दिवसांचा दुखवटा काळ कमी करणे (पाच ते सात दिवस). 2) एक कलश रक्षा नदीमध्ये विसर्जित करावी व बाकी रक्षाकुंडात विसर्जित करावी किंवा शेतीमध्ये विसर्जन करून प्रिय व्यक्तीच्या स्मृती जागृत ठेवाव्यात. 3) रक्षा विसर्जनानंतर नैवेद्य रूपाने होणारी अन्नाची नासाडी टाळावी. घरच्या व्यक्तींनीच मृत व्यक्तीच्या आवडीचा पदार्थ ठेवण्यास हरकत नाही.  4) कालानुरूप वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन सकाळी नऊ ते दहाच्या आत रक्षा विसर्जन होण्यासाठी दक्ष राहावे.  कारण व्यावसायिक व नोकरदार यांना सोयीचे होईल. 6) दिवसकार्याप्रसंगी भेटवस्तू (भांडी) वाटप बंद करावे. 7) दिवस कार्यानंतर पै-पाहुण्यांकडून नव्याने येऊ घातलेली मटण भोजनाची प्रथा पूर्णपणे बंद करावी. 8) वास्तुशास्त्र-घर बांधणीमध्ये हवा, प्रकाश या पुरताच हा विषय मर्यादित ठेवावा. यामध्ये थोतांड करणाऱ्यांना आळा घालून जरब बसविणे. वास्तुशांती छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने करावी. 9) प्रत्येक गोष्टीची विज्ञानाच्या दृष्टिकोनातून चिकित्सा करावी. 10) मुलगा-मुलगी भेद नको. दोघांना समान वागणूक द्यावी. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी मराठा समाजाने प्रयत्न करणे. 11) गावच्या जत्रा, माही पूर्वीप्रमाणे आप्तांच्या पुरत्याच मर्यादित ठेवाव्यात. कर्ज काढून मोठ्या प्रमाणात भोजनावेळी बंदी व्हाव्यात. यामध्ये दारूचा वापर थांबवावा.
          मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मराठा आमसभेमध्ये ठरवलेल्या आचारसंहितेशिवाय पर्याय नाही. आदर्श आचारसंहिता मराठा समाजाबरोबरच इतर समाजासाठीही तेवढीच महत्वाची आहे. प्रबोधन हे केवळ बोलण्या - लिहिण्यापुरतेच राहू नये त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जन्म संगोपनाने विचार करुन कालबाह्य रुढी झुगारुन दिल्या पाहिजेत. मराठा समाजातील गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक तथा वैद्यकिय मदत तसेच निराधारांना विविध प्रकारचे सहकार्य करणे हे मराठा समाजासाठी आद्यकर्तव्य आहे त्याचे पालन झाले पाहिजे.केवळ मोठ्या संख्येने एकत्र न येता एकमेकांच्या मदतीसाठीही मराठा समाजने हिंदुत्ववाद, बहुजनवाद असले वाद बाजुला सारून केवळ एक मराठा म्हनून एकत्र आले पाहिजे आपल्या मराठा समाजासाठी. आज समता-समानता म्हनूण कितीही ओरडले तरी मराठ्यांनी आपल्या जातीसाठी मराठा म्हणून एकत्र यावे आणि आपल्या समाजाच्या कल्याणासाठी वचनबद्ध व्हावे हिच काळाची गरज आहे. मराठा आमसभेमध्ये ठरवल्या गेलेल्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करुन मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आदर्श समाज व्यवस्थेच्या नवनिर्माणासाठी कृती करावी.
जय शिवराय जयोस्तु मराठा जय महाराष्ट्र

8 December 2016

मराठा क्रांती मोर्चा : सामाजिक क्रांती.

          महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून प्रत्येक समुहाचे ओबीसी - बहुजन - दलित ऐक्य-संविधान संबंधीत नावाने भव्य मोर्चे सुरु आहेत, मोर्च्याला सुरुवात झाली ती "मराठा क्रांती मोर्चा" ने. कोपर्डी येथे एका लहान मुलीवर दलितांकडून पाशवी अत्याचाराची घटना घडल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रभर मराठा क्रांती मोर्चाची मालिका सुरु झाली. मराठा क्रांती मोर्चे अतिभव्यपणे आणि तेवढ्याच शांततेने मूकपणे चालू झाले. क्रांती म्हंटले की प्रतिक्रांतीही आलीच त्यामुळे आम्हीही एकत्र येवू शकतो हे दाखवण्यासाठी मराठा मोर्चा विरोधातही "बहुजनांचे" प्रतिमोर्चे निघू लागले. सध्याचा काळ मोर्चेबांधनीचाच काळ आहे. सध्याही एकाच गोष्टीची चर्चा आहे मोर्चा आणि त्याच्या ठळक मागण्या. महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या "मराठा क्रांती मोर्चाचा" समाजाला किती फ़ायदा होईल त्यांच्या मागण्या मान्य होतील का ? झाल्याच तर किंवा नाही झाल्याच तर पुढे काय ? हा मुद्दा थॊडा बाजुला ठेऊ. माझ्या मते "मराठा क्रांती मोर्चाचे" चे मोठे फ़लीत म्हणजे सामाजिक पारदर्शकता. "मराठा क्रांती मोर्चा" मुळे समाजामध्ये पारदर्शकता आली. आम्ही एकच आहोत असे सर्वकाळ ओरडनार्या सर्वांचे मित्रत्व किंवा शत्रुत्व अगदी सुर्यासारखे स्पष्ट झाले. आज पर्यंत ब्राह्मणवादाच्या विरोधात लढताना स्वत:ला बहुजन म्हणनार्यांचे सुद्धा पितळ उघडे पडले. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदुत्व - बहुजनवाद - पक्ष यामध्ये विभागलेला मराठा "फ़क्त मराठा" म्हणून एक झाला आणि विश्वाला आपल्या मराठा शक्तीचे दर्शन करून एक नवा आदर्श दिला. अनेक वेळा मोर्चे निघतात त्यात अनेकदा मोर्चाला हिंसक वळण लागते, सरकारच्या अडचणीमध्ये वाढ होऊन सामान्य नागरीकांना हकनाक वेठीस धरले जाते पण अपवाद असेल तर तो अतिभव्य मराठा क्रांती मोर्चा. कारण क्रांतीची सुरुवात आणि शेवट हे सुधारणा आणि क्रुतीने होत असते.आपण जर इतिहासातील सर्व मोर्चे आणि आंदोलनाचा इतिहास पाहिला तर सहज लक्षात येईल , तोडफ़ोडी, जाळपोळी, लुटालुट, सरकारविरोधी नारेबाजी, सार्वजनिक मालमत्तेची नासधुस तसेच सामाजिक तनाव ही मोर्च्याची खास वैशिष्टे राहिलेली आहेत. अशा वेळी मराठ्यांनी शिस्त, शांतता आणि स्वच्छतेचे दर्शन घडवून इथुन पुढच्या मोर्च्यांसाठी एक आदर्श घालून दिलेला आहे ही बाब मराठ्यांसाठी निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.
आरक्षण आणि सामाजिक मानसिकता
               सेनापती बापटांनी म्हंटलेले आहे "महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर - वैरी पराधिनतेचा, महाराष्ट्र आधार भु-भारताचा". मराठा सेवा संघासोबत इ.स.१९९६ मध्ये मराठा आरक्षणासंबंधी एका बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी म्हंटले होते की, "आजपर्यंत केवळ देणेच माहीत असलेल्या मराठा समाजावर आज आरक्षण मागायची वेळ आली आहे ही महाराष्ट्रासाठी भुषणावह बाब नाही, परंतू मराठा समाज सर्वार्थाने सशक्त होण्यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील". मराठा नेत्यांनी समाजाकडे दुर्लक्ष केल्याचे मतही त्यांनी मांडले. तेंव्हापासून आजतागात आरक्षणासाठी मराठ्यांचा संघर्ष चालूच आहे. मराठा समाज आरक्षण मागत असला तरी ते स्वतंत्र आरक्षण मागत आहेत कुणाचे कमी करून नाही. मराठा आरक्षणाचे काही समाजाने समर्थन केले आहे तर काहींनी अप्रत्यक्ष विरोध. आरक्षण म्हणजे गरीबी हटाव कार्यक्रम नाही असे म्हणणारे मराठा आरक्षणावर बोलताना मात्र मराठ्यांच्या आर्थिक परिस्थितीचे वर्णन करतात हेच दुटप्पीपणाचे लक्षण आहे विशेष म्हणजे त्यांना आर्थिक सवलती घेताना अजिबात लाज वाटत नाही. मराठा समाज आज मागास परिस्थितीत जगत आहे पण भारतीय संविधान त्यांना मागास मानायला तयार नाही. भारतीय संविधानाचा आजही देशात "सवर्ण आणि दलित" जगत आहेत यावर ठाम विश्वास आहे मग ते कितीही समानतेची शिकवण देवो. मोजक्या लोकांच्या स्थितीवरून समाजाच्या परिस्थितीचे मोजमाप करणे हेच चुकीचे आहे. आरक्षणाचा मुद्दा संपुष्टात आणायचा असेल तर एकतर सर्वच जातीना लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण द्यावे नाहीतर सर्वच आरक्षण रद्द करावे लागेल. आर्थिक निकषावर आरक्षण असाही एक पर्याय शक्य आहे. मी वयक्तिक मराठा आरक्षणाला जेवढं समर्थन करतो त्याच्या पेक्षा जास्त सर्वच आरक्षण रद्द करण्याला माझं समर्थन आहे.कारण आरक्षणानं देशाची आर्थिक स्थिती फ़ारच दयनीय झालेली आहे. असंच चालू राहिलं तर देश भिकेला लागायला वेळ लागणार नाही.आरक्षणाच्या शैक्षणिक - व्यवसायिक आर्थिक सवलती मध्ये कोट्यावधी रुपये विनाकारण वाया घालवले जात आहेत.त्यामुळे किमान अशा सवलती देण्या अगोदर आर्थिक निकष तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
मराठा वि.दलित : मोर्चे आणि प्रतिमोर्चे.
                 मराठा मोर्चे जसे रेकॉर्डब्रेक गर्दी करायला लागले तसे आधी दुर्लक्ष करत असलेल्या माध्यमांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.इतर जातींमध्ये अस्वस्थता कशी पसरेल याची काळजी प्रसारमाध्यमांनी घेतली.मोर्चा - प्रतिमोर्चा मुळे सध्या सामाजिक संकेतस्थळावर जातीयवादाला हुरुप आला आहे. काही ठिकाणी दंगलीचे वातावरण पण झाले होते. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी मराठ्यांच्या मागण्या सरकारविरोधी आहेत आणि राज्यात अराजकता निर्माण करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे प्रयत्न आहेत त्यामुळे प्रतिमोर्चा काढू नये असे आवाहन केले होते.त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. तरीही प्रसारमाध्यमांनी मराठा मोर्च्यातील अनेक मागण्या बाजुला सारून अ‍ॅट्रोसिटीच्या मागणीस सर्वाधिक चर्चेत ठेवून, आरक्षणावरून भयभीत करून दलितांना प्रतिमोर्चा काढण्यास भाग पाडले. दलितांनी यामागचा उद्देश लक्षात न घेता मराठ्यांच्या विरोधात मोर्चे काढले खरे पण त्याचा त्यांना कितपत फ़ायदा होईल दलितांनी याचा विचार करणे आवश्यक आहे.
               मराठा मोर्चा तथा प्रतिमोर्चाचे फ़लीत म्हणजे ब्राह्मणवादा विरोधात बहुजन सज्ञेमध्ये वावरणार्या मराठा आणि दलित लोकांचे पारदर्शक रुप समोर आले.मराठा - दलित हा वाद काही आजचा नाही. हे शत्रुत्व जुनेच आहे फ़क्त बहुजन एकीच्या नावाखाली दबलं गेलं होतं. सामाजिकतेचा विचार केला तर आज मराठा-दलित एकमेकांचे हाडवैरी बनले आहेत. दोन्ही समाजामध्ये दरी निर्माण झालेली आहे. किमान कोणत्याना-कोणत्या चळवळीत काम करत असलेल्यांची तर हिच भावना आहे. इथे संपुर्ण समाज असा उल्लेख अपवादात्मक सुद्धा करणे शक्य नाही. एकीसे कितीही डोस पाजले तरी सत्य परिस्थिती लपवणे किंवा अमान्य करणे सोप्पे नाही. वर - वर एकतेचे दर्शन देणार्यांची मानसिकता सामाजिक संकेतस्थळावर वेळो - वेळी बाहेर आली आहे. सामाजिक संकेतस्थळ म्हणजे समाज नव्हे असे आपण म्हंटले तरी आज तो एक समाजाचा भाग बनला आहे.मराठा आणि दलित समाज हे वैचारिक सामाजिक पातळीवर एकत्र येणे कदापी शक्य नाही.मराठा-दलित यांचे संबंध हे हिंदु-मुस्लिम धर्मासारखे आहेत वर-वर भाई-भाई म्हणायला ठिक आहे पण प्रश्न सामाजिकता-परंपरेचा येतो त्यावेळी दोन्ही परस्पर विरोधी आहेत. हिंदु-मुस्लिम भाई-भाई असं आपण कितीही म्हणालो तरी परंपरा - इतिहास - श्रद्धास्थानं - प्रेरणास्थानं - लग्नपद्धती ही भिन्न टोकाची आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये सामाजिक एकी होऊ शकत नाही तीच अवस्था इथे मराठा आणि दलितांमध्ये आहे. निव्वळ बुद्धीजीवींच्या विचारावर एकमत झाले तर सामाजिक समता येत नाही तसेच आंतरजातीय विवाहाने समता-समानता येईल असे मानने म्हणजे सदसदविवेकबुद्धीशी शत्रुत्व पत्कारण्यासारखे आहे. त्यामुळे दोन्ही समाजाने उघड - उघड भुमिका घेणे गरजेचे होते जे "मराठा क्रांती मोर्चा" आणी त्याच्या विरोधातील "बहुजन मोर्चा" च्या रुपाने का असेना साध्य झाले आहे मग कितीही "मराठा - दलित ऐक्य" च्या बाता मारल्या तरी त्याने फ़रक पडेल अशी सध्या तरी परिस्थिती नाही ही बाब दोन्ही समाजाने मान्य केली पाहिजे. नाहीतर परिस्थिती बदलायची असेल तर निर्लपबुद्धीने आणि नि:पक्षपातीपणे एकत्र येवून विचार मंथन करणे गरजेचे आहे किंवा जे चालू आहे तेच चालू द्यावे हेच दोन्ही समाजाच्या हिताचं आहे.
ॲट्रोसिटी कायद्यातील बदल
         अनुसुचित जाती-जमातींच्या रक्षणासाठी त्यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी ॲट्रोसिटी (अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक) कायद्या केला गेला.परंतु नंतर त्याचे रुपांतर रोजगार हमी योजना अंतर्गत कायद्यामध्ये झाले की काय अशी शंका येते. कारण कायद्याचा वापर संरक्षणासाठी होत असता आर्थिक उन्नतीसाठीपण होत असल्याच्या काही घटना काही दिवसात समोर आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही समाजामध्ये दुही पसरली आहे. दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे केले पाहिजेत हे मान्य करून आणि त्या अत्याचाराचा आम्ही निषेद करतो पण खोट्या केसेस दाखल केल्या जात नाहीत असे म्हणणे म्हणजे दु:साहस तथा अज्ञानीपणाचे लक्षण आहे. मराठा मोर्चामध्ये ॲट्रोसिटी कायद्यामध्ये बदल करण्यासाठीची एक मागणी होती. त्या मागणीच्या विरोधातच दलितांनी प्रतिमोर्चा काढला होता. पण बदल म्हणजे नेमका काय बदल करायचा आहे याबद्दल ऐकुन घेण्याची मानसिकता कोणत्या दलितामध्ये किंवा त्यांच्या नेत्यांमध्ये नव्हती म्हणूनच ॲट्रोसीटी कायदा मुळे दोन्ही समाजात दरी निर्माण झाली आहे ती दरी आहे तोपर्यंत तरी एकीच्या गप्पा झाडणे म्हणजे विनाकारण वेळ घालवण्यातला प्रकार आहे. दुर्दैवाने देशामध्ये खोट्या केसेस करण्यार्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतुद आपल्याकडे नाहीये मग कायदा कोनताही असो.त्यामुळे अशा वेळी गुन्हा सिद्ध झाला नाही किंवा फ़िर्यादी फ़ितुर झाला तर कठोर शिक्षा देण्याची आणि त्याला मिळालेले पैसे परत शासनाला परत करण्याची तरतुद करणं अत्यंत गरजेचे आहे.असे केल्याने बर्याच प्रमाणात खोट्या केसेस ला तथा धमक्यांना आळा बसेल. यासाठी दोन्ही समाजातील तज्ञ लोकांनी एकत्र येवून याविषयी चर्चा करुन दोन्ही समाजाला अनुकूल, दलितांवरील अत्याचार थांबावेत आणि ॲट्रोसिटीचा गैरवापरही होऊ नये असा सुवर्णमध्य काढणं अत्यावश्यक आहे;(आरक्षण आणि ॲट्रोसिटी : क्रमश:).

9 January 2016

छ.शिवरायांचा कालखंड हिंदू-मुस्लिम संघर्षाचा होता ?

          आजपर्यत शिवरायांची प्रतिमा मुस्लिम विरोधी आणि शिवरायांचा कालखंड हिंदू - मुस्लिम संघर्षाचा कालखंड म्हणुन सांगितला गेला. पण हा चुकीचा प्रचार आहे. छत्रपती शिवरायांचा कालखंड हा हिंदू-मुस्लिम धार्मिक संघर्षाचा कालखंड नव्हता तर राजकीय सत्तासंघर्षाचा कालखंड होता. जर छत्रपती शिवरायांचा कालखंड हा हिंदू - मुस्लिम असा असता तर सर्व हिंदू एका बाजूला आणि सर्व मुस्लिम एका बाजूला दिसले असते मात्र तसे इतिहासात अजिबात दिसत नाही. बरेच मुस्लिम शिवरायांच्या सैन्यात होते तर बरेच हिंदू लोकं मुस्लिम राज्यकर्त्यांच्या सैन्यात होते. दुसरे असे की शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेपुर्वी महाराष्ट्रात आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही व बरीदशाही ही पाच मुस्लिम राज्ये एकमेकांविरुद्ध लढत होती. याचा सरळ अर्थ असा की शिवकाळातील संघर्ष हा सत्तासंघंर्ष होता.
छ.शिवरायांचे मुस्लिम सैन्य
      छ.शिवरायांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम सरदार, वतनदार व इतर चाकर होते आणि ते अगदी मोठमोठ्या हुद्द्यांवर जबाबदारीच्या जागांवर होते. शिवरायांच्या तोफ़खान्याचा प्रमुख इब्राहिमखान नावाचा एक मुस्लिम होता. तोफ़खाना म्हणजे लष्कराचे एक प्रमुख अंग. कदाचित सर्वात महत्वाचे. अशा महत्वाच्या तोफ़खान्याचा प्रमुख मुस्लिम होता.छत्रपती शिवरायांच्या दुरद्रुष्टीचं उदाहरण म्हणून सांगितल्या जाणार्या आरमार विभागाचा प्रमुखसुद्धा एक मुस्लिम सरदारच होता. त्याचे नाव दर्यासारंग दौलतखान. शिवरायांच्या खास अंगरक्षकांत व खाजगी नोकरांत अत्यंत विश्वासू म्हणून मदारी मेहतर यांचा समावेश होता. आग्र्याहुन सुटकेच्या प्रसंगात या विश्वासू मुस्लिम साथीदाराने काय म्हणून साथ दिली ? शिवराय मुस्लिमद्वेष्टे असते तर असे घडले असते का ?
       शिवरायांच्या पदरी अनेक मुसलमान चाकर होते. त्यात काजी हैदर हा एक होता. सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकार्यांनी शिवाजीनं सख्य जोडावे म्हणून एक हिंदू ब्राह्मण वकील पाठवला. तेंव्हा शिवाजीनं उलट काजी हैदर यास मोघलांकडे पाठवलं. म्हणजे मुसलमानांचा वकील हिंदू आणि हिंदूंचा वकील मुस्लिम. त्या काळातील समाजाची फ़ाळणी हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी असती तर असे घडले नसते. सिद्धी हिलाल हा असाच आणखी एक मुस्लिम सरदार शिवरायांच्या पदरी होता. १६६० मध्ये रुस्तुमजमा व फ़ाजलखान यांचा शिवरायांनी रायबागेजवळ पराभव केला. त्या वेळी सिद्धी हिलाल शिवरायांच्या बाजुने लढला त्याप्रमाणेच १६६० मध्ये सिद्धी जौहरने पन्हाळगडास वेढा दिला होता तेंव्हा नेताजी पालकरनं त्यांच्या सैन्यावर छापा घालून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला त्या वेळीसुद्धा हिलाल व त्याचा पुत्र वाहवाह हे नेताजीबरोबर होते. या चकमकीत सिद्धी हिलालचा पुत्र वाहवाह जखमी व कैदी झाला होता. शिवरायांच्या बाजूने मुस्लिम सिद्धी हिलाल आपल्या पुत्रासह मुस्लिमांच्या विरोधात लढता.
          त्या लढ्यांचे स्वरुप निव्वळ हिंदू विरुद्ध मुस्लिम असे असते तर असे घडले असते का ? सभासद बखरीत प्रुष्ठ क्र. ७६ वर शिवरायांच्या अशा एका शामाखान नावाच्या मुस्लिम शिलेदाराचा उल्लेख आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाच्या खंड १७ मधील प्रुष्ठ क्र.१७ वर नूरखान बेग याचा "शिवाजीचा सरनोबत" म्हणून उल्लेख आहे.हे सरदार एकटे नव्हते हे स्पष्टच आहे. त्यांच्या हाताखालील मुस्लिम शिपायांसह ते शिवरायांच्या चाकरीत होते.
           या सर्वांहून एक महत्वाचा अस्सल पुरावा आहे. त्यावरून मुस्लिम धर्मिय शिपायांबद्दलचे शिवरायांचे धोरण स्पष्ट होते. सन १६४८ च्या सुमारास विजापुरच्या लष्करातले सातशे पठाण शिवरायांकडे नोकरीस आले.तेंव्हा गोमाजी नाईक पानसंबळ याने त्यांना सल्ला दिला, तो शिवरायांनी मान्य केला व तेच धोरण ठेवले. नाईक म्हणाले," तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत त्यांस विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदुंचाच संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरीली तर राज्य प्राप्त होणार नाही, ज्यास राज्य कारणे त्याने अठरा जाती, चारी वर्ण यांस आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे." ग्रॅंट डफ़ने सुद्धा त्याच्या शिवरायांवरील चरित्र ग्रंथात प्रुष्ठ १२९ वर गोमाजी नायकाच्या सल्याचा उल्लेख करून म्हंटले आहे की, "यानंतर शिवाजीने आपल्या सैन्यात मुसलमानांनासुद्धा सामावून घेतले आणि त्यांच्या स्थापनेत याचा फ़ार मोठा उपयोग झाला."
शिवरायांचे सरदार व सैन्य हे फ़क्त हिंदू धर्माचे नव्हते. त्यात मुस्लिम धर्मियांचासुद्धा भरणा होता. हे यावरून स्पष्ट व्हावे. शिवराय हे मुस्लिम धर्म नाहीसा करण्याचे कार्य करीत असते तर हे मुस्लिम शिवरायांच्या पदरी राहिले नसते. शिवराय राज्यकर्त्यांचे जुलमी राज्य नाहीसे करायला निघाला होता. धर्माचा प्रश्न मुख्य नव्हता, राज्याचा प्रश्न मुख्य़ होता. धर्म मुख्य़ नव्हता, राज्य मुख्य होते. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती, राज्यनिष्ठा व स्वामिनिष्ठा मुख्य होती.
मुस्लिम राज्यकर्त्यांच्या पदरी हिंदू सैन्य
      ज्याप्रमाणे शिवरायांच्या पदरी मुस्लिम सरदार व सैन्य होतं त्याचप्रमाणे मुस्लिम राजांच्या-शहनशहांच्या - पदरी अगणित हिंदू सरदार होते. त्यांची यादी खुपच मोठी आहे. खुद्द शिवरायांचे वडील विजापूरच्या मुस्लिम आदिलशहाच्या पदरी मोठे सरदार होते. शहाजी महाराजांचे सासरे लखुजी जाधव निजामशाहीचे महाराष्ट्रातील एक मनसबदार होते. जावळीचे मोरे, फ़लटणचे निंबाळकर, सावंतवाडीचे खेमसावंत, श्रुंगारपुरचे सुर्यराव श्रुंगारपुरे हे सर्वजण आदिलशाहीचे मनसबदार होते.
        ज्याच्या सैन्यसामर्थ्यापुढे शिवरायांना माघार घ्यावी लागली होती व नामुष्कीचा तह करून आग्र्यास जाऊन संभाजीराजेंसह कैद होऊन पडावं लागलं, तो उत्तरेचा मातब्बर सरदार मिर्झाराजे जयसिंग तर अस्सल रजपूत हिंदूच होता आणि मुस्लिम शहेनशहाच्या पदरी मानाची असेल पण चाकरीच करत होता. मिर्झाराजे जयसिंग शिवरायांवर चाल करून आला तेंव्हा त्याच्या सैन्यात अनेक हिंदू सरदार होते, जाट होते, मराठा होते, रजपूत होते. राजा रायसिंग सिसोदिया, सुजनसिंग बुंदेला, हरीभान गौर, उदयभान गौर, शेरसिंग राठोड, चतुर्भुज चौहान, मित्रसेन, इंद्रभान बुंदेला, बाजी चंद्रराव, गोविंदराव इत्यादि..
          कोंडाणा किल्ला हस्तगत करताना तानाजी मालुसरे वीरमरण पावले आणि कोंडाण्याचा सिंहगड झाला.त्या लढाईतील कोंडाण्याचा किल्लेदार उदयभानू हा एक हिंदू रजपूतच होता आणि तो मुसलमान राजाचा किल्लेदार होता. अकबराच्या पदरी पाचशेहून आधिक मनसब असणारे जेवढे सरदार होते त्यात हिंदू सरदारांचे प्रमाण २२.५ टक्के होते. शहाजहानच्या राज्यात हे प्रमाण २२.४ टक्के होते. अगदी सर्व मुस्लिम राज्यकर्त्यांत अगदी कडवा म्हणून समजला जातो त्या औरंगजेबाच्या पदरी सुरुवातीला हिंदू मनसबदारांचे हे प्रमाण २१.६ टक्के होते. ते पुढे वाढले व ३१.६ टक्के झाले.
औरंगजेबानेच राजा जसवंतसिंग या हिंदू रजपूतला दक्षिणेचा सुभेदार नेमले होते. याच औरंगजेबाचा पहिला प्रधान रघुनाथदास नावाचा हिंदू होता. तो स्वत: रजपूत असून रजपुतांविरुद्ध लढला. पानिपतच्या लढाईत पेशव्यांच्या तोफ़खाण्याचा प्रमुख इब्राहिमखाण गारदी मुस्लिम होता. जे हिंदू मुस्लिम राज्याच्या पदरी चाकरी करत होते आणि इमान राखून प्रसंगी हिंदूविरुद्ध सुद्धा लढत होते त्यांना त्या काळी कुणी "धर्मबुडवे, किंवा धर्मद्वेष्टे किंवा मुस्लिमधार्जिणे" म्हणत नव्हते. धर्मनिष्ठेपेक्षा स्वामिनिष्ठेला जास्त मान्यता होती.
         भारतात धर्मामुळे व धर्मासाठी लढाया होत नव्हत्या, लढायांचे मुख्य कारण राज्य मिळवणे, राज्य बळकावणे वा टिकवणे हे होते. हे करायला उपयोगी ठरेल तेवढ्यापुरता धर्माचा वापर केला जाई पण ती मुख्य बाब नव्हती. शिवाजी महाराजांच्या पदरी मुस्लिम सरदार होते व मुस्लिम राजांच्या पदरी हिंदू सरदार हे जसे खरे आहे तसेच त्या काळात कोण कोणाविरुद्ध लढला ह्याची पाहणी केली तर त्या लढाया केवळ हिंदू विरुद्ध मुसलमान अशा झाल्या असे दिसत नाही. त्यामुळेच शिवकाळातील संघर्ष हा राजकीय संघर्ष होता धार्मिक संघर्ष नव्हे.
संदर्भ :
मराठ्यांच्या इतिहासाची साधने,खंड १७ प्रुष्ठ क्र.१७-[वि.का.राजवाडे].
शककर्ता शिवाजी (प्रुष्ठ क्र.४०-४१)-[गो.स.सरदेसाई].
शिवाजी कोण होता ? [कॉ.गोविंद पानसरे]
मराठ्यांचा इतिहास (खंड १,प्रुष्ठ क्र.१२९)-[ग्रॅंट डफ़] 
श्री.शिवछत्रपती [त्र्यं.शं.शेजवलकर].
शिवचरित्र - मिथक आणि वास्तव [श्यामसुंदर मिरजकर].

4 January 2016

मुस्लिम राज्यकर्ते आणि देवळांची लुट,मोडतोड

           आज समाजामध्ये अनेक संघटना उदयास आलेल्या आहेत. प्रत्येक संघटनेचा लोकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी एक युक्तिवाद असतो. त्यामध्ये हिंदूत्ववादी संघटनेंचा सगळ्यात जुना युक्तिवाद म्हणजे मुसलमानांनी आपल्या धर्मावर अन्याय केला, देवळांची लुट केली म्हणून (निव्वळ) मुसलमांनांना विरोध करण्यासाठी हिंदुंनो एक व्हा !. (इथे यांना सामान्य हिंदूंशी काही देणंघेणं नसतं). यामध्ये हिंदू धर्मावर अन्याय करण्यापेक्षा देवळांची लुट केली यावर यांचा जास्त रोष असतो (कारण देशात कितीही मोठा दुष्काळ येवो पण भट-बामनांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला देवळामुळे कसलाच चिमटा बसत नाही). पण सामान्य जनतेने या लुटालूट प्रकरणापासून दुरच रहावे (कारण सामान्य जनतेला लुटण्यात देवळांचा पहिला नंबर लागतो) आणि आजही परिस्थिती काही वेगळी नाही. आज जिवंत माणसाला एक वेळचे जेवण मिळो ना मिळो पण देवांना मात्र सकाळ - दुपार - संध्याकाळ पंचपक्वान्नांची न्याहारी आहेच, शिवाय काकडआरत्या, माकडआरत्या आहेतच की. कोट्यावधी गरीब (हिंदू) जनतेला थंडीच्या कडाक्यात साधे अंग झाकण्याइतके कपडे मिळो ना मिळो पण देवांना मात्र छपरीपलंग, मच्छरदाणी, गाद्यागिरद्यांची कमी नाही.
               आज हिंदुत्व, हिंदुराष्ट्र अशा घोषणा आणि भुमिकांच्या आधारावरचे राजकारण गेल्या काही वर्षात वाढू लागले आहे. हिंदुत्ववादी संघटनेंचा एक (त्यांचा) आवडता युक्तिवाद असतो व आहे, मुसलमान क्रुर होते,त्यांनी देवळे पाडली, देवळे भ्रष्ट केली,हिंदू धर्मावर अन्याय-अत्याचार केला, धर्म बुडाला म्हणून सर्व मुसलमान हिंदूविरुद्ध व हिंदू धर्माविरुद्ध असतातच  व आहेत आणि ज्या अर्थी ते हिंदूविरुद्ध आहेत त्याअर्थी सर्व हिंदूंनी त्यांच्याविरुद्ध असले पाहिजे.धर्माधारे हिंदुंना संघटित करणार्या संघटनांचा जसा युक्तिवाद असतो तसाच काहीसा मुसलमान संघटनेंचा असतो.
           आक्रमक मुस्लीम सैन्यानं सत्ता काबीज करताना व राज्यविस्तार करताना हिंदुंची देवळे फ़ोडली व लुटली हा हिंदुत्ववाद्यांच्या युक्तिवादाचा महत्वाचा भाग असतो. हे सत्य असले तरी पण हे पुर्ण सत्य नाही,अर्ध्य सत्य आहे. अरब, तुर्क, अफ़गाण इत्यादी आक्रमकांच्या टोळीवजा सैन्यांना नियमीत पगार दिला जात नसे, त्यांनी लुट करावी आणि लुटीतल्या हिश्श्यातून त्यांचा पगार घ्यावा अशी रीत असे. हिंदूंच्या मंदिरात खुप संपत्ती असे. आक्रमक सैन्य ही संपत्ती लुटत असे. लुटताना देवळे पाडत व संपत्ती वाटून घेत.
            आज दर्याकपारीत आणि डोंगरमाथ्यावरच्या ज्या देवळात संपत्ती नसे पण देव असत त्या देवळांच्या वाटेला हे आक्रमक सैन्य जात नसे. कारण काय ? देवळे पाडणे हे मुख्य नसून संपत्ती लुटणे हा मुख्य हेतु असे. जर हिंदू धर्मद्वेषातून देवळं पाडली म्हणायचे तर मग छोटी छोटी मंदिरे सहीसलामत कशी ? याचाच अर्थ की लुटीची संपत्ती मुख्य असत, तिथे धर्म दुय्यम होता. मुख्य हेतू साध्य करायला आवश्यक म्हणून देवळे पाडत. याच लुटीतील मोठा हिस्सा राजाकडे जाई. राजाचे उत्पन्नाचे ते एक साधन असे. देवळाभोवतील लोकांचे खच्चीकरण करणे, त्यांच्यात भय निर्माण करणे हा सुद्धा एक हेतू असे देवळे पाडण्यामागे. लोक श्रद्धाळू असतात, त्यांनी देव लुटला मग आम्हाला लुटायला काय वेळ लागणार आहे असे भय असे. त्यामुळे मुलुख जिंकणे सोपे जाई. त्याकाळातील देवळे केवळ धर्मकेंद्रे नव्हती तर संपत्तीची केंद्रे होती, मानाची केंद्रे होती आणि सत्तेचीही केंद्रे होती. हीच मुख्य कारणे ठरली देवळांच्या नाशाला.
            आजच्या हिंदुत्ववाद्यांच्या म्हणण्यानुसार मुस्लिमांनी धर्मद्वेषातून हिंदूंची देवळे पाडली. त्यामध्ये ते पंढरपूर, तुळजापूर या देवस्थानांची उदाहरणे देतात जी अफ़जलखानाने उध्वस्त केली असेही हिंदुत्ववाद्यांचं म्हणनं आहे. पण हेही विसरून चालणार नाही की, अफ़जलखान मराठा स्वराज्यावर चालून येत होता आणि हिंदुत्ववाद्यांच्या म्हणण्यानुसार वाटेतील देवळांची लुट व मोडतोड करत होता तर त्याच्याबरोबर अनेक हिंदू धर्मिय सरदार होते त्यांच्या भावना दुखावल्या नाहीत का ? तसेच तुळजाभवानीचे मंदिर अफ़जलखानाने तोडलं म्हणून हिंदुत्ववादी सांगतात, त्यावेळी अफ़जलखानाबरोबर पिलाजी मोहिते, शंकररावजी मोहिते, कल्याणराव यादव, नाईकजी सराटे, नागोजी पांढरे, प्रतापराव मोरे, झुंझारराव घाटगे, काटे, बाजी घोरपडे (रामदास स्वामींचा प्रिय शिष्य) आणि संभाजीराव भोसले हे उपस्थित होते हेही विचरून चालणार नाही. १७९१ मध्ये हिंदूंकडून लुटीत पतझड झालेलं देवी सारदेचं श्रुगेरीचं मंदिर मुसलमान टिपू सुलतानाने दुरुस्त केलं हे तर सर्वांना माहीत आहेच.
            अफ़जलखान तुळजापूर व पंढरपूर येथील हिंदूंची देवस्थाने फ़ोडत होता, त्यावेळी अफ़जलखानाचा ब्राह्मण वकील क्रुष्णा भास्कर कुलकर्णी हिंदू असून काय करत होता ? त्याला माहीत नव्हतं का ? की देवळावर आपलेच जातबंधू जगत आहेत, आणि मंदिरे फ़ोडली तर आमच्या जातीची रोजगार हमी योजना बंद होईल, म्हणुन मंदिरे पाडू नका. असे सांगून तरी किमान अफ़जलखानाचे मन परिवर्तन का केले नाही ? तीच गत सोमनाथ मंदिराची, गजनीच्या महंमदने थानेश्वरचा राजा आनंदपाल याच्याशी समझोता करून मग सोमनाथवर हल्ला केला, खरे तर आनंदपालने याची सुचना मंदिरामध्ये का दिली नाही ? महंमदाचे अनेक सेनाधिकारी व सैनिक हिंदू होते. मग तरीही त्या पापाचा वाटेकरी फ़क्त मुसलमान महंमद कसा ?
                शिवाय फ़क्त मुसलमानच देवळे पाडायचे असे म्हणने म्हणजे सुद्धा अडाणीपणाचे लक्षण आहे कारण फ़क्त मुसलमान राजेच देवळे लुटत होते हे सत्य नाही. हिंदू राजे सुद्धा संपत्तीसाठी हिंदूंची देवळे लुटीत असत.काश्मिरचा हिंदू राजा हर्षदेव याने बाराव्या शतकात हिंदूंचीसुद्धा मंदिरे लुटली आहेत. धातूसाठी मुर्ती वितळवी, वितळण्यापुर्वी त्यांच्यावर विष्ठा व मुत्र शिंपडून त्यांचा पवित्रभंग करी इत्यादिचे तपशीलवार वर्णन कल्हणाच्या "राजतरंगिणी" या ग्रंथात आहे. देवाच्या मुर्तीची विटंबना केली म्हणून त्या काळी दंगे झाल्याची नोंद मात्र नाही. मंदिरे तोडून ती लुटण्यासाठी राजा हर्षदेव ने खास देवोत्पतक नायक नावाने अधिकारी नेमला.(११९३ ते १२१०) कॅबी आणि दाभाई येथील जैन मंदिरे उध्वस्त केली. मंदिरातील उत्पनाची जी खाती होती त्यात त्याने "देवोत्पादन" हे खातेच उघडले होते. मंदिरातील लुटलेली संपत्ती या खात्यात जमा होत असत.म्हणजे देव-देवळे पाडण्यामध्ये हिंदू राजे पण काही मागे नव्हते तरीही देवंळाच्या लुटीचा इतिहास सांगताना केवळ मुस्लिमांचाच उल्लेख का केला जातो हे कोणता हिंदुत्वाचा ठेकेदार सांगेल का ?
              मुस्लिम राज्याला त्रासदायक ठरू लागले तर मुस्लिम राज्यकर्ते मुस्लिम धर्मगुरुंची, मुल्ला-मौलवींची सुद्धा पर्वा न करता त्यांनाही छळत. महंमद तुघलक याने मुल्ला व सय्यद यांच्या कत्तली केल्याचा आरोप बखरकारांनी नोंदवून ठेवलेला आहे. काही इतिहासकारांनी तर असे लिहिले आहे की, जहांगीर बादशहाला मुल्ला मंडळी एवढी घाबरत की तो आला की ते लपून बसत.म्हणजे देवळे पाडली व लुटली त्याला कारण राज्यच आणि देवळांना इनामे दिली किंवा देवळे दुरुस्त केली त्यालाही कारण राज्यच इथे धर्माचा काडीमात्र संबंध नाही. म्हणुनच मुस्लिमांनी जशी देवळे लुटली तशी हिंदू राजांनी सुद्धा हिंदूंची देवळे लुटल्याचे दाखले आहेत.
तात्पर्य काय ? त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या द्रुष्टीने राज्य महत्वाचे होते. धर्म महत्वाचा नव्हता. स्वत:चे राज्य स्थापायला आणि स्थिर करायला धर्माचा आधार घेतला पण धर्म मुख्य नव्हता, राज्य मुख्य होते आणि पूर्ण सत्य हे असे आहे.
संदर्भ :
देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे [प्रबोधनकार ठाकरे].
शिवाजी कोण होता ? [गोविंदराव पानसरे].
शिवचरित्र एक अभ्यास [सेतू माधव पगडी].
राजतरंगिणी [कल्हन पंडीत (अनुवाद डॉ.माधव व्यंकटेश लेले)].
छ.शिवाजी महाराज यांचे चरित्र [क्रुष्णराव अर्जुन केळूसकर].

27 December 2015

जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट तरी.....??

संतश्रेष्ठ तुकोबांच्या हयातीत मंबाजी भट-ब्राह्मण आणि त्यांचे सर्व साथीदार यांनी तुकोबांचा खुप कडाडून विरोध केला. त्यांचे अभंग नदीत बुडविले. गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली आणि तुका सदेह वैकुंठाला गेला अशी आवई मात्र जोरात उठवली. नदीत बुडवूनदेखील तुकोबांचे अभंग लोकांत राहिलेच. ते तेच म्हणू लागले आणि जेंव्हा अभंग बुडवूनसुद्धा आणि तुकोबांना संपवूनही तुकोबा संपत नाही असं दिसून आलं तेंव्हा मंबाजीचे सर्व प्रकारचे सर्व वारसदार तुकोबांचे कौतुक करू लागले. त्यांच्या अभंगात आपले फ़ुसके अभंग घुसडू लागले [त्यांचेच वंशज आजही आहेतच]. त्यांच्या अभंगावर कथा-किर्तने करू लागले.पण हे सगळे करताना एक करू लागले की तुकोबांनी अंधश्रद्धेवर व अन्यायावर जे कोरडे ओढले होते ते लोकांपर्यंत पोहचणार नाहीत अशी दक्षता घेऊ लागले.
असेच काही फ़ुसके क्षेपक अभंग तुकोबांच्या गाथेत आढळतात त्यातील एक प्रचलित म्हणजे "जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी ॥ [३०४०].तुकोबांची ब्राह्मणांविषयी ही आस्था आधिक ताणून "जरी  ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ असे भ्रष्ट ब्राह्मणांविषयी उदारतेचे उद्गार काढणारे तुकोबाराय" सर्वप्रथम श्री  अनंतदास रामदासींनी उभे केले; आणि ’तुका म्हणे तुम्ही देवा द्विज वंद्य’ [शा.२८८४] आदि अभंग पाहून "रुढ मुल्यांवर निष्ठुरपणे प्रहार करणारे तुकोबा शांत मन:स्थितीत पुन: रुढीपुढे नम्र होतात."हे मात्र सत्य नाही.जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी.[३०४०] हे तुकोबांचे म्हणणे केवळ औपरोधित किंवा अर्थवादात्मक आहे"(सा.सं.तु.प्रुष्ठ:१४०) वस्तुश: असली दोनचार वचणे हे गाथेच्या अंगावरील आगंतुक कोडच म्हंटले पाहिजे. असल्या भोंगळ वचनांच्या विरोधात तुकोबांची शेकडो युक्तियुक्त वचणे बाह्या ठोकून उभी आहेत.
यथार्तवाद सांडून उपचार बोलती ते अघोर भोगतील ! "तुका म्हणे आम्ही येथील पारखी । छंदावी सारिखी नव्हो ऐसी" माझ्या जातीचे वजनास बोल कोण ठेवू शके ? "सत्या नाही पाठीपोट" व "लटकियाची न करू स्तुती हिशेब आले ते घ्यावे" हीच तुकोबांची खरी कणखर भुमिका ! "गुण-अवगूण निवाडा " करणारा व "अवगुणी दंडण गुणी पुजा" हे न्याय्य ब्रिद सांभाळणारा तुकोबांचा ’निवाड्याचा ठाव’ असली बुद्धिभेद करणारी वचणे उच्चारूच शकत नव्हता,हे उघड आहे.[९६२, ११३७, १३६७, २३७६,२३७८,२७३५,३४८५,३५१८,(पं.५२४९),५३४७].
"पंडिता: समदर्शिन:" व "य.क्रियावान स पंडित:" यापैकी एकही गुण अंगी नसलेल्या पण अंगी ज्ञानपणाची मस्ती ठेवून इतरांना हिन,तुच्छ समजणार्या ब्राह्मणांना तुकोबा स्पष्टपणे सुनावतात की, "मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मुर्ती ॥","करी अनेकांचा अपमान । खळ छळवादी ब्राह्मण । तया देता दान । नरका जाती उभयता ॥".असे रोखठोक बाण्याचे तुकोबा; "ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो" म्हणणार्या शिवरायांच्या प्रणालीचेच होते. म्हणूनच तुकोबांनी ’भेदवाही’ व ’खळवादी वेव्हार’ करणार्या ब्राह्मणांना ’भ्रष्ट सुतकिया खेळ..विटाळ पातकी..न्यानगंडे ढोरे’ इ. शेलक्या शिव्या हासडल्या आहेत व नरकगामी म्हंटलेले आहे.(११२९, १३४५, २३३६, ३६७८, ४५०५)."महाराचा स्पर्ष झाल्यामुळे ज्या ब्राह्मण म्हणविणार्यास क्रोध येतो, तो खरा ब्राह्मणच नव्हे. " या दोषद्रुष्टीमुळे त्याच्या हातून जे पातक घडाले गेले, त्या पातकाला देहान्त प्रायचित्ताशिवाय अन्य प्रायश्चित नाही" हा रोखठोक निर्णय तुकोबा सुनावतात; किंबहुना तया प्रायश्चित काही देहत्याग करता नाही. असे त्यापुढेही एक पाऊल टाकतात. "यातिकुळ येथे असे अप्रमाण । गुणाचे कारण असे अंगी ॥" असे वारंवार झडझडून सांगणार्या तुकोबांनी कोणत्याही कर्मभ्रष्टाला श्रेष्ठत्व देणे शक्यच नाही. हे अभंग बळीच घुसडलेले आहेत.मग हे असले अभंग एखाद्या "सालो-मालो" चे असोत की "श्री समर्थप्रतापामधील एखाद्या हेळवाकीच्या अथवा बिडवीच्या रामदास्याचे असोत.
तुकोबा जर कोणा कर्मभ्रष्ट ब्राह्मणांनाही श्रेष्ठ म्हणू शकले असते तर त्यांचे साहित्य बुडविण्याचे महत्पाप कोणालाही करावेसे वाटले नसते. "सत्याचिया लोपे पापे घडती" या धारणेने तुकोबा सत्य तेच बोलायचे. शिवाय सामान्य समाज हा तत्कालीन ब्राह्मणांच्या नादी लागून आंधळ्याचे काठी लागलेल्या आंधळ्याप्रमाने देवधर्माला आचवन गर्तेत बुडत आहे हे द्रुष्य़ तुकोबांना डोळा देखेवेना. त्याकाळी ब्राह्मणांचे किती अंध:पात झाला होता याची शेकडो प्रमाणे तुकोबांच्याच नव्हे तर ब्राह्मण लेखकांच्याही साहित्यात मिळते.रामदासांचे शिष्य दिनकर गोसावी "स्वानुभव-दिनकर" ग्रंथात ब्राह्मण भांग सेवू लागल्याचे लिहिले आहे.किंबहुना "ब्राह्मण झाले दासीगमनी" असे वर्तवले आहे. समर्थबंधु "श्रेष्ठ" यांनी सुद्धा "तपसत्यविहिन द्विज परान्न प्रद्रव्य परस्त्रीलोलुप" होऊन "तीर्थव्रतादि करणारांचा उपहास" करीत, "वेदशास्त्र पुराण"च नव्हे, तर "कन्याविक्रय"करीत. "दुष्टदेवा दुष्टपरिग्रह दुराचारी दुराग्रह व मद्यमांसाशन" हेच ब्राह्मणांचे स्वरूप झाले होते असे म्हंटले आहे(भक्तिरहस्य). खुद्द रामदास स्वामी सुद्धा "ब्राह्मण बुद्धिपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले ॥", ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले, मिथ्या अभिमान गळेना मुर्खपणाचा, आदि वचणं बोलीले आहेत. संत कान्होबा म्हणतात, "उत्तम ब्रह्मकर्म सोडून अठरा यातीचे व्यापार ब्राह्मण करत."
ब्राह्मणांचा देह शुद्रकर्मासाठी नसतो असे भागवत म्हणते. वेदाखेरीज अन्य कार्य करणारा ब्राह्मण जीवंतपणीच शुद्र होतो. अशीही स्म्रुती आहे. तरीपण व्याजबट्याचा व्यवसाय ब्राह्मणांनी सर्वत्र स्विकारलेला दिसतो आणि स्म्रुतीनियमाप्रमाणे असे करणे पाप होते. साता दिवसांचा जरी झाला उपाशी । तेने किर्तनासी सोडू नये ॥ हे तुकोबांचे नि:स्प्रुह लोकशिक्षणव्रत म्हणजे ब्रह्मकर्मावर आक्रमण वा अपराध म्हणता येईल का ? ब्राह्मण वेदविद्वांस मद्यमांस, अंगीकरून भेद न देखता खुशाल गोंधळ घालायचे, केवळ पिंडाचे पाळण करण्यासाठी पुण्यविकारा करायचे किंबहुना आचार सांडून अधर्मा टेकायचे, चहाड्चोर व्हायचे. अर्थात त्याकाळी बहुतांशी ब्राह्मण वंदाया पुरते तणसाचे वाघ होऊन राहिले होते आणि आपली आब्रु वाचवण्यासाठी "ब्राह्मण जरी झाला भ्रष्ठ । तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ" असल्या बिनबुडाच्या पाट्या रंगवाव्या लागत होत्या. मग अशांना "हिन सुकराच्या जाती" म्हणून तुकोबांनी संबोधले तर चुकले कोठे ?.
सर्वात महत्वाचे म्हणजे ब्राह्मण त्याकाळी वयक्तिक चरित्रच गमावून बसला होता असे नाही. तर स्वदेश, स्वभाषा व स्वदेशधर्म आपल्या शुद्रस्वार्थापायी कोळून पिताना दिसत होता.
सांडुनिया रामराम । ब्राह्मण म्हणती दोमदोम । 
तुका म्हणे व्रुत्ती । सांडूनी गदा मागत जाती ॥(७९३)
पोटासाठी खौसा । वंदिती म्लेच्छांच्या ॥ (३०३५)
हे निरुपायाने आपदधर्म म्हणून ते करीत होते, असेही नाही.स्वार्थ बुडविली आचरणे (३९२२) असे तुकोबा सांगतात तर रामदास म्हणतात."कित्येक दावलमलकास जाती । कितेक पिरास भजती । कितेक तुरूक होती । आपुले इच्छेने ॥" इथे आपुले इच्छेने  हे शब्द विशेष लक्षणीय आहेत.
एकूण ब्राह्मणवर्ग परधर्मिय मुसलमानांच्या सेवेत गर्क झालेला असून त्याची नीतिमत्ताही सामान्य जनांच्या पातळीवर आलेली होती. ब्राह्मण वर्गात अमुक एक गोष्ट न करणारा असा राहिला नव्हता असे त्र्यं.शं.शेजवलकर म्हणतात. वि.का.राजवाडे देखील मान्य करतात की "घाटांचे दर्गे बनले आणि राऊळाचे महल झाले, फ़ार काय सांगावे, ब्राह्मण दावलमलकादि पीरांना भजू लागले. कित्येक ब्राह्मण पीरांचे मुजावरही बनले ! ते बहुतेक मुसलमान बनन्यासारखे झाले, इतकेच की त्यांनी सुनतेची दिक्षा मात्र घेतली नाही, तीही त्यांनी घॆतली असती, परंतू त्यांच्या आड एक मोठी धॊंड आली ती धॊंड म्हणजे महाराष्ट्रातील साधूसंत होते." याच साधुसंतांचे मुख्य प्रतिनिधी शिवबालकिल्यात संतश्रेष्ठ तुकोबा हे होते आणि ते "झाडू संतांचे मारग" या प्रतिज्ञेने कटिबद्ध होऊन भक्तिच्या सुगम मार्गाने संपुर्ण बहुजन समाजाची उन्नती सारी शक्ती एकवटून करू पाहत होते.
अवघ्या दूर्बळ जगात "दुर्बळांच्या नावे डोंगारा पिटून" आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी ब्राह्मणांनी जो ’लटकियाचा वाहो’ म्हणजे असत्य रुढ्यांचा हैदोस चालवला होता, तो जनजाग्रुतीद्वारे हाणुन पाडण्यासाठी "गाडीन मी भेद । प्रमाण तो यासी वेद ॥" अशी प्रतिज्ञा तुकोबांना करावी लागली. भेद वाढवणार्या धर्मठकांची रोखठोक पणे "वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा" या आत्मविश्वासपुर्ण घोषणेने तुकोबांनी इंद्रायणीच्या वाळवंटात समतेचा झेंडा रोवला.ही घटना अटकेपार झेंडा रोवण्याच्या घटनेपेक्षा कमी नव्हेच, उलट आधिक गौरवाची आहे.
म्हणुनच "वर्ण-अभिमाने कोण झाले पावन । ऐसे द्या सांगूण  मजपाशी ॥
अत्यंजादि योनी तरल्या हरीभजणे । तयांची पुराणे भाट झाली ॥
            असे ठणकावून वर्णव्यवस्थेची रेवडी उडवून टाकणारे तुकोबा कोणत्याही कर्म-भ्रष्ट झालेल्या ब्राह्मणाला सर्वश्रेष्ठत्वाचे प्रमाण दिले असेल असे ज्यांना वाटेल त्यांना वाटो पण हा अभंग निश्चितच क्षेपक आहे.
संदर्भ : 
संतश्रेष्ठ श्री तुकोबांच्या अभंगगाथा [शासकीय,पंढरीप्रत,श्री पडवळ संपादित]
श्री.शिवछत्रपती(प्रुष्ठ क्र.३४) [त्र्यं.शं.शेजवलकर].
छ.शिवाजी महाराजांची पत्रे(प्रुष्ठ क्र.१६७)- [प्र.न.देशपांडे].
संतश्रेष्ठ तुकाराम : वैकुंठगमन की खून ? [साहित्यरत्न सुदाम सावरकर].
गीता (अ. ६-श्लो. १८) [व्यास].
महाभारत (शां.२६५-९) [वाल्मिकी].
भागवत (११-१७-४२).
स्वानुभव-दिनकर (९-२-७७)[दिनकर गोसावी].
भक्तिरहस्य (२-३९,४०.७३-४६,४८).
पहिला सुमनहार (प्रुष्ठ क्र.१२७) [श्री अनंतदास रामदासी].
दासबोध (१४-७-३१ते ३९)[समर्थ रामदास].
संत आणि समाज(प्रुष्ठ क्र.१२०) [श्री कारखाणीस].

10 March 2014

अमर जाहले शंभुराजे !

शिवशाहीर जगदीशचंद्र पाटील
बुलढाणा
|| जय शिवराय | जय शंभुराजे | जयोस्तु मराठा | जयोस्तु महाराष्ट्र ||
              मराठा स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजे म्हणजे जगातील इतिहासकारांचं न सुटलेलं कोडंच आहे. शंभुराजे या महानायकाने हिंदुस्तानातील हजारो साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना, चित्रपट निर्मात्यांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजांचे चरित्र लोकांसमोर मांडले.ते सुद्धा बर्याच प्रमाणात विक्रुत चरित्र. शंभुराजांच्या विषयी उणीउरी दोनशे वर्षे गैरसमजांचे जे पिक आले, त्याला कारणीभूत होती ती मल्हार रामराव चिटणीसची बखर; परंतू कै.वा.सी.बेंद्रे यांनी चाळीस वर्षे कष्ट घेऊन शंभुचरित्राचा खरा इतिहास उभा केला आणि जाज्वल्य इतिहासातून अनेक लेखकांना दिव्य द्रुष्टी दिली. त्यामध्ये शिवाजी सावंत, डॉ.जयसिंगराव पवार, विश्वास पाटील, डॉ.कमल गोखले, विजय देशमुख यांसारख्या विद्वानांनी खरे आणि भव्य दिव्य असे  शंभुराजांचे चरित्र जनमानसांसमोर आणले. शंभुराजांनी वयाच्या नवव्या वर्षापासून राजकारणाचे धडे घेतले. हिंदी व संस्क्रुतमध्ये कमी वयात चार ग्रंथ लिहिणारे शंभुराजे एकमेव साहित्यिक होते. मोअज्जमच्या छावणीत शिवरायांनी त्यांना दोन वर्ष पाठविले होते. वयाच्या चौदाव्या वर्षी ते राजकारभारात लक्ष घालू लागले आणि वयाच्या सतराव्या वर्षी रायगडावर युवराज म्हणून घोषित झाले.एकोणीसाव्या वर्षी पन्हाळा, श्रुंगारपूर आणि प्रभावलीचे सरसुभेदार म्हणून नेमले गेले.
        छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार ते दिलेरखानाच्या गोटात गेले आणि स्वराज्यावर होणारे मोघली आक्रमण काही काळ थोपवून धरले. या वेळेस छत्रपती शिवराय दक्षिण मोहिमेवर गेलेले होते. शंभुराजे जालन्याकडील लढाईवर गेले असता, थोरले महाराज निधन पावले. महाराजांच्या निधनाचे व्रुत्त आणि राजाराम महाराजांना गादीवर बसविण्याचे कारस्थान त्यांना पन्हाळ्यावर कळले. त्यानंतर त्यांनी पन्हाळ्यावरूनच कारभार पाहिला. या ठिकाणी शेकडो मराठे त्यांना येऊन मिळाले. रायगडावरील कट करणार्यां प्रधानमंत्र्यांनी शंभुराजांना अटक करण्याचा प्रयत्न केला; परंतू तो त्यांनी हाणून पाडला व स्वत: रायगडावर दाखल झाले. शिवरायांच्या काही मंत्र्यांनी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार समजताच सर्वांना त्यांनी देहान्त शासन केले. या शिक्षेमध्ये बाळाजी आवजी चिटणीसचा समावेश होता. बाळाजी हा मल्हार रामराव चिटणीसचा खापरपणजोबा होता. आपल्या खापर पणजोबाला शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते. म्हणून त्यांचा सूड घेण्यासाठी तब्बल १२२ वर्षांनी मल्हार रामरावाने शंभूराजांच्या चरित्राची बखर लिहून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले. पण असल्या गोष्टी इतिहासाला मानवत नसतात. शंभुराजे हे साधुसंतांचा आदर करणारे होते. छत्रपती शिवरायांच्या अलौकिक व्यक्तिमत्वातून हे शंभुतेज प्रकटले होते. आपल्या अचाट पराक्रमाने शंभुराजांनी मराठा स्वराज्याच्या सीमारेषा वर्धिष्णू करीत या तेजाची दाहकता सिद्ध केली होती. शिवरायांच्या निधनानंतर अवघं मराठा स्वराज्य नेस्तनाबूत करण्याच्या प्रचंड महत्वकांक्षेने सात लाखांच्या अफ़ाट फ़ौजेसह दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला नामोहरण करून सोडणं ही काही समान्य बाब नव्हती. या बलाढ्य मोगली सल्तनतीशिवाय जंजिरेकर सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रजांसारखे शत्रूदेखील स्वराज्याचे लचके तोडायला एकवटून उभे झालेले होते. हे कमी पडावेत म्हणुन की काय आमच्यातलेही हिंदू विरोधकही तलवार उपसून सज्ज उभे होतेच. या सर्व आघाड्यांवर मराठा स्वराज्याच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी सांडलेली संभाजी राजांची एकाकी झुंज, ही निर्विवादपणे त्यांच्या महानतेची आणि पराक्रमाची यथार्थ सक्ष देऊन जाते.उण्यापुर्या नऊ वर्षाच्या अखंड संघार्षात सुमारे सव्वाशे लढाया जिंकणारे आणि एकही तह न करणारे संभाजीराजे अलौकिक आणि असामान्य होते. अशा कडव्या धेयवादासाठी आणि अस्मितेसाठी काळीज आणि मनगट संभाजीराजांचेच हवे.येर्यागबाळ्याचे ते काम नव्हे.
           वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षीच संभाजीराजांनी स्वराज्यकार्यी हौतात्म्य पत्करले. अटकेत असताना संभाजीराजांच्या दीर्घाकाळ यमयातना सुरु होत्या.तोज एक एक अवयव तोडल्या जाऊन त्यांच्या संपुर्ण अंगाची साल सोलून काढण्याच आली.डोळे काढून जीभ कापल्या गेली. पायापासून ते मस्तकापर्यंत अवघ्या देहाची खांडॊळी करून संभाजीराजांचे मस्तक भाल्याच्या टोकावर रोवण्यात आले. देह खंडित झाला तरीही शंभुराजांचा स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा अभेदच राहिली. कारण शिवशाहीची हीच उदात्त शिकवण होती. छत्रपती शिवरायांच्या आदर्श पावलांवर पाऊल टाकीत या सिंहपुत्राने बलिदानाची, त्यागाची एक नवी परंपरा राष्ट्राला समर्पित केली. जिला देशातच काय पण जगाच्या इतिहासात तोड नाही. 
रणधुरंदर महापराक्रमी शंभुराजांना मानाच मुजरा... जय शंभुराजे

16 January 2014

मराठा सेवा संघ बदलतो आहे?

             सिंदखेडराजाला १२ जानेवारीला होणारा मराठा सेवा संघाचा जिजाऊ महोत्सव. या सार्‍या उत्सवांना लाखोंची गर्दी असते. हे उत्सव आयोजित करणार्‍या संस्था, संघटना या महाराष्ट्राचे राजकारण व समाजकारणावर निर्णायक प्रभाव टाकणार्‍या असल्याने स्वाभाविकच या उत्सवांमध्ये कुठले निर्णय होतात, कार्यकर्त्यांना कुठली दिशा दिली जाते, याकडे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसोबतच माध्यमांचंही बारकाईने लक्ष असतं.
महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्‍याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा उत्सव आणि
         या संघटनांमध्ये मराठा सेवा संघ ही तुलनेने नवी संघटना. मात्र केवळ २४ वर्षांच्या कालावधीत या संघटनेने सार्‍याच क्षेत्रातील दिग्गजांना दखल घेणे भाग पडावे, असे आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच जिजाऊ महोत्सवात काय निर्णय होतात, याबाबत सार्‍यांनाच उत्सुकता असते. मराठा सेवा संघाबद्दल त्यांचे टीकाकार, विश्लेषक काहीही म्हणो, मात्र महाराष्ट्राच्या समाजजीवनात त्यांनी घडविलेले काही बदल कोणालाच नाकारता येणार नाही. मराठा सेवा संघाचं सर्वात मोठं कुठलं योगदान असेल, तर हजारो वर्षे चुकीच्या रूढी-परंपरा आणि कर्मकांडांचा जबरदस्त पगडा असलेल्या बहुजन समाजाला त्यांनी खडबडून जागं केलं. इतिहासाचं जाणीवपूर्वक केलेलं विकृतीकरण या समाजाच्या लक्षात आणून देताना त्यांना त्यांच्या सत्त्वाची जाण सेवा संघाने करून दिली. असं म्हटलं जातं की, पोथी वाचणार्‍या समाजाला सेवा संघानं पुस्तकं वाचायला शिकविली. ते खरंच आहे. धार्मिक पोथी, पुराणांशिवाय काही न वाचणार्‍या समाजाला सेवा संघानं फुले, आंबेडकर वाचायला लावले. हे परिवर्तन खूप मोठं आहे. सामाजिक समरसता वगैरे अशा भंपक गोष्टी न करता एका समाजाची मानसिकता बदलविण्याचं मोठं काम सेवा संघानं केलं आहे. एका मोठय़ा समूहाला आत्मभान देणारं हे परिवर्तन आहे. हा असा बदल घडवायला शेकडो वर्षे जातात. 
         मात्र २५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत सेवा संघाने हे काम केलं. दुसरं महत्त्वाचं कुठलं काम सेवा संघानं केलं असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था अशा जातीयवादी आणि समाजात द्वेषाची पेरणी करणार्‍या संघटनांविरुद्ध ताकदीने शड्ड ठोकला. सरकार नावाची यंत्रणा आणि इतर पुरोगामी संघटना या संस्थांचा मुकाबला करताना सपशेल अयशस्वी ठरत असताना सेवा संघाने वैचारिक मार्गाने आणि वेळप्रसंगी मैदानातही या संघटनांना जबरदस्त आव्हान दिले. बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण करायला निघालेल्या या संघटनांच्या कारवायांना सेवा संघाने बर्‍यापैकी चाप लावला हे कबूल करावंच लागतं. पुरोगामी विचारसरणीचा पुरस्कार करणारा एक जबरदस्त दबाव गट सेवा संघाच्या निमित्ताने महाराष्ट्रात तयार झाला. हे परिवर्तन करताना मराठा सेवा संघालाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखाच द्वेषाचा मार्ग पत्करावा लागला. ब्राह्मण समाजाला टार्गेट करून इतर जातीयवादी संघटनांप्रमाणेच स्वतंत्र विचार न करू शकणारी पिढी सेवा संघाने तयार केली, असा आरोप त्यांच्यावर होतो. या आरोपात काही अंशी तथ्यांश निश्‍चित आहे. सेवा संघाच्या प्रारंभीच्या काळात आणि अगदी आताआतापर्यंतही देशातील प्रत्येक समस्येला ब्राह्मण जबाबदार आहेत, अशी मांडणी सेवा संघाकडून होत होती. कुठलाही अपवाद न करता सरसकट सर्व ब्राह्मणांना सेवा संघाचे नेते आडव्या हाताने घेत होते. ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या सर्व प्रथा, परंपरा मोडित काढल्या पाहिजेत, आर्यांनी (ब्राह्मणांनी) या देशावर आक्रमण केल्यानंतर येथील समाजाला गुलाम केल्यानंतर ज्या-ज्या गोष्टी लादल्या, त्या सार्‍या नाकारायचा चंग सेवा संघानं बांधला. त्यातून मग गुलामगिरीची सारी प्रतीकं झिडकारून लावायचे आवाहनही सेवा संघाच्या विचारपीठावरून करण्यात येत असे. 
         अगदी आताआतापर्यंत महिलांनी मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये, बांगड्या घालू नये, असे ठासून सांगणारे काही वक्ते जिजाऊ महोत्सवात असायचे. हिंदू धर्मातील बहुसंख्य ज्यांना देव म्हणून भक्तिभावानं पूजतात, ते आपले देव असू शकत नाही, असेही सांगितले जात असे. हा सर्व प्रचार सनातन व्यवस्थेविरुद्ध एल्गार पुकारण्यासाठी व्यूहरचना म्हणून कदाचित ठीक असेल, पण यातून सामान्य कार्यकर्त्यांच्या डोक्यात जबरदस्त गोंधळ तयार होत होता. तसंही देवाधर्माच्या विषयात हात टाकला की सॉलिड केमिकल लोचा निर्माण होतो, हा पुरोगामी संघटनांचा नेहमीचा अनुभव आहे. मराठा सेवा संघही सध्या या अवस्थेतून जात आहे. त्यामुळेच परवाच्या जिजाऊ महोत्सवात डॉ. आ. ह. साळुंखे यांनी सुधारित शिवधर्मगाथेबद्दल माहिती देताना मानवी स्वातंत्र्यांचा आदर करण्याचे आवाहन करताना महिलांनी मंगळसूत्र घालावे की नाही, कुंकू लावावे की नाही, बांगड्या घालाव्या की घालू नये, हा त्यांचा अधिकार आहे. या विषयात जबरदस्ती करता येणार नाही, अशी भाषा वापरली तेव्हा सेवा संघाचे अनेक कार्यकर्ते चमकले. सेवा संघ बदलत तर नाही ना, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. जिजाऊ महोत्सवाचे अनेक वर्षांपासून वार्तांकन करणार्‍या वार्ताहरांनाही सेवा संघ बदलतो आहे, काहीसा सौम्य होत आहे, हे या वेळी जाणवले. कधी काळी क्रिकेट या खेळाची तीन लाकडं आणि अकरा माकडं अशा वाक्यात संभावना करणारा सेवा संघ आता एका क्रिकेटपटूला मराठा विश्‍वभूषण पुरस्कार देतो, ही विसंगतीही अनेकांना खटकली. अर्थात, रेखाताई खेडेकरांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यासारख्या अनेक विसंगती सेवा संघाच्या प्रवासात दाखविता येतात. मात्र सेवा संघाच्या विचारपीठावर आणि कोअर मीटिंगमध्ये त्यावर वेळोवेळी मोकळेपणाने चर्चाही होते. या लेखाचा तो विषय नाही. सेवा संघ बदलतो आहे का, हा मुद्दा आहे. या विषयात सेवा संघाच्या जडणघडणीत सुरुवातीपासून सहभागी असलेल्या काही जणांसोबत चर्चा केली असता त्यांनी सेवा संघ निश्‍चितपणे बदलत आहे, हे मान्य केले. मात्र हे बदल वैज्ञानिक बदल असून संघटनेला निकोप वाढीकडे नेणारे बदल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ब्राह्मण समाजाबद्दलचा आक्रमक प्रचार आणि प्रतीक नाकारण्याबाबतचा टोकाचा अट्टाहास याबाबत सेवा संघामध्ये प्रारंभापासूनच दोन मतप्रवाह होते. 
         एक गट इतिहासाचं विकृतीकरण ज्यांनी केलं, ज्यांनी वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था निर्माण करून बहुजन समाजाला हजारो वर्षे गुलामगिरीत ठेवलं त्यांच्याबद्दल आक्रमकतेनेच बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे आणि त्यांनी निर्माण केलेली सारी प्रतीकं उखडून फेकली पाहिजे, नाकारली पाहिजे, या मताचा होता. दुसरा गट मात्र हजारो वर्षांच्या माथी मारलेल्या का होईना परंपरा, प्रतीकं काही दिवसात मोडीत काढता येत नसतात. तसेही माणसं जबरदस्तीने बदलत नसतात. त्यामुळे वैयक्तिक आचरणाबाबत कुठलेही फतवे काढू नयेत. माणसं तयार झालीत की त्यांचे अपसमज आपोआप मोडित निघतात. त्यामुळे टोकाचा विचार न करता चळवळ निकोप आणि सशक्त केली पाहिजे, या मताचा होता. कोणं कोणत्या जातीत जन्माला यावं हे कोणाच्याच हाती नसतं. त्यामुळे ठरावीक समाजाबद्दल न बोलता प्रवृत्तीला विरोध असला पाहिजे, असेही हा गट आग्रहाने सांगत होता. शेवटी डॉ. आ. ह. साळुंखेंसारख्या ज्यांचा इतिहास, धर्म, संस्कृती, समाजशास्त्राबद्दल प्रचंड अभ्यास आहे, त्यांना भूमिका ठरविण्याचे अधिकार देण्यात आले. डॉ. साळुंखे यांचा लौकिक हा अतिशय संतुलित व निकोप विचार करणारा विचारवंत असा आहे. त्यांनी शिवधर्मगाथेतील बदलाबाबत सांगताना, 'लढाई ही ईश्‍वराच्या अस्तित्वाबद्दल कधीच नव्हती. संघर्ष हा शोषणाविरोधातला आहे. त्याविरोधात ठामपणे उभं राहून समतेची शिकवण देणं हाच शिवधर्माचा गाभा आहे,' असे सांगितले. हे त्यांचं सांगणं समजून घेण्याजोगं आहे. 
            विवेकवाद आणि विवेकाचा आधार हीच सुजाण म्हणविणार्‍या सर्वांची जगण्याची पद्धत असली पाहिजे. त्यातही परिवर्तनाच्या चळवळीत काम करणार्‍या माणसांनी चळवळीच्या वाढीसाठी आवश्यक ते बदल स्वीकारले पाहिजे. बदल हा शेवटी माणसाचा स्थायिभाव आहे आणि तसंही कट्टरता ती कोणाचीही असो, शेवटी ती नुकसानच करते. त्यामुळे रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना एका व्यापक उद्देशाने मराठा सेवा संघात सकारात्मक बदल होत असेल, तर त्याचं स्वागतच करायला हवं. 

(लेखक दैनिक 'पुण्य नगरी'चे कार्यकारी संपादक आहेत.) भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

8 September 2013

मराठा स्वराज्याची निशाणी : भगवा

           इतिहासामध्ये रामदासांचे  महत्व वाढविण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी व अभिमान्यांनी अनेक भाकडकथा त्यांच्या चरित्रात घुसडून ठेवल्या आहेत.एखाद्या क्षेत्राचे महत्व वाढवण्याचे झाले तर लगेच त्या क्षेत्राचे "महात्म्य" प्रसिद्ध केले जाते,त्याचप्रमाणे पुर्वीच्या थोर पुरुषांच्या चरित्रातील अनेक गोष्टी जशाच्या तशाच फ़ारतर थोडा फ़ेरफ़ार करून रामदासाच्या चरित्रातही घुसडलेल्या आहेत.गुरुचरित्रात नरसिंह सरस्वतीच्या म्हणुन ज्या चमत्कारांच्या कथा दिलेल्या आहेत.त्यापैकी बर्याचशा रामदासाच्या चरित्रात आलेल्या आहेत.या रामदासी कथांबद्दल लिहिताना "न.र.फ़ाटक" यांनी आपल्या "रामदास व शिवाजी" या लेखात लिहिले आहे की "रामदासी चमत्काराच्या ज्या दुसर्या कथा आहेत, त्या पुर्वीच्या व नंतरच्या साधु संतांच्या चमत्काराशी जुळणार्या आहेत, इतकेच नव्हे तर काही कथा इतर साधू संतांच्या चरित्रातून घेऊन रामदासाच्या चरित्रात भरल्या आहेत की काय असा संशय येतो.आपल्या गुरु च्या जीवनकथेत कसलीही उणीव राहू नये व दुसरा कोणताही संत कोणत्याही बाजूने आपल्या गुरुपेक्षा श्रेष्ठ दिसू नये, असा संकल्प करून सांप्रदायिक लोक रामदासाची चरित्रे लिहावयास बसल्यानंतर चमत्काराचा तुटवडा कसा उत्पन्न होणार ? उदा.सरस्वती गंगाधरचे गुरुचरित्र आणि रामदासाचे चरित्र ही एकमेकांशी ताडून पाहिल्यास वरील विधानाची सत्यता अंतरंगात ठसेल.",न.र.फ़ाटक यांनी यापुढे अनेक उदाहरणे देऊन हे विधान स्पष्ट केले आहे.
 छत्रपती शिवाजी महाराजांनी विरक्त होऊन एकदा आपल्या तथाकथित गुरुच्या म्हणजे रामदासाच्या झोळीत आपले राज्य अर्पण केल्याचा  कागद टाकून दिला आणी रामदासाने तो कागद शिवरायांना परत देऊन मला गोसाव्याला राज्य काय करावयाचे आहे.तुज राज्य चालव फ़क्त माझ्या स्वामित्वाची खूण म्हणून आपल्या राज्याचे निशाण भगवे कर म्हणजे झाले असे सांगितले.अशी कथा जी सांगितली जाते ती वरील मसाल्याचीच आहे.या कथेलाही ऐतिहासिक आधार नाही.न.र. फ़ाटक लिहितात की,"शत्रुला जिंकून राज्य अर्पण करण्याची कल्पना अतिशय प्राचिन काळापासून हिंदू वाड्मयात प्रचलित आहे.युधिष्ठिरने कौरवांच्या पराभवानंतर राज्य ब्राह्मणाला समर्पिल्याचे वर्णन महाभारतात आहे.वसिष्ठ ला रामचंद्रांनी राज्य दिल्याची कथा आहे.रजपुतांच्या इतिहासात" अशी उदाहरणे सापडतात.गोपीचंदाचा राज्यत्याग हा या कथापरंपरेतीलच एक दुवा आहे." शिवाय थोडीशी मिळालेली जहागीर ज्याला सोडून देता आली नाही,त्याने मिळालेले राज्य परत केले असे म्हणजे हा निव्वळ ढोंग आहे.
छत्रपती शिवरायांचे भगवे निशाण पाहून रामदासाच्या झोळीत राज्यार्पण करण्याची इच्छा रामदासाच्या भक्तांना झालेली दिसते.रामदास साधूपुरुष होते तेंव्हा सन्याश्याच्या भगव्या वस्त्राची जोड शिवरायांच्या भगव्या निशाणाशी घालून दिली की ठिक जमेल असे समजून ही कथा रामदासाच्या चरित्रात घुसडलेली दिसते.पण या चरित्रकारांनी जात विचार केलेला दिसत नाही.कारण रामदास हे संन्याशी नसल्याने ते इतर सन्यांश्यांसारखे भगवे वस्त्र न वापरता विटकरी रंगाचे वस्त्र वापरत होते जिथे स्वत:चे वस्त्रच भगवे नव्हते तिथे शिवरायांच्या झेंड्याला भगवे वस्त्र कोठून देणार ?.
बर्याच इतिहासकारांनी भेगवा झेंडा या विषयावर प्रकाश टाकलेला आहे.भगवा झेंडा शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून असून तो शहाजीराजांनी सुरु केलेला आहे.हे मत कोणत्याही भटोबाला किंवा रामदासी भक्ताला खोडता आलेले नाही."रामदास आणि शिवरायांची भेट झालीच नाही असे बर्याच इतिहासकारांचे म्हणने आहे.तरीही थोडा वेळ मानले की शिवराय आणि रामदासांची भेट झाली तर ती १६७६ मध्येच.त्यावेळी शिवराज्याभिषेक होऊन दोन वर्षे झाली होती व त्याआधीच भगवा सर्वत्र फ़डकत होता.यावरून भगव्या झेंड्याचा संबंध रामदास स्वामींशी लावण्यात अडचण येत आहे." बरे रामदासांच्या सांगण्यावरून भगवा झेंडा शिवरायांनी घेतला असे मानल्यास पुर्वी राज्य कमविताना निशाण कोणते होते याचाही उल्लेख कोठे आढळत नाही, हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे.
"छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे पराक्रमी होते.पाच पातशाहीत त्यांनी सन्मानामे नोकरी केली.मोठमोठ्या लढाया मारल्या.कर्नाटकात फ़ार मोठा मुलुख जिंकला व तंजावरचा पाया घातला.आपला अंमल जाहीर करण्याला व सैन्याच्या हालचालीला निशाणीची म्हणजे झेंड्याची गरज असते.त्यासाठी शहाजीराजांनी आपले निशाण भगवे केले."शेडगांवकरांच्या बखरीच्या छापिल पुस्तकात १३ व्या पानावर पुढील मजकूर आहे.दुसरी लढाई जाधवराव वजीर व राजे यांची जाहली नंतर शहाजीराजे हे कोथळा पर्वत चढोन शिखरावर फ़ौजेसुदा राजघाटाने चढून गेले,त्या दिवसापासून राजघाट असे अद्याप म्हणत आहेत.श्रीशंभु महादेव यांचे दर्शन करून शंभुचे भगवे वस्त्र प्रासादिक ते आम्हांस वंद्य हे जाणुन शहाजीराजे यांना त्याचक्षणी आपली लष्कराची ढाल भगवी व हत्तीवरील निशाण व घोड्यावरील डंका निशाण भगवे." त्याच दिवसापासुन तीच चाल आजपावेतो चालत आहे.परंतू पुर्वीचे मुळ ठिकाण उदेपुरास निशाण पाच रंगाचे तिकडे आहे हे सुर्यवंशी राणाजी म्हणोन तेच निशाण पुर्वीचे आहे.शहाजीराजे यांनी शंभुचे ठिकाणी तळीचे ठिकाणी तळ्याचे चिरेबंदी ताल बांधावयाचे काम सुरु केले.नंतर तेथुनच कुच दरकुच करून विजापुरास लढाई करीत करीत गेले.शके १५४८ क्षयनाम सवतसरे फ़सली सन १०३६ या साली तेथे जाऊन सुलतान महमदशहा पातशहा याची व शहाजीराजे या उभयतांचे भेटीचा समारंभ जाहला."
"शेडगांवकरांच्या बखरीतील काही गोष्टी चुकीच्या ठरतील.कालाची संगती त्यात कोठे कोठे बरोबर रहिलेली नाही.बखर लिहिणार्यास गोष्टी जशाजशा आठवल्या तसतशा त्याने त्या लिहिल्या आहेत.तथापि शेडगांवकरांचा राजघराण्याशी निकट संबंध होता. व निशाण बदलण्याची गोष्ट सर्व घराण्यांत घडून आल्याने तिची माहीती कर्णोपकर्णी सर्व भोसल्यांना असलीच पाहिजे.आपले निशाण पुर्वी कसले होते आणि ते पुढे काय कारणाने केंव्हा बदलले ही माहीती बापापासून मुलाला व आजापासून नातवाला मिळणे साहजीकच आहे.मुळचे निशाण उदेपुरचे पाचरंगी होते.पण शंभुप्रसादानंतर ते भगव्या रंगाचे शहाजीने केले असेही ही बखर सांगते."
शहाजी राजांना शंभु महादेवाची भक्ती विशेष होती असे दिसते.म्हणूनच त्यांनी आपल्या थोरल्या मुलाचे नाव शंभु ठेविले.यापुर्वी या घराण्यात शंभु हे नाव आढळत नाही.दुसरा पुत्र शिवाजी यांचेही नाव शिव हे शंभुमहादेवाचेच आहे. नामदार भास्करराव जाधव यांनी शहाजीराजांनी हे भगवे निशाण स्वीकारले तो प्रसंग किती आणीबाणीचा होता ते वर्णन करून संकटकाली कुलस्वामीचा प्रसाद म्हणूनच भगव्या निशाणाची उत्पत्ती झाली असे लिहिले आहे.पुढे ते लिहितात की "विजापुरच्या अदिलशहाची भेट सन १६२६ मध्ये झाली असे का.स.प.या. पान.४१०  यावरून उघड होते. यापुर्वी थोडेच दिवस भगवे निशाण शहाजी राजांनी सुरु केले होते.म्हणून शहाजींच्या पुणे व सुपे जहागिरीत हे निशाण शिवजन्माच्या अगोदरच फ़डकू लागले होते.शिवाजी राजांस बालपणापासूनच भगव्याचा अभिमान वाटत होता व त्याच निशाणाखाली लढून त्यांनी व त्यांच्या सरदारांनी हिंदुपदपातशाही स्थापना केली."
"राज्याभिषेक करूण घेतांना छत्र,चामर,सुर्यपान,सिंहासन वगैरे राजचिन्हे धारण करावी लागली.त्यावेळी छत्रपतींच्या उच्च दर्जास साजेल असा जरीपटकाही स्वीकारला.पण भगवे निशाण हे आपल्या कुलस्वामींच्या स्मरणार्थ आहे व तय त्या कुलस्वामींच्या प्रसादाच्या दिवसापासून आपल्या घराण्याचा खरा उदय झाला ही गोष्ट स्मरून छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा झेंडाही चालू ठेवला.सध्या मोठया समारंभाच्या वेळी जरीपटका भगव्या झेंड्याबरोबरच मिरवण्यात येतो.कायम सतत फ़डकणारे निशाण भगवा झेंडाच आहे."
"तंजावरसही मुळापासून भगवा झेंडाच फ़डकतो ही गोष्ट विशेष विचार करण्यासारखीच आहे.भगवा रामदासांच्या आज्ञेने शिवछत्रपतींनी सुरु केला असता तर तो तंजावत मध्ये फ़डकणे संभवनीय नाही.तंजावर शिवरायांच्या अंमलात केंव्हाही नव्हते, व व्यंकोजीराजे हे आपल्या वडील भावाचा नेहमीच मत्सर करीत.म्हणून त्यांचे निशाण तंजावरास टिकणे शक्य नाही.यावरून भगवे निशाण शिवछत्रपतींनी सुरु केले नसले पाहिजे.बखरीत वर्णिल्याप्रमाणे शहाजी राजांनी आपले निशाण भगवे ठरविले.याच कारणाने त्यांच्या महाराष्ट्रातील व कर्नाटकातील मुलुखात तेच सर्वत्र प्रचारात आले.शिवाजी व व्यंकोजी या शहाजीराजांच्या मुलांनी त्याचा अभिमान धरून तेच पुढे चालविले.यासाठी हा भगवा झेंडा मराठेशाहीचे निशाण म्हणून शहाजीराजांच्या वेळेपासून सर्वत्र दिसून येत आहे."
यावरून शिवरायांच्या राज्यार्पणाची कथा आणि भगवा झेंडा यांच्या संबंधात रामदासांची किंमत काय आहे हे लगेच दिसून येते.
जय जिजाऊ || जय शिवराय

30 June 2013

वेदोक्त : एक धार्मिक युद्ध

          "प्रमाणबुद्धिवैदेषु साधनानामनेकता" या वेदवाक्याचा अर्थ सांगताना म्हंटले जातेे की "जो वेद प्रमाण मानतो तो हिंदु" या "हिंदू" शब्दाचा सरळ आणि सोपा अर्थ असताना बाह्मणांनी स्वार्थाप्रमाणे त्याचा अर्थ लावला व हिंदूंच्या माथ्यावर वेदोक्त आणि पुराणोक्त हे वेगवेगळे विधी लादून स्वत:चे श्रेष्ठ्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आजही भटजी धर्मकार्यातून "पुराणोक्त विधी करून इतरांना दुय्यम वागणूक देतात. धर्मकार्याला बसलेल्या व्यक्तीला चाललेली विधी पुराणोक्त आहे की वेदोक्त आहे याची मुळीच कल्पना नसते त्यामुळे भटजी सांगेल त्याप्रमाणे तो विधी करत असतो"
         वस्तुश: जातीभेद हे वर्ण वर्चस्ववादी लोकांनी समाजव्यवस्था व संरक्षण यासाठीच निर्माण केले. संरक्षणाचे काम करणार्याला "क्षत्रिय", व्यवसाय करणार्याला "वैश्य",सर्वांची सेवा करणार्याला "क्षुद्र" आणि संस्कार करणार्याला "ब्राह्मण" संबोधित असत. "चातुर्वण्य मया स्रुष्टं गुणकर्मविभागश:" अर्थात चार वर्णाची ही रचना गुणकर्मावर आधारीत होती. त्यावेळी एकाच परीवारात एक ब्राह्मण तर दुसरा क्षत्रिय ,तिसरा वैश्य तर चौथा क्षुद्र असे. कालांतराने आर्यांच्या मुळ हेतूला बगल देऊन जन्माधिष्टीत समाजव्यवस्था निर्माण करून ब्राह्मणांनी आपले श्रेष्ठ्त्व समाजावर लादले. "नंतर सामाजिक व्यवस्थेत मानाचा जो अनुक्रम लागला त्यात दुसर्या क्रमांकाचे स्थान ब्राह्मणांना मिळाले, त्यांना क्षत्रियांबद्द्ल आसुया निर्माण झाली." रावाला खेचल्याशिवाय पंताला वर चढता येणार नाही, हे त्यांनी जाणले. म्हणुनच वरील विचारांचे पालन करून राजर्षींना खेचण्याचे कार्य केले. पण राजर्षी शाहू महाराज शेरास सव्वा शेर होते. निश्चयाचे महामेरू होते.
         राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्याच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात आमुलाग्र क्रांती करणारे प्रकरण म्हणून या "वेदोक्त प्रकरणा" कडे पहावे लागेल. सनातनी ब्राह्मणांनी करवीर राज्यात आपल्या अहंकारी वर्णवर्चस्वाच्या प्रव्रुत्तीमुळे अक्षरश: हैदोस घातला होता."जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ ॥" ही त्यांची विचार व आचारधारा होती. अशा या ब्राह्मणांचे वर्णन महालिंगदासांनी मार्मिक शब्दात केले आहे.

"ऐसा तो ब्राह्मण । म्लेंच्छ होय चौगुण । ऐसा पापिष्ट तेणे । जन पीडीले ॥
तया षटकर्माचा विसर । कारकोनी पडिभर । गायत्री मंत्रांचा अधिकार । थोडा तयासी ॥
दग्धचि बोलणे तेणे । सखा सोईरा मित्र नेणे । लाभावरी तेणे । ठेविले चित्त ॥"

अशा या सनातनी ब्राह्मणांनी उठविलेल्या "वेदोक्त प्रकरण" या वादळात राजर्षी शाहू महाराज जिंकले आणि विरोधकांचा फ़ज्जा उडाला याचा आढावा घेवू.
             नोव्हेंबर १८९९ मध्ये पंचगंगेवर  नेमाने स्नान करण्यास जात असताना एके दिवशी स्नानाच्या वेळेस मंत्र म्हणणार्या नारायण भटाच्या तोंडून जे मंत्र बाहेर पडत होते ते पुराणोक्त होते, नारायण भट स्वत: आंघोळ करूण आले नाहीत व पुराणोक्त मंत्र उच्चारत आहेत. ही गोष्ठ राजारामशात्री भागवत यांनी महाराजांच्या नजरेस आणली. शाहू महाराजांनी त्या नारायण भटास वेदोक्त मंत्र म्हणण्यास सुनवले. नारायण भटाने "महाराज शुद्र आहेत" असे स्पष्ठ उत्तर दिले. उत्तर प्रत्युत्तरे झाल्यानंतर नारायण भटाने, "धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि सर्व शक्तिमान ब्राह्मण समाज तुम्ही क्षत्रिय आहात हे जाहीर करेपर्यंत तुम्ही आमच्या साठी शुद्रच" असे सांगितले. येथुनच वेदोक्त वादास प्रारंभ झाला.
             महाराजांचा संयम दांडगा होता. विषारी फ़ुत्कार काढणार्या नारायण भटाला त्याच क्षणी चाबकाचे फ़टके लगावले असते तर कोणीही, का ? म्हणुन देखील विचारले नसते. तरीदेखील राजे शांत होते. पण त्यांच्या सोबत असणार्यांची मने क्रोधांनी पेटून उठून, हात शिवशिवत होते. "प्रत्यक्ष राजांचा अपमान, आमच्या देवाचा अपमान ? आम्ही या भटाला जिवंत ठेवणार नाही. हा नारायण भट काही सज्जन पुरुष होता असे नाही. अशा या लबाड भटाने एका चारित्र्यसंपन्न, संयमी व सर्व प्रजेला प्रिय असलेल्या राजांचा घोर अपमान करावा, यापेक्षा अन्य घोर पाप तरी हा भट कोणते करणार ? महाराजांची वृत्ती संतांची होती. संत तुकोबारायांच्या शब्दात शाहू महाराजांचे थोरपण उमगते"
"दया,क्षमा,शांती । तेथे देवाची वसति ।
भूतांची दया । हेचि भांडवल संता ॥"
          महाराजांच्या अपमानामुळे संपुर्ण "बहुजन समाज" एक झाला  व त्यांच्या मनात ब्राह्मणाविषयी रोष खदखदू लागला. त्यावेळी कोल्हापुर नगरपालिका ब्राह्मणमय होती. पंचगंगेवर ब्राह्मणांसाठी वेगळा घाट राखीव ठेवला होता नगरपालिकेने. महाराजांच्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आली. ऑगस्ट १९०० मध्ये बहुजन समाजाने हातात बंडाचा झेंडा घेतला, हा सारा समाज भल्या पहाटे "छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय, ब्राह्मणांचा धिक्कार असो" अशा आकाशगामी घोषणा देत पंचगंगेवर चालून आला. सनातनी ब्राह्मणांना-भटांना धडा शिकवला पाहिजे, या विचाराने पेटून उठलेला समस्त बहुजन समाज पंचगंगेच्या घाटावर जमा होऊ लागला. ब्राह्मणांसाठी राखीव ठेवलेल्या घाटावरील बोर्ड काढून तोडून टाकू लागला. त्या ब्राह्मणी घाटावर जमलेल्या शाहू प्रेमींना बघून घाबरून पळ काढू लागला. नाहीतर यापलीकडे ते करणार तरी काय ?

वेदोक्त मध्ये लो. बाळ गंगाधर टिळक
        या वेदोक्त वादात सनातन्यांचा पक्ष घॆऊन टिळक मैदानात उतरले. टिळकांचा "केसरी" शाहू राजांच्या विरोधार विष ओकू लागला. २२ आणि २९ ऑक्टोंबर १९०१ च्या केसरीत टिळकांनी "वेदोक्ताचे खुळ"  या नावाने दोन अग्रलेख लिहून शाहू राजांवर जहरी टीका केली व सनातनी ब्राह्मणांना जोरदार पाठींबा दिला. टिळकांनी लिहिले "धर्मशास्त्रातील जे प्रसिद्ध आणि सर्वमान्य ग्रंथकार आहेत त्यांच्या मते क्षत्रिय आणि वैश्य हे वर्ण पुर्ण नष्ट झाले आहेत व फ़क्त ब्राह्मण आणि शुद्रच अस्तित्वात आहेत. टिळकांनी शाहू राजांना सरळ सांगितले की "तुम्ही खुशाल स्वत:ला उच्चवर्णीय समजा, परंतू तुम्ही शुद्रच आहात". टिळकांच्या या म्हणण्यामागे परशुरामाने २१ वेळा प्रुथ्वी निक्षत्रिय केली त्यामुळे प्रुथ्वीवर क्षत्रिय शिल्लकच उरले नाहीत हे ब्राह्मणांचे आवडते तत्वज्ञान होते. तसेच एका पुराणार म्हंटले आहे की, 
"ब्राह्मणा: क्षत्रिया वैश्या:शूद्रा वर्णास्त्रयो द्विजा:।
युगे युगे स्थिता: सर्वे कलावाद्यंतयो: स्थितीरिति: ॥"
अर्थात : ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य़ आणि शूद्र हे चार वर्ण आणि यातील तीन आर्य वर्ण सर्व प्रत्येक युगात असतात, पण कलीमध्ये पहिला आणि अखेरचा असे दोनच वर्ण राहतात.
         बाळ टिळकांनी वेदोक्ताची मागणी करणार्या मंडळींची हवी तशी टिंगल आणि उपहास करण्यासाठी आपली लेखणी झिजवली."अलिकडे इंग्रजी विद्येने व पाश्चात्य शिक्षणाने सुसंस्क्रुत झालेल्या मराठा मंडळींच्या मनात जी काही खूळे शिरली आहेत,त्यापैकी वेदोक्त कर्माचे खूळ हे होय." बाळ टिळकांनी आणखी एक युक्तिवाद पुढे केला. "वेदोक्त मंत्र म्हंटल्याने कोणत्याही जातीस आधिक श्रेष्ठपणा येतो अशी जर कोणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे. वैदिक मंत्रांनी संस्कार झाले म्हणजे मराठे आणि ब्राह्मण एक जातीचे होतील अशी जर कोणाची कल्पना असेल तर तिही निरर्थक आहे. वेदोक्त मंत्र म्हंटले तरी मराठे हे मराठेच राहतील, हे लक्षात ठेवले पाहिजे." असे म्हणुन बाळ गंगाधर टिळकांनी मराठ्यांना क्षत्रिय मानण्यास विरोध केला.

कमिशनची नियुक्ती
          टिळकांनी ब्राह्मणांची बाजू उचलून धरल्यामुळे या "वेदोक्त" प्रकरणाला उलटी कलाटणी मिळण्याचा संभाव्य धोका ऒळखून महाराजांनी या वेदोक्त प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका हुकुमान्वये न्यायमुर्ती पंडीतराव गोखले, न्यायमुर्ती विश्वनाथराव गोखले व खुद्द आप्पासाहेब राजोपाध्ये या तिघांचे एक कमिशन नेमून त्यांना अहवाल सादर करण्याची आज्ञा दिली. तसेच हे तिघेही ब्राह्मण होते तरी त्यातील पंडितराव गोखले हे निस्प्रुह, विद्वान व नि:पक्षपाती होते.
        १६ एप्रिल १९०२ रोजी कमिशनने आपला अहवाल महाराजांना सादर केला. त्या अवहालात नमुद करण्यात आले होते की, "रुद्राभिषेक होत असे याचा अर्थ ज्यांची ही देवस्थाने होती ते द्विज वर्गातील आहेत. म्हणजे छत्रपती हे क्षत्रियच आहेत. "या अहवालावर अखेरपर्यंत राजोपध्ये यांनी सही केली नाही. हा राजोपाध्येदेखील नारायण भट्टाचा दुसरा अवतार होऊन त्याने आपला थयथयाट चालू ठेवला. पण त्याकडे दुर्लक्ष करून द्विज वर्गातील म्हणजेच वेदोक्ताचा अधिकार असलेले शाहू छत्रपती हे क्षत्रिय आहेत असा निर्वाळा कमिशनने दिला. 
        या वेदोक्त प्रकरणाची एकूण फ़लश्रुती शोधताना एका महत्वाच्या गोष्टीकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलेले आहे. तिची स्पष्ट नोंद इथे करणे योग्य ठरेल. वेदोक्त प्रकरणात एकूण न्याय शाहूराजांच्या बाजूने होता. त्यांनी हा न्यायाचा लढा मोठ्या जिद्दीने लढविला. अखेर न्याय आणि आपला वेदोक्ताचा अधिकार त्यांनी प्रस्थापित करून घेतला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसारखा एक थोर माणूस समाजाला जाग आणावी,म्हणुन धडपडत होता. वेदोक्त आणि पुराणोक्तच्या फ़ाटक्यात पाय अडकलेला ब्राह्मण वर्ग तर त्यांना विरोधक म्हणुन उभा राहिलाच. पण त्या द्रुष्टीने वेदोक्त प्रकरणात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा संपुर्ण विजय झाला. ब्राह्मण वर्चस्वाचा (अगदी टिळक आणि टिळककंपुंसकट) संपुर्ण पराभव झाला.


संदर्भ ग्रंथ : 
राजर्षी शाहू गौरव ग्रंथ
शाहुंच्या आठवणी (प्रा. नानासाहेब सांळुंखे,मराठा भुषण)
राजर्षी शाहू चरित्र (श्री. ग. क्रु. कुर्हाडे)

7 October 2012

जातीच्या वर्गात सत्यानाशच..

         "जातीसाठी माती खावी " अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. दैनंदिन जीवण जगत असताना अनेकदा आपण या म्हणीनुसार वागतो, क्रुती करतो.यामुळे आपल्याला समाधान वाटत असते.
पण खरोखरच जातीविषयक असलेला हा गर्व, अभिमान दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या सोडवू शकतो काय ? याचे उत्तर नकारार्थी असेच आहे.आपल्याला प्रश्न पडणॆ स्वभाविक आहे की जातीविषयीचा अभिमान किंवा गर्व तसेच आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या याचा काय संबंध आहे ? याचा अनिष्ट संबंध आहे.
        संपुर्ण भारतात तथागत बुद्ध, सम्राट अशोक यांच्या काळात जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती, तर तथागत बुद्धांनी इथल्या वर्णवर्चस्वादा विरुद्ध संपुर्ण लोकांना जाग्रुत  करून सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्क्रुतीक आदि क्षेत्रात क्रांती केली. याचा अर्थ तत्कालीन वर्ण व्यवस्थेला छेद दिला ही वर्ण व्यवस्था या देशात पसरली होती त्यामध्ये यज्ञयाग,कर्मकांड, पाप-पुण्य, पुनर्जन्म, ब्राह्मणवर्चस्व आदि विषमतावादी गोष्टी होत्या, वर्ण व्यवस्था ही उतरंडीसारखी उभी होती.सर्वात खाली शुद्र, त्यांच्यावर वैश्य, त्यांच्यावर क्षत्रिय़ व सर्वात वरती ब्राह्मण.
            आधुनिक वर्तमान परिस्थिती : वर्तमानात आज आपण आपले महापुरुष व संत यांना जाती-जातीत बंदिस्त करून ठेवलेले आहे.ज्या महापुरुष व संतांनी वर्ण व्यवस्था,जाती व्यवस्था, अस्प्रुश्यता,विषमता, स्त्रीदास्य इ. विषयांवर लोकांचे प्रबोधन केले . त्या सर्वांना इथल्या व्यवस्थेने जाती-जातीत विभाजन करून ठेवलेलं आहे.माझा प्रश्न आहे की, काय महापुरुष व संतांनी केवळ स्वत:च्या जातीपुरतेच प्रबोधन केले ? काय ते स्वत:च्या जातीच्या प्रगतीसाठी आयुष्यभर झटले ? काय त्यांना स्वत:च्याच जातीचा गर्व होता ? या प्रश्नांचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे.यावर चिंतन,मनन होऊन योग्य निष्कर्ष काढला पाहिजे. निष्कर्षावरच योग्य दिशा मिळुन एकत्रितपणे संघटित होण्यासाठी प्रयत्न करता येईल,अहो जात हा बंदिस्त वर्ग आहे.या बंदिस्त वर्गानेच सर्वांना दार उघडे करून देण्यासाठी महापुरुष व संतांनी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घातले.सर्वसाधारणपणे आपण दैनंदिन व्यवहारात आमचा समाज, तुमचा समाज असा शब्द प्रयोग करतो.वास्तवीक हा समाज हा भारतीय समाज समजला पाहिजे.
           समस्येचे समाधान करण्यासाठी काय करावे लागेल ? विद्यमान प्रचलित असलेल्या जाती व्यवस्थेची पाळेमुळे जी अतिशय खोलवर रुजली आहेत.यासाठी सर्व प्रथम आपण स्वत:ची ओळख करून घेणे गरजेचे आहे.ओळख ही जातीची नाही तर रक्ताची आहे.केवळ स्वत:च्या जातीचा जर आपण विचार केला तर जाती व्यवस्था नष्ट होण्याऐवजी ती अधिकच घट्ट होईल.म्हणून जातीचे हे मढे स्वत:च्या मन व मस्तिष्कामधुन काढून टाकावे लागेल.यामुळे जातीव्यवस्था.खिळखिळ होऊन आपल्या समोरील अनेक समस्यांना एकत्रीतपणे येवून लढा देण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होईल.सर्वांच्या समस्या या सारख्याच आहेत.समस्या सारख्याच असतील तर केवळ समस्येवर चर्चा करून रडून दुसर्याला दोष देऊन, त्यावर उपाय काढणे शक्यच नाही.कारण सिद्धांत म्हणतो.की जो समस्या निर्मान करतो तो समस्येचे कधीही समाधान करणार नाही.समस्या जर आपल्याच असतील तर उपाय सुद्धा आपल्यालाच संघटीत होऊन काढावा लागेल.समस्येपासून दुर जाऊन  चालणार नाही तर समस्येला तोंड दिल्यानेच समस्या सुटू शकतात.
           बंधुंनॊ जातीचा गर्व व अभिमान यांचा त्याग केल्यामुळेच आपण भविष्यात एकत्र येवून समता, स्वातंत्र्य बंधुता व न्याय या मानवी मुलभुत तत्वावर आधारीत सम्रुद्ध भारत घडवू शकतो,अशी मला केवळ आशाच नाही तर आत्मविश्वास सुद्धा आहे.