२४ डिसेंबर, २०१६

शनिवार, डिसेंबर २४, २०१६
34
        भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर,  १९२७ रोजी "मनुस्मृति" या ग्रंथाचे जनसमुदयाच्या समक्ष जाहिररित्या दहन केले. दलित समाजाला मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये गुलामीच्या विरोधात संघर्षाची जिद्द निर्माण केली.त्यासाठी त्यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळयाचा सत्याग्रह केला.हा सत्याग्रह चवदार तळ्यातील पाणी पिण्यासाठी नव्हता, ज्या तलावात कुत्री-मांजरी,जनावारे पाणी पित होती.त्यांना पाणी पिण्याची बंदी नव्हती,परंतु माणसाला पाणी पिण्याची बंदी होती.म्हणूनच मानवी हक्कची प्रतिष्ठा स्थापन करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता.दलित समाजाला अशा अनेक धार्मिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.असे आंबेडारांचे मत झाले होते.त्यामुळेच आंबेडकरांनी मनुस्मृति ग्रंथ जाळण्याचे ठरवले तत्पुर्वी आधीच्या शतकात राष्ट्रपिता जोतिराव फ़ुलेंनी "जाळून टाकावा  । मनुग्रंथ ॥ असे म्हंटले होते.आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली (१९२७) त्याला पुढच्या वर्षी ९० वष्रे पूर्ण होतील, त्यामुळे मनुस्मृति विषयी जाणुन घेणं महत्वाचे आहे. 
             भुतांत प्राणी श्रेष्ठ, प्राण्यात बुद्धीजीवी,बुद्धीवंतांत मनुष्य़ श्रेष्ठ आणि मनुष्यात ब्राह्मण श्रेष्ठ,शुद्रास मति (ज्ञान) देऊ नये, कोणताही धर्मोदेश देऊ नये,कोणतेही व्रत सांगु नये.जो धर्म सांगतो तो नरकात बुडतो.(मनुस्मृति अ.१०/१२३),असे अनेक (१०/२५,१/९१,१०/२६,९/१८) श्लोक आहे ज्यामध्ये शुद्रांनी फ़क्त ब्राह्मणांची सेवा करावी.लिहु,वाचू नये अन्यथा ते नरकात जातात.शुद्रांनी फ़क्त उष्टे अन्न खावे.उपास-तपास करू नये.स्त्री-शुद्रांना धर्माधिकार नाहीत.शुद्रांनी विनातक्रार तीन्ही वर्णाची सेवा करावी.मनुस्मृतिमुळे ब्राह्मण वर्गाचे वर्चस्व वाढले.स्त्री-शुद्रादी नगण्य झाले.या सर्व कारणामुळेच २५ डिसेंबर १९२७ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जनसमुदायासमोर भाषण करून त्यांच्या मते अस्प्रुष्यता आणि विषमतेचे समर्थन करणारा,ब्राह्मणवर्ग सांगेल तोच कायदा व नियम माननारा आणि शुद्र आणि स्त्रीयांचे सर्व अधिकार हिरावून घॆणारा ग्रंथ मनुस्मृति जाळून टाकला.आंबेडकरांनी मनुस्मृति जाळली ही जाती-वर्ण द्वेषातून नाही.ज्या ग्रंथामुळे माझ्या समाजाला जनावारा पेक्षा वाईट वागणूक मिळते, या वागणूकीला प्रेरणा मनुस्मृतितून मिळत आहे असा समज आंबेडकरांचा झाला होता.पण आज त्यांचे अनुयायी केवळ हिंदु तथा ब्राह्मण द्वेषातून मनुस्मृतिला विरोध करताना दिसत आहेत.
            सध्या मनुस्मृति जाळल्याचा दिवस "मनुस्मृति दहन दिन" म्हणून साजरा केला जातो यावेळी दलित-आंबेडकरवादी लोक मनुस्मृति जाळल्याचा आनंद व्यक्त करतात.पण या सर्वांमध्ये एक वास्तव मान्य करावंच लागेल की मनुस्मृति दहन दिन साजरा करणार्यांना (किंवा तसा उल्लेख करणार्याला) मनुस्मृति विषयी किती ज्ञान आहे हे सांगणे कठीन आहे हीच अवस्था मनुस्मृतिच्या समर्थकांची आहे.आपण हिंदु आहोत आणि म्हणून मनुस्मृति आपल्याला पुज्य आहे तसेच आपण दलित आहोत आणि बाबासाहेबांनी जाळली म्हणजे नक्कीच ती वाईट आहे.असे दोन्ही पक्षाचे तर्क असतात.यावर समर्थक आणि विरोधक यांच्यापैकी किती लोकांनी मनुस्मृति वाचलेली आहे हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.
मनुस्मृति तथा हिंदु धर्मग्रंथ आणि समाजमन
              आजच्या काळामध्ये हिंदु धर्मग्रंथावर टिका करणे हे पुरोगामीत्वाचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते.तुम्ही कितीही समता-बंधुतेचा जागर करा, तुम्ही कितीही निर्लपबुद्धी आणि निपक्षपाती जीवन जगा पण त्याला पुरोगामीत्वामध्ये कवडीची किंमत नाही जोपर्यंत तुम्ही किमान एका हिंदु धर्मग्रंथा विरोधात एकतरी शब्द उच्चारत नाही.या तथाकथित पुरोगामी लोकांना अशी संधीही हिंदु धर्मातील ठेकेदार आणि धर्मरक्षकांमुळेच मिळते.जगात कोणत्याही धर्माचे नाहीत एवढे ग्रंथ हिंदु धर्माचे आहेत.पण हिंदु धर्मरक्षकांनी धर्माचे तत्वज्ञान केवळ ग्रंथापुरतेच मर्यादित राहू दिले.कारण यांना जास्त रस टिकाकारांचे खंडण तथा ग्रंथांचा प्रसार करण्यापेक्षा त्यांना केवळ विरोध करण्यातच असतो."वेदां"पासून ते "श्रीमद्भगवतगीता" आणि "ज्ञानेश्वरी" पासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या "ग्रामगीता" पर्यंत या सर्व ग्रंथाविषयी धर्मरक्षकांच्या काय भावना तथा आस्था आहेत हे अजुनही स्पष्ट झालेले नाही कारण धर्मग्रंथांपेक्षा केवळ धर्म (हा शब्दच) च परमपवित्र वाटतो.धर्माचा प्रसार हा धर्मातील वैश्विक आणि शास्वत तत्वाज्ञानामुळे होत असतो त्यामुळे धर्माबरोबरच धर्मग्रंथांचे तत्वज्ञान आणि विचार लोकांपर्यंत येणे अत्यावश्यक आहे.
        आज सर्व धर्मग्रंथापैकी समाजावर प्रभाव पाडणारे दोनच ग्रंथ अहेत, श्रीमद्भगवतगीता आणि मनुस्मृति.मनुस्मृति अप्रत्यक्षात का असेना पण जिवंत आहे. अजाणतेपणाने त्याचे पालन सर्वांकडूनच होते.हिंदुंच्या अनेक परंपरा तथा चालीरिती ह्यांचे मुळ मनुस्मृतित आहे.मनुने ब्रह्मचर्य, ग्रुहस्थाश्रम, संन्यासाश्रम, राजधर्म, चित्तशुद्धी करण्याबाबत विषय सुचविले आहेत. पण काही श्लोकांमध्ये गीतेत नसणारी विसंगति मनुच्या स्म्रुतीमध्ये दिसून येते.संपुर्ण मनुस्मृति वाचल्यानंतर समजुन येईल की मनुने काही आक्षेपार्ह (अनेक लेखकांच्या मते क्षेपक) श्लोक वगळले तर जिवनाचे किती व्यापक स्वरुप मांडले आहे.व्यक्तिगत चित्तशुद्धीपासून ते संपुर्ण समाज-व्यवस्थेपर्यंतचे बोध सुचिले आहेत.
        धर्मग्रंथामध्ये दोन प्रकार असतात सांप्रदायिक आणि वैश्विक. मनुस्मृति म्हणजे सांप्रदायिकच आहे.मनुस्मृतिची रचना इ.पू. २०० ते इ.पू. २०० या काळात झाली असे अभ्यासक मानतात तर डॉ.आंबेडकरांच्या मते इ.पू.१७० ते इ.पू.१५० या काळात मनुस्मृतिची रचना झाली.अर्थातच हे अंतिम सत्य नाही. मनुस्मृतिमध्ये घेण्यालायक आहे तसेच सोडण्यासारख्याही गोष्टीही आहेत.आज बहुतांशी हिंदुंनी त्यातील बहुतांश भाग सोडून दिलेला आहे. मनुस्मृतिमधील घेण्यासारखे आहे त्याकडे दुर्लक्ष करून चुकीचे वचणे दाखवणे हे बरोबर नाही.मनुने कसे चुकीचे वचणे लिहिली आहेत हे दाखवण्यात आपण जास्त वेळ घालवतो आणि चांगल्या विचारांना मुकतो.मनुचे सर्वच विचार मान्य करण्यासारखे नसतील किंवा जे मान्य करण्यासारखे असतील त्यातही विसंगती असेल.हिंदु धर्माचे (म्हणजे हिंदुंनी आपले मानलेले) पुष्कळ ग्रंथ आहेत त्या सर्वच ग्रंथामध्ये एकवाक्यता असेल असे सांगता येत नाही भिन्न वचणे वाचायला मिळण्याची शक्यता असू शकते.आपल्याला इथे मनुस्मृतिविषयीच्या एकंदरीत तर्क-वितर्काकडे बघायचे आहे.मनुस्मृति का चांगली किंवा का वाइट किंवा अमुक श्लोकात काय म्हंटले आणि तमूक  श्लोकात काय ? याचा अभ्यास तुम्ही वयक्तिकरित्या करू शकता.
मनुस्मृति आणि वर्णव्यवस्था
             महर्षी मनु महाराज कोण होते ?, कोणत्या वर्णाचे होते ?, एकून मनु किती होते ?, किंवा मनुस्मृतिची रचना नेमकी कोणत्या काळी झाली ? हे थोडं बाजुला ठेऊ.मनुस्मृतिमध्ये साधारण २६८५ श्लोक आहेत. संपुर्ण मनुस्मृतिमध्ये ब्राह्मण आणि क्षुद्र या वर्णाविषयी जास्त लेखन मिळते.मनुस्मृति म्हणजे केवळ वर्णव्यवस्थावादी आहे.मनुस्मृति गुणकर्मावर आधारीत वर्णव्यवस्था मानते.त्यामुळे जन्माधिष्ठीत जातीव्यवस्थेला डोक्यावर घेऊन जातीचे फ़ायदे घेणार्या अर्धवटांनी गुणकर्मप्रमाणित वर्णव्यवस्थेविरोधात बोलताना विचार करणे आवश्यक आहे.
            मनुस्मृतिबद्दल अजुनही स्पष्टता नाही कारण अभ्यासकांचे म्हणणे आहे की १७९४ साली विल्यम जोन्स यांने मनुस्मृति अनुवादित केली त्यानंतर त्यामध्ये इतर वर्णाविषयी आक्षेपार्ह नोंदी केल्या.मनुस्मृतिबाबत बोलताना दोन मुख्य आरोप केले जातात.ते म्हणजे स्त्रीयांचा अपमान आणि अस्प्रुष्यतेचे समर्थन.प्रथमता स्त्रीयांबाबत मनुस्मृतिचे मत जाणुन घेऊ,कोणतेही प्रतिक्रिया देताना आजच्या काळाची आणि मनुच्या काळाची तुलना करणे गरजेचे आहे.आजच्या काळातही स्त्रीयांचे जीवन इतके स्वतंत्र नाही.आजही स्त्रीला दुय्यम स्थान आहे परिस्थिती काहीशी निवळली असली तरी फ़ारशी नाही.मग मनुचा काळ तर हजार वर्षापुर्वीचा त्यावेळी काय अवस्था असेल ? निश्चितच स्त्रीयांविषयी मनुस्मृतिमध्ये आक्षेपार्ह वक्तव्ये केली गेलेली आहेत ती निषेदार्ह आहेतच.पण सर्वच लेखन स्त्रीविरोधी आहे का ? तर नाही.तर स्त्रीयांची बाजु मांडलेले ही लिखान आपल्याला आढळेल.मुळात एक गोष्ट समजून घॆतली पाहिजे ती म्हणजे स्त्रीयांवर जे आरोप केले गेलेले आहेत ते म्हणजे स्त्रीया आजन्म अशा असतात असे नाही तर त्यांचा स्थायी गुणधर्म सांगितला आहे.आजच्या काळात त्याचे समर्थन होऊ शकत नाही पण मनुने स्त्रीयांचा मुळ स्वभाव सांगितला आहे.चांगल्या कुळीन संस्काराने स्त्रीयांमध्ये सुधारणा होऊ शकते हेच त्यामागचे सत्य.त्याचवेळी स्त्रीयांच्या हक्काधिकाराविषयी सुद्धा मनुनी लिहिले आहे.आता विषेश म्हणजे सवर्ण समाजातील स्तीयांविषयी अश्लाघ्य टिका करणे,त्यांच्या स्त्रीयांविषयी पुस्तकारून घाणेरडे लिखान करणे असे भिमपराक्रम करनार्यांनी मनुने स्त्रीयांचा अपमान केला म्हनून मनुस्मृतिला विरोध करणे केवळ दुटप्पीपणाचे तथा मुर्खपणाचे आहे.ख्रिश्चन धर्मामध्ये कुटुंब नियोजनाला विरोध आहे.मुस्लिम धर्मामध्ये आजही स्त्रीयांची काय परिस्थिती आहे हे तथाकथित पुरोगामी लोकांना माहीत आहे का ? नक्कीच माहीत आहे पण त्यांच्या विरोधात बोलाव तर मिळत तर काहीच नाही पण हातच्या पुरोगामित्वाच्या प्रमाणपत्राची वैधता संपण्याची भिती.
           अस्प्रुष्यता : मनुस्मृतिवरील आणखी एक आरोप म्हणजे अस्प्रुष्यतेचे समर्थन.मुळात आपण एक गॊष्ट लक्षात घेतली पाहिजे की मनुची व्यवस्था ही कर्मप्रमाणित व्यवस्था होती त्यामूळे अमुक जात बहिष्क्रुत करा असं कूठं आढळणार नाही.पण आज आपल्याला पुरोगामी बनायचं असेल तर मनुस्मृतितील अस्प्रुष्यतेवर घाणाघाती टिका करावीच लागते त्याशिवाय पुरोगामित्वाचे प्रमाणपत्र मिळत नाही.वर्णव्यवस्था आणि अस्प्रुष्यता आजही आस्तित्वात आहे आणि राहील.कालांतराने अस्प्रुष्यता नाहीशी जरी झाली तरी वर्णव्यवस्था शाश्वत आहे आणि राहिल.फ़रक एवढाच की ती जातीनिधिष्ठ न राहता श्रीमद्भगवतगीतेत सांगितल्याप्रमाणे गुणकर्मावर आधारीत राहील हेच सत्य आहे.मी वयक्तिकरित्या अस्प्रुष्यतेला विरोध करत नाही जर ती जातीनिधिष्ठ नसेल तर.अशी अस्प्रुष्यता आजही अस्तित्वात आहे.आज पुरोगामित्वासाठी अस्प्रुष्यता विरोधात ढोल बडवावा लागत आहे, तसे नसते तर यांनी परिणामावर ओरडण्यापेक्षा कारण शोधले असते.अस्प्रुष्यतेला मुळ कारणीभुत होते ते संस्काराचा अभाव आणि घाणेरडे राहणीमान यामुळे त्यांच्यावर अस्प्रुष्यतेचा शिक्का बसला कालांतराने हिच त्यांची ओळख बनून गेली आणि ती जातीवर लादली गेली, यामध्ये अस्प्रुष्यांचा दोष नसेलही किंवा सर्व वर्णाना गुरुप्रमाणे संस्कार करणे ब्राह्मणांचे काम होते ते त्यांनी प्रामाणिकपणे केले नाही हे खरे असले तरी अस्प्रुष्यता मानणारे दोषी होतेच असे म्हणता येणार नाही कारण हे त्यांच्या अडाणीपणातून होत असे.आजच्या काळातसुद्धा दुर्गंधी-अस्वच्छ असनार्या लोकांना इतर लोक जवळ करत नाहीत ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहेत.मग हजार वर्षापुर्वी काय अवस्था असेल याची कल्पना केल्यास परिस्थिती उजेडात येईल.
         ज्या काळात माणुस जगत असतो तो त्याच प्रमाणे लिखान करत असतो हा नियमच आहे.सध्याच्या वातावरणानुसार माणुस जी कल्पना करू शकतो त्याच्यातूनच तो जग पाहत असतो.आजच्या काळात कोणीही काही लिहिल ते आजच्या काळात योग्य ठरेल पण इथून पुढे शेकडॊ-हजारो वर्षांनी कालबाह्य होईल हा परिवर्तनाचा नियम आहे.मनुस्मृतिच्या काळात जे काही लिहिलं गेलं ते सध्या सर्वच समर्थनीय आहे असं नाही.काही निश्चितच आक्षेपार्ह गोष्टी आहेत मनुस्मृतिमध्ये पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचे अनुकरण का करू नये ? की केवळ चुका दाखवण्यातच धन्यता मानायची.कायदा, सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्था यासाठी लिहिलेला ग्रंथ.राजाचं आचरण कसं असावं, प्रजेचं रक्षण कसं करावं,अत्यंत सुंदर माहीती त्यामध्ये दिलेली आहे.त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे तो फ़क्त हिंदु धर्मापुरता मर्यादित नाही.म्यानमार, इंडोनेशिया सारख्या देशामध्ये मनुस्मृति हा महत्वाचा ग्रंथ मानला जातो.फ़िलीफ़ाईन्स म्हणजे महर्षी मनूं पुतळा उभा केला गेला आहे.मग त्यांनी हे सगळं मनुस्मृति न वाचताच केलं का ? मग लक्षात घ्या जातीभेद आणि द्वेष नेमका कुठे आहे.
             वैदिक-हिंदु विचार-प्रणाली आणि मान्यता  ह्या काळानुसार बदलत राहतात.त्यामुळेच हजार वर्षापासून चालत आलेल्या रुढी-परंपरा आज बदललेल्या तर काही बंद झालेल्या दिसतील तसं इतर धर्मात होत नाही म्हणून धर्म अभ्यासक हिंदु हा धर्म मानण्यापेक्षा एक मान्यता-संस्क्रुती तथा विचार प्रणाली मानतात.मनुस्मृतिमध्ये ज्या श्लोकांवर आक्षेप आहे किंवा जी वचणे विषमतावादी आहेत ती काढून टाकली तरी मनुला फ़ारसा फ़रक पडणार नाही.कारण मनुस्मृति समाजशास्त्र आहे.ती निव्वळ अध्यात्मिक बोधच देत नाही तर सामान्य नितीबोध,सांसरीक कार्यासाठी मार्गदर्शन, राजा तसेच व्यापारी आदींची कार्य-कर्तव्ये याविषयी मनुने मार्गदर्शन केले आहे.यामुळे लक्षात येईल की मनुचा मुख्य उद्देश समाजाला मुख्य व्यवहारीक मार्गदर्शन देण्याचा आहे.म्हणून विनोबा म्हणतात "मनु समाजशास्त्रज्ञ आहे तो नेहमीच बदलत असतो.मनु जर आज असता तर त्याला आपली मनुस्मृति बाजुला सारून वेगळीच मनुस्मृति लिहावी लागली असती.याचा अर्थ पहिल्यामध्ये घेण्यासारखं काही नाही असे नाही. मनुस्मृति सारखे ग्रंथ समाज-व्यवस्था कायम रहावी या उद्देशाने लिहिली गेलेली आहेत".
अभिजीत पाटील, कोल्हापूर.
मराठा । इतिहास । वारकरी । धर्म । अध्यात्म । तंत्रज्ञान । पुरोगामी । शेतकरी । राष्ट्रवादी

34 प्रतिक्रिया:

 1. मनुस्म्रुतीचा खरा लेखक सुमती भार्गव आहे.याचा उल्लेख मारदस्म्रुतीमध्ये केला आहे.परंतू मनुचा खुपच दरारा होता म्हनून मनुस्म्रुती नाव द्द्यावे लागले.भार्गवच्या साहित्याला.एक गॊष्ट खरी आहे की आजही मनुस्म्रुतीचे पालन सर्वांकडून होते नकळत.बाबासाहेबं आंबेडकर यांनी सुद्धा हेच म्हण्तले आहे.मनुस्म्रुती भुतकाळ नाही तर वर्तमान काळात विद्यमान असलेला भुतकाळ आहे.तीच्या विषारी विचारांचा प्रभाव आजही समाजजीवनावर आहे.मनुस्म्रुती जाळली म्हणजे केवळ एक पुस्तक किंवा ग्रंथ जाळला नाही हे आधी आपण समजून घॆतले पाहिजे.लेख चांगला आहे पण मनुचे समर्थन करणार आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. काय झालं ? प्रतिक्रिया का काढून टाकली ? तुम्हाला पहिजे आहे तेच आम्ही लिहायचं का ?

   हटवा
  2. असं कसं.काहिही बोला-लिहा.व्हॉल्टेयरने व्यक्तिस्वात्रंत्यामधील भाषणस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य ह्याचे महत्व अतिशय चांगल्या तर्हेने सांगितले आहे त्याचे महत्व आपण राखले पाहिजे.पण व्यक्तीस्वात्रंत्याचा उपभोग घेताना कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घॆणे गरजेचे आहे त्यामुळे फ़क्त महर्षी मनूच नाही तर कोणत्याही महापुरुषांविषयी बोलताना विचार करून बोलले पाहिजे.

   हटवा
 3. आपल्या जातीच्या आंबेडकरनी जाळली म्हणूनच दलीत मनुस्म्रुतीला विरोध करतात
  आपल्या जातीच्या आंबेडकरांनी संविधान लिहिले म्हणुनच दलीत संविधान मानतात (नाहीतर यांना काय घंटा कळतय त्यातलं ?)
  आपल्या जातीच्या आंबेडकरांनी आमच्या संविधानामध्ये सवलती दिल्या म्हनूनच आम्हाला संविधान प्रिय आहे.
  धन्य ते आंबेडकर आणि धन्य ते अनुयायी

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. भेदभावाचे समर्थन करणार्‍या विचारसरणीचा पगडा समाजमनावर आजही आहे. याची अनेक उदाहरणे आहेत. जयपूर न्यायालयासमोर मनूचा पुतळा स्थापन केला आहे. तो हटवण्यासाठी गेली कित्येक वर्षे आंदोलने होत आहेत; पण ते दुर्लक्षित राहते. राजस्थान सरकारच्या महिला विकास प्रकल्पात साथी म्हणून काम करणार्‍या भटेरी गावातील भंवरीदेवीने तिच्या कामाचा भाग म्हणून बालविवाह रोखला; पण ते घर होते उच्चजातीय मुखियाचे. जात आणि वर्ग हितसंबंध डिवचल्याने धडा शिकवण्यासाठी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दाद मागण्यासाठी कोर्टात गेलेल्या भंवरीदेवीला खोटी ठरवत न्यायाधीश निकालात म्हणतात, ‘खालच्या कुम्हार जातीच्या भंवरीवर उच्च जातीतील ज्येष्ठ ब्राह्मण बलात्कार कसे करतील?’ या संतापजनक निकालाचा स्त्री आंदोलनाने निषेध केला. तर उच्च जातीच्या समर्थनार्थ समविचारी राजकीय पक्षाच्या पुढाकाराने बलात्कारींचा जाहीर सत्कार केला. ही घटना सन 1997 ची आहे. आजही बलात्काराची शिकार होणार्‍यांमध्ये दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, कष्टकरी आणि आदिवासी स्त्रियांची संख्या जास्त आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यांतील नफ्याला बांधलेल्या अर्थव्यवस्थेत या स्त्रिया ‘अतिगरीब’ आणि ‘असंघटित’ स्तरांत वेगाने ढकलल्या जात आहेत. आपले रोजी-रोटीचे, जगण्याचे घटनादत्त हक्क मागण्यासाठी न्याय्य लढा देणार्‍या स्त्रियांवर ‘नक्षलवादी’ म्हणून शिक्का मारून खोट्या केसेसखाली त्यांना तुरुंगात डांबले जाते. तेथे त्यांचा अनन्वित छळ केला जातो. माध्यमांत थोडासा बोलबाला झालेले सोनी सोरी या छत्तीसगढमधील गोंड आदिवासी शिक्षिकेचे अलीकडील उदाहरण आहे. दिल्लीमधे 16 डिसेंबर रोजी झालेल्या निदर्शनात बेलवर सुटलेल्या सोनी सोरीने भाग घेतलेला. त्या वेळी ती म्हणाली, ‘माझे शिक्षण झाल्याने मी अन्यायाची दाद मागण्याचे धैर्य दाखवले. माझी लढाई चालूच आहे; पण माझ्यासारख्या कितीतरी स्त्रिया तुरुंगात डांबलेल्या आहेत. त्यांना आपण कोणता गुन्हा केला हे माहीतही नाही. त्यांना कोण न्याय मिळवून देणार?’ सोनी सोरीने विचारलेल्या प्रश्नाने आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे. घटनेतील हक्क प्रत्यक्ष मिळवायचे असतील, तर अनेक पातळीवर संघर्ष करायला हवा, या वास्तवाकडे ती आपले लक्ष वळवते. आज सर्व जाती-वर्गातील स्त्रियांच्या (आणि पुरुषांच्याही) जगण्याला स्वतंत्र भारताच्या घटनेचा आधार असण्याऐवजी त्यांच्या त्यांच्या धर्म आणि जातींच्या अस्मितांचा आधार बळकट होत आहे. समताधिष्ठित समाजासाठी ही धोक्याची बाब आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे सप्टेंबर महिन्यात ‘बहू-बेटी बचाव महापंचायत’ भरवून, वास्तवाचा आधार नसलेले भडक व्हिडिओ दाखवून समाजात मुस्लिम द्वेष पेटवून दिला. त्यानंतर दंगली घडवण्यात आल्या. त्यामध्ये मुस्लिम समाजातील स्त्रियांवर अमानुष हिंसा करण्यात आली. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त केली. मुले-बाळे पोरकी झाली. आज मदत छावणीतील कडाक्याच्या थंडीत गारठणारी तीन लेकरांची आई म्हणते, ‘माझ्याजवळ एकच कोट आहे. त्यामुळे दर तीन दिवसांतून तो मी एकाला घालते. तेवढीच एक रात्र पाळी-पाळीने ऊब मिळते.’ थंडीने कित्येक लहानगी मरण पावल्याने नुकतेच न्यायालयाने राज्य शासनाला प्रश्न विचारले आहेत. या गोष्टीने आपले समाजमन का हेलावत नाही, हा प्रश्न जणू ती लहानगी विचारत आहेत. एवढेच नव्हे, तर मोदींच्या प्रचाराच्या सभेत ज्या सदस्यांवर दंगलीतील सहभागाचे गुन्हे दाखल आहेत अशांचा सत्कार करण्यात आला. आपले सामाजिक न्याय या संदर्भातील व्यवहार संसदेपेक्षा ‘धर्मसंसदे’नुसार व्हावेत याला दुजोरा देणारी गोष्ट नुकतीच अहमदाबाद येथे घडली. ‘आसाराम आणि त्यांच्या मुलावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामागे षड्यंत्र होते आणि याचा निवाडा ‘धर्मसंसद’ करेल,’ असे सांगण्यात आले. ही गोष्ट देशातील पोलिस - न्याय यासारख्या घटनादत्त प्रक्रियेला आव्हान देणारी आहे. शिवाय स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांचे निराकरण करण्याऐवजी तो झालाच नाही, अशी आवई उठवणे गैर आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. मनुस्मृती, पुराणे आणि देवळे असा तीन पेडी फास हिंदुसमाजांवर लटकाउन भिक्षुकशाही ब्राह्मणांनी आपल्या जातीच्या सावत्या सुभ्याचे सोवेळे वर्चस्व आजवर टिकउन धरलेले आहे. या मर्मावर कोणी घाव घातलाच एक जात सुधारक दुर्धारक भटे सापासारखी का फुसफुसतात, याचे अजून बर्याच बावळट शहान्यांना आणि भोळसट भटेतरांना मोठे आश्चर्य वाटते.
  मनुस्मृती, पुराणे आणि देवळे या तीनच गोष्टीवर आज प्रत्येक भट जगत असतो. पण या तीनच गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावर तीन प्राणघातक धोंडी आहेत. या तीन गोष्टी नष्ट करा, जाळून पोळून खाक करा कि भिक्षुकशाही रसातळाला गेलीच !
  प्रदर्शनासाठी तिचा वाळवून ठेवलेला नमुनाही हाती लागणार नाही. पण हा सोन्याचा दिवस उगविण्यापुर्वी ब्राह्मणांनी या तीन महापातकांबद्दल भटेतरांच्या मनावर डागलेली धार्मिक पापपुण्याची मोहीम नाहीशी करणे फार कठीण काम आहे.
  - प्रबोधनकार ठाकरे

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. तुम्हाला मनुस्मृती अतिप्रिय आहे कदाचित कारण जर ती तुम्हाला नको असेल तर कशाला त्याविषयी बोलता ? इतर धर्मिय मग ते इस्लाम-ख्रिश्चन-जैन-लिंगायत काही बोलत नाहीतर कारण त्यांना मनुस्मृती विषयी काही आस्था नाही आणि विरोधही नाही कारण तो त्यांचा प्रश्न नाही मग तुम्हाला कशाला पाहिजेत चौकशा ?

   हटवा
  2. महर्षी मनु महाराजांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे न्यायव्यवस्था आणि समाजशास्त्र आहे.त्यामध्ये कोणत्याही पानात दलित हा शब्द आलेलाच नाही.आत्ता जे काही दलित आंबेडकरवादी ओरडत असतात मनु महाराजांविरोधात ते दलित आजही स्वत:ला शुद्र समजतात असे आपल्याला म्हणावे लागेल.मनुंची व्यवस्था हि कर्मावर आधारीत होती त्यामुळे आत्ताचा कोणी म्हणु शकत नाही की आम्ही त्यावेळी शुद्र होतो आणि आजही शुद्रच आहोत.त्यामुळे मनु नेमका आजच्या ओणत्या जातीच्या विरोधात होता हे सांगणं कठिण आहे.

   हटवा
 6. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 7. अगदी योग्य मराठा आरक्षणाविरोधात बोलताना एक दलीत-आंबेडकरवादी (महार होता की बौद्ध माहीत नाही) म्हणाला होता पोरी आमच्या बरोबर झोपवा मग आम्ही समर्थन देऊ आरक्षणाला.दुसर्या समाजातील स्त्रीयांविषयी असे बोलणारे आंबेडकरवादी मनुस्मृतीला स्त्रीयांचा अपमान केला म्हणून विरोध करतात तेंव्हा त्यांच्या अकलेची पात्रता समजते.जय भिम जय आंबेडकर आणि जय स्त्रीवाद (खास आंबेडकरवाद्यांचा)

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

   हटवा
  2. मग तुम्ही मोठ्या मित्राच्या नात्याने समजुत काढायची ना की ," आरक्षण देणं हा तुमचा अधिकार नाही सरकारचा आहे",आता आम्ही असे म्हंटले तर चालेल की समानता प्रस्थापित करणं आमच्या हातात आहे त्यामुळे तुम्हाला समानता पाहिजे असेल तर तुमच्या पोरी आमच्या खाली झोपवा म्हणजे अस्पृश्यता नष्ट होऊन समानता प्रस्थापित होईल.बघा जमतय का.शेवटी ते अल्पजीवी आहेत त्यांना समजून घेणे आमचे कर्तव्य आहे ते प्रामाणिक पणे केले पाहिजे.

   हटवा
 8. आणखी किती वष्रे मनुस्मृती जाळणार?
  http://www.loksatta.com/vishesh-news/dr-babasaheb-ambedkar-manusmriti-dahan-1369640/
  मनुस्मृतिदहन केल्यानंतरची ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी डावे-पुरोगामी पार पाडणार आहेत काय? मनुस्मृती जाळल्यानंतर त्याऐवजी काय स्वीकारायचे आणि जीवननिष्ठा कशाशी जोडून घ्यायची हे ठरविणार आहेत काय? जोपर्यंत ही गोष्ट ते ठरविणार नाहीत तोपर्यंत त्यांना मनुस्मृतीच जाळणे भाग आहे आणि मनुस्मृतिदहन ही आता कसलीही रिस्क नसलेली सोपी गोष्ट होऊन बसली आहे. आम्ही अजूनही पुरोगामी आहोत, हे दाखविण्यापुरताच आता तिचा उपयोग उरला आहे. मनुस्मृतिदहन करून आपण भारतीय संस्कृतीमधली सर्वात वाईट गोष्ट निदर्शनास आणतो आणि तसे करण्याची आवश्यकताही काही प्रमाणात आहे; परंतु त्यापेक्षा जास्त आवश्यकता आपल्या संस्कृतीमधला सर्वात उज्ज्वल ठेवा अधोरेखित करण्याची आहे आणि हे मात्र आपण कटाक्षाने टाळतो.

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. स्वत:ला स्वामी ठरवून सर्व बहुजन समाजाला आणि समस्त स्त्री वर्गाला नीच वागणुक देणारा ग्रंथ मनुस्मृति म्हणजे कायदेसंहिता होता.पुष्यमित्र शुंगाने बौद्धधर्माचा विनाश केल्यानंतर सुसंस्क्रुत, अहिंसक आणि करुणावान अशा बहुजन समाजावर लादलेली रानटी संहिता होती.इ.स.पु.२०० पासून इंग्रजांच्या काळापर्यंत म्हणजे २००० वर्षाचा काळ होतो.एवढा अत्याचार सहन करूनही आज त्याविरुद्ध चिड आहे ती जास्त करून दलितांमध्ये भरपूर प्रमाणात आहे.प्रत्येक वर्षी ती जाळली जाणार जसं तुम्ही आमच्या मुलनिवासी राजा महात्मा रावण यांचा पुतळा जाळता.

   हटवा
 9. ज्या मनुच्या ग्रंथाने भारत देशामध्ये चार वर्ण आणि जातीयता निर्माण केली.ज्या मनुमुळे देशामुळे जातीय तेढ निर्माण झाली.माणसाला माणुस म्ह्णून जगण्याचा आधिकार राहिला नाही.क्षुद्रांना तर आधिकार नाहीच उलट स्त्रीयांना केवळ भोगवस्तु म्हणून संबोधण्यात आली.मानव हा मानव म्हणून जगणार नाही अशी परिस्थिती निर्मान झाली त्याला जबाबदार एक ग्रंथ जो मनुस्मृति.महात्मा फ़ुलेंनी पहिल्यांदा विरोध केला आणि नंतर आंबेडकरांनी ती जाळून टाकली.त्यामुळे मागासवर्गिय लोकांना त्याबद्दल राग असंणं स्वाभाविक आहे.आजच्या जातीयव्यवस्थेला कोणी कारणीभुत असेल तर ती मनुस्मृति आहे.स्त्रीयांविषयी तर मनु एकदम नीच पातळीवर जातो स्त्री ही संभोगासाठी आतूर असते असे मनु म्हणतो.मग मनुची आई ही एक स्त्री होती हे तो विसरलेला दिसतो.प्रत्येक स्त्रि ही आईचच रुप असतं असं आमची संस्क्रुती आम्हाला सांगते मग अशा वेळी आपण शांत रहायचं का ?

  प्रत्युत्तर द्याहटवा
 10. मनुला जाऊन आता हजार वर्षे झालेली आहेत त्याचे म्हणने आपण आज मानलेच पाहिजे असं नाही.आज कोणी किती लोकं मानतात मनुला ? किंवा त्याच्या ग्रंथाला ? कोणीही माननार नाही.काळाच्या ओघात सर्व काही मागे पडत आहे.आज जुण्या काळातील स्त्री राहिली आहे का ? नाही, तर आज स्त्रीयाही पुढे आल्या आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यामुळे विनाकारण मनु ला विरोध करून आपली राजकीय पोळी कुणी भाजू नये.जो मनु आज नाहीसा झाला आहे त्याची पुन्हा पुन्हा आठवण काढण्यात काय फ़ायदा आहे ? अशाने ज्यांना मनु माहीत नव्हता ज्यांनी उभ्या आयुष्यात कधी मनुचे नावपण घॆतले नाही त्यांना आता मनु समजेल कोण होता.

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. प्रश्न मानण्याचा नाही.राजसत्तेवर धर्मसत्तेचा वरचस्मा पाहिजे असे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस म्हणाले होते. जरी आपण सं म्हणालो की आज कोणी मानणार नाही पण एक गोष्ट होऊ शकते, मनुस्मृति ही हिंदुंची अस्मिता आहे.मनुस्मृति रोजच्या वापरात आली तर तीचे समर्थक तयार होऊन आमलात आणायची मागणी होऊ शकते जे त्यांना पाहिजे आहे.मनुचे समर्थक तयार झाले तर हिंदुत्व आणखीनच कट्टर होईल आणि राज्यघटनेला फ़टका बसण्याचा तोटा आहे.म्हणून मनुस्मृति बंद केली पाहिजे.अभिव्यक्तीच्या नावाखाली काहीही चालणार नाही.ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे.

   हटवा
  2. मुळात मनुस्मृतिला शिव्या देणार्या अक्कलहीन लोकांना माहीत नाही की कोणत्तेही पुस्तक किंवा ग्रंथ १००% शुद्ध नसते एवढंच नाही तर भारतामध्ये दलितोद्धारासाठी लिहिलेली राज्यघटना पण १००% शुद्ध नाही.त्यातही दलितांना ब्राह्मण ठरवलेले आहे त्यामुळे आंबेडकरांनी मनुस्मृति जाळून परत मनुस्मृतिची दुसरी बाजू मांडलेली आहे राज्यघटनेतून.मनुस्मृतिमध्ये ब्राह्मणांना वरचे स्थान होते तर राज्यघटनेमध्ये दलितांना वरचे स्थान.मग मनुस्मृति आणि राज्यघटनेमध्ये काय फ़रक आहे ?

   हटवा
  3. मनु महाराज हे इश्वांकु कुळातील क्षत्रिय होते ते ब्राह्मण नव्हते हे समजल्यावर बर्याच लोकांचा विरोध मावळेल मनुंवरचा.प्रत्येक लिखान हे काळानुसार लिहिले गेलेले असते.त्याचा आपण आदर केला पाहिजे.

   हटवा
  4. मला भारतीय राज्यघटना आणि मनुस्मृति यामधील एक निवडायला सांगितले तर मी मनुस्मृति निवडीन कारण ती गुणकर्मावर आधारीत आहे जे काही फ़ायदे असतील किंवा शिक्षा असतील त्या गुणकर्मावर आधारीत आहेत उलट राज्यघटनेमध्ये सर्व फ़ायदे आणि शिक्षा जातीवर आधातीत आहेत.तरीही मनुस्मृति जर जाळण्याच्या लायकीची असेल तर राज्यघटनेचे काय करायचे ? तुम्हीच ठरवा

   हटवा
  5. आम्ही आजही पुरोगामी आहोत हे दाखवण्यासाठी मनुस्मृति जाळावी लागते साहेब.नाहीतर दुसरं कारण असु शकत नाही.बर आता मनुस्मृति जाळनारे बौद्ध असतात किंवा बौद्ध धम्माचे अनुकरण करनारे असतात मग यांना हिंदु पवित्र धर्मग्रंथाचा काय त्रास होतोय कळत नाही.

   हटवा
 11. आज अस्पृश्यता बद्दल फ़ारच गवा-गवा केला जातो त्यासाठी महर्षी मनुंच्या मनुस्मृतिला जबाबदार धरले जाते.भारतीय पुरोगामींना एक घाण सवय आहे ती म्हणजे कारणं शोधण्यापेक्षा परिणामावर रडत बसणे.प्रत्येकजण अस्पृश्यता किती वाईट आणि अस्प्रुष्यतेला मनुस्मृति कशी जबाबदार आहे हे टाहो फ़ोडून ओरडत असतो.पण कसे का झाले ? ते अतिक्षुद्रांच्याच बाबतीत का झाले ? याचा अभ्यास कोणी करताना दिसत नाही.त्यांच्या या अवस्थेला बर्याच वेळी राहणीमान जबाबदार होते.आमच्या पंचक्रोशीत ५०-६० वर्षापुर्वी अस्पृश्यता होती.त्याचं तसं कारणही होतं.अत्यंत घाणेरडे राहणीमान (ज्यात आज ४०% फ़रक पडलाय) गावाच्या बाहेर एका ठिकाणी मेलेलं जनावर आणुन टाकलं जायचं.जनावर टाकलं रे टाकलं की सर्व दलित (म्हणजे महार-मातंग) घरी जे काही हत्यात असेल ते घेऊन,घरात असतील ती भांडी घेऊन तिथे जात व मेलेल्या जनावाराचे मांस काढून आणत असत.त्यासाठी एकमेकांशी भांडणही होत असत.घरी आणल्यानंतर ये मांस वाळवून पोत्यात घालून माळ्यावर ठेवत असत आणि ज्या वेळी तलप येईल खायची तेंव्हा ते वाळलेले मांस काढून पाण्यात उकडून शिजवून खात असंत.त्या मांसाचा इतका घाण वास येत असत की दारावरून जाणारा एखाद सवर्ण बेशुद्ध होईल.असल्या घाणेरड्या वागण्याने त्यांना अस्प्रुष्य मानले गेले यात सवर्णांची चुक होती असे मला अजिबात वाटत नाही कारण जे शिकलेले दलित आहेत ते आजुनही बाकी दलितांशी जवळचे संबंध प्रस्थापित करत नाहीत.त्यामुळे पुरोगामींनी तोंडाची गटार उघडण्यापुर्वी कोणत्याही विषयावर खोल अभ्यास करावा

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. आपल्या लिखानातून अस्पृश्यता समर्थन वाहत आहे.तुम्ही म्हणता घाणेरडे राहणीमान कारणीभुत होते मग बाबासाहेब आंबेडकर तर कायम स्वच्छ असायचे ते तर सुटा-बुटात असायचे मग ते का अस्पृश्यतेचे शिकार झाले ? त्यांच्या शाळेत झाडलोट करणारी बाई सुद्धा आंबेडकरांना पाणी देताना वरूनच द्यायची. बडोद्याचे महाराज (ज्यांच्या बद्दल आजही आम्हाला आदर आहे) यांच्या राजदरबारातील साधे कारकूनही आंबेडकरांशी चुकीचे वागायचे.फ़ाईल लांबच फ़ेकायचे आंबेडकरांच्या हातात कधी देत नसत हे सर्व घडण्याचे कारण काय होते सांगु शकाल काय ?.त्यामुळे केवळ आरोप करणे चुकीचे आहे.

   हटवा
 12. ज्या मनुस्मृतिनं दलित समाजाला शिक्षण नाकारलं होतं, ज्या मनुस्मृति नं आम्हाला माणूस म्हणून स्वीकारलं नव्हतं.ति मनुस्मृति बहुजनावर लादणार्या ब्राम्हणी व्यवस्थेच्या ढुंगणावर लाथ मारण्याचं काम बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातुन केलं.पण संविधान संपवायला सरसावलेले हिजडे परत एकदा आमच्यावर मनुस्मृति लादु इच्छीताहेत.आणि लादत आहेत.याला जबाबदार जितकी बळकट ब्राम्हणी व्यवस्था आहे तितकेच आपणहि आहोत.
  आज लोकशाहिचे चारहि स्तंभ संसद, न्यायपालिका,प्रशासन मिडिया ब्राम्हणांच्या ताब्यात आहेत.मग आम्ही कितीहीआकांडतांडव एक केलं तरि त्यातुन काहीच साध्य होणार नाहि.कारण बाबासाहेब म्हणाले होते की इथून पुढे राजा हा राणीच्या पोटातून जन्माला येणार नाहि तर तो मतपेटितुन जन्माला येईल.पण आज जन्माला आलेला राजा मतपेटितुन आला खरा पण तो षंड् होऊनच.म्हणूनच आमचे आमदार खासदार यावर काहीही करु शकत नाहीत.
  संविधानात आमचा प्राण आहे .पण ते संविधान आर एस एस,भाजपा,काँग्रेस संपवत आहे.आणि आम्ही त्यांची धुवायला हात मागे सारून तयार होतोय.शञु आमचा गळा दाबतोय् आणि आम्ही त्याला आमच्या घराचा दरवाजा सताड उघडा ठेवला आहे.मनुमुळे आमच्या महापुरुषांचे कितीतरी बळी गेलेत आणि जात आहेत आणि आपण फक्त आंदोलन ,मोर्चे काढून बारा दिवस दुःख पाळतो.कारण सोडून परिणामावर चर्चा करतो.माझ्या बांधवानो ज्या आर एस एस, भाजपा ने आम्हाला संपवले तेच लोक बाबासाहेंबाची १२५वी जयंती साजरी करण्याचं नाटक करत आहेत.आणि आमचे षड् लोक त्यांच्या षड््यंञात सामील होत आहेत.आम्हाला हवेत ठेवत आहेत.यासाठी आपण जाग्रुत झालं पाहिजे आम्हि आमचे वाद,आमची भांडणं बाजूला ठेवली पाहिजेत.शञुच्या खोट्या भुलथापाना बळी पडण्यापेक्षा तर्क करा सजग राहून ब्राम्हणी व्यवस्था संपवून टाकण्यासाठी फक्त एकदाच, फक्त एकदाच आपण आप आपल्यातला वाद बाजूला ठेवा.ही समस्या एका जातीची नाहि.तर आम्हा सर्व मुलनिवासी बांधवाची आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 13. स्वयंसेवक संघाचे चालक भागवत म्हणाले होते की संविधान हे काही जगण्याचे साधन नाही.संविधानाशिवाय आपण जगू शकतो.हेच अंतिम सत्य आहे आणि त्याच्या सिद्धतेसाठी आपण झटले पाहिजे.विषमतावादी संविधान संपवणे गरजेचे आहे तरच सवर्णांना सन्मान मिळेल.

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. भागवतांना वाटतय एवढं सोप्प नाही ते.कायदे बदलणे आणि संविधान बदलणे यात फ़रक असतो कायदे काळानुसार बदलू शकतात.पण संविधान बदलणे म्हनजे अति झाले.संविधानामूळेच आपला देश एवढ्या समस्या असतानाही एकसंघ आहे.अन्यथा देशाचे कधीच तूकडे झाले असते.त्यामुळे संविधानाला पर्याय नाही पण कायदे बदलू शकतात.

   हटवा
 14. बहुजनवाद्यांची मोठी बोंब काय आहे माहीत आहे का ? त्यांच्या म्हणण्यानुसार बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या जातीवर आधारीत कायदे करणार्या राज्य-घटनेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले गेले आहे आणि ते सगळ्यांना लागू आहे पण त्याच आंबेडकरांनी मनुला मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले नाही त्याचा ग्रंथच जाळून टाकला.ही आंबेडकरांची अभिव्यक्ती म्हणायची ? आंबेडकरांनी दलितांना जातीवर फ़ायदे दिले आणि जातीय विषमता नष्ट व्हावी अशी इच्छा धरली हेच मला आश्चर्य झोपू देत नाही.क्षुद्रांना मरणयातना देणारी मनुस्म्रुती जाळून सवर्नांना मरनयातना देणारी घटना लिहिली ती जाळली तर आंबेडकरांना वाईट वाटणार नाही अशी मी अपेक्षा करतो.
  जय हिंद जय हिंदोस्थान

  प्रत्युत्तर द्याहटवा
 15. ब्राह्मणांनी कुळवाडीभुषण छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर नाकारून शुद्र म्हनून अपमान केला.संभाजी महाराजांचा मनुस्मृतिनुसार वध केला.राजर्षी शाहू महाराजांचा अपमान करनारे शाहुंच्या तुकड्यावर जगणार्या ब्राह्मण.या सगळ्याचा बदला घेतला विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी.आंबेडकरांना मानाचा मुजरा.२५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्म्रुती जाळल्यानंतर दुसर्या दिवशी बाबासाहेब हे शिवरायांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर गेले होते.तोच दिवस हा विजय दिवस म्हनूण जगले पाहिजे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. अरे झंडूबामसेफ़ी पहिली गोष्ट म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केल्याचा एकही पुरावा नाही ती बामसेफ़ी आणि ब्रिगेडी थाप आहे.संभाजी राजेंचा वध नाही खुण केला होता तोही औरंजजेबाने.शाहू राजांना ब्राह्मणांनी त्रास दिला हे मान्य पण तरीही शाहूंनी ब्राह्मणांना मदत केली वसतीग्रुहे बांधली त्यातून शिका काहीतरी.यासगळ्याचा बदला आंबेडकरांनी घेतला ही तर सगळ्यात मोठी थाप.इतिहास अभ्यासा मग अकलेचे तारे तोडा.

   हटवा
 16. शेतकर्यांच्या आत्महत्या,भुकबळी, लुटमार,महिलांवर होणारे शारिरिक अत्याचार, धार्मिक आतंकवाद, देवळांमधून गोळा केली जाणारी अवैध मालमत्ता, कर्मकांड, बोगस हिंदू सण उत्सवांमध्ये होणारी वित्तहानी, हिंदू-मुस्लिम दंगली, भ्रष्टाचार, स्त्री देहाचा नंगानाच ही सर्व या मनुस्मृतिची देण आहे.म्हनून ती दरवर्षी जाळली पाहिजे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. पण हे सगळं जे भोगतायत त्यांना मनुस्मृति माहीत आहे का ? जे लोकं बलात्कार करतात त्यांनी मनुस्मृति वाचलेली असते का ? परवा दलितांनी सवर्णाच्या मुलीवर बलात्कार केला होता तो काय मनुस्मृति वाचुन केला होता का ? दरोडे मनुस्मृति वाचुन पडतात का ? मानवी म्हणा किंवा पुरुषी म्हणा त्या विक्रुतीला मनुस्मृतिच्या आधारे विरोध करणे चुक आहे.काय काय महाभयंकर शोध लावता.

   हटवा
 17. पुन्हा पुन्हा मनुस्मृती...
  हरी नरके यांच्या ब्लोगवरून साभार
  दरवर्षी 25 डिसेंबरला मनुस्मृती दहन दिनानिमित्त मनुस्मृतीच्या आठवणींना उजाळा मिळतो. मनुविरोधक आणि मनुसमर्थक यातले बहुतेक मूळातले फारसे काहीही न वाचताच "तेव्हढेच ज्ञानप्रकाशात" चमकून घेतात.
  1.मनुस्मृती हा कायद्यांचा कायदा असलेला प्राचीन ग्रंथ आहे. त्याचे इंग्रजी नाव " Manu's code of Law" "Manav Dharmashastra " आहे. त्यावर महात्मा फुले, पेरियार, डा.बाबासाहेब आंबेडकर आदींनी गंभीर आक्षेप घेतल्यामुळे व 25 डिसेंबर 1927ला महाडला तो बाबासाहेबांनी जाळल्यामुळे त्याची चर्चा जास्त होते.
  2.त्याच्या लोकप्रिय आवॄत्त्या बाजारात आहेत त्या प्रामुख्याने वाईच्या बापट शास्त्री यांनी मराठी अनुवादासह प्रकाशित केलेल्या आहेत. प्रकाशक आहेत रमेश रघुवंशी आणि वितरक आहेत गजानन बुक डेपो, मुंबईत दादरला कबुतर खाना आणि पुण्यात भरत नाट्य मंदिरासमोर.
  3.हा ग्रंथ 2684 श्लोकांचा आणि 12 अध्यायांचा आहे. मनुस्मृतीचा कालसापेक्ष अर्थ लावणारे मेधातिथी आदी विद्वानांचे भाष्यग्रंथ वाचल्याशिवाय मनुस्मृती वाचणे अर्धवट ठरेल.
  4. मेधातिथी ते पुढच्या सर्व भाष्यकारांच्या भाष्याचे भारतीय विद्याभवनने 8 खंड प्रकाशित केलेले आहेत.
  5. मनुस्मृतीची संशोधित आवृत्ती प्रकाशित झालेली आहे.
  Manu's code of Law, By Patrick Olivelle,OXFORD University Press, 2005.
  6. मनुस्मृतीवर टिकात्मक भाष्य करणारे लेखन अनेकांनी केलेले असून त्यातील नरहर कुरूंदकर, पटवर्धन, डा.आ.ह. साळुंखे आणि भदंत आनंद कौशल्यायन यांचे ग्रंथ खूपच गाजलेले आहेत.
  7."हिस्ट्री आफ धर्मशास्त्र", धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथात [खंड 1, पृ.306 ते 349] भारतरत्न पां.वा.काणे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा ग्रंथ इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.स. 2 रे शतक याकाळात विकसित झाला.
  8. डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते इ.स.4 थ्या शतकात अस्पृश्यता निर्माण झाली तेव्हा त्याची अंमलबजावणी सुरू झाली. "भारतीय जातिसंस्थेचा इतिहास" लिहिणारे इतिहासकार संजय सोनवणी यांच्या मते 11/12 व्या शतकानंतर या ग्रंथाची जबरी पकड भारतीय समाजावर बसली. त्यामुळे सर्व स्त्रिया व शूद्र आणि अतिशूद्र यांना भेदभाव,पक्षपात,अन्याय, शोषण यांची शिकार व्हावे लागले. इतिहासकार उमेश बगाडे यांच्या संशोधनानुसार भारताचा सर्व महसुली कारभार या ग्रंथाच्या आधारे चालवला जाई, अगदी कडव्या औरंगजेबाच्या काळातही महसुलव्यवस्था याच ग्रंथाच्या आधारे चालवली जात होती असे ते म्हणतात.
  9. इतर अनेक स्मृती असल्या तरी मनुस्मृतीला एकप्रकारच्या संविधानाचा दर्जा होता. तो केवळ धर्मग्रंथ नव्हता तर तो कायद्याचा ग्रंथ असल्याने, अन्यायकारक कायदे आणि राजदंडाच्या आधारे करण्यात आलेला घटनात्मक अन्याय म्हणून मनुस्मृतीवर जास्त बोलले/लिहिले जाणे स्वाभाविक आहे.
  10. अर्थात मनुविरोधक किंवा मनुसमर्थक हे सारे ग्रंथ वाचून मगच आपली मते बनवतात असा आरोप मी करणार नाही.
  11. अगदी इंग्रजी राजवटीतही आयपीसी, सीआरपीसी तयार होईपर्यंत अनेक बाबतीत आणि ते तयार झाल्यावरही कौटुंबिक विेषयावर मनुस्मृतीच प्रमाण मानली जाई.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 18. ज्याच्या अंशा पासून , " मनुष्य " निर्माण झाले जन्मले .... तोच मनु
  मनु लिहतो -
  " जन्मना जायते शूद्र: कर्मणा द्विज उच्यते। "
  मनुष्य जन्माला शूद्र म्हणूनच येतो , पुढे कर्मान तोे ब्राह्मण शुद्र क्षत्रिय वैश्य होतो

  प्रत्युत्तर द्याहटवा

टिप : "नाव/URL" च्या सहाय्याने प्रतिक्रिया देताना आपल्या नावासमवेत सामाजिक संकेतस्थळ (उदा. फ़ेसबुक,ट्विटर इ.) खाते जोडणे आवश्यक आहे.तरच प्रतिक्रिया प्रकाशित केली जाईल.तसेच अनामित प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाहीत.