२२ जून, २०१६

बुधवार, जून २२, २०१६
11
         "जात" म्हणजे भारतीय समाजाचा तथा हिंदु धर्माचा अविभाज्य घटक आहे.पण हा घटक आता हिंदु धर्मापुरता मर्यादित राहिलेला नसून तो आता भारतासाठी वैश्विक स्वरुपाचा झालेला आहे. त्यात पुरोगामी समजल्या जाणार्या महाराष्ट्रात तर जात म्हणजे जगण्याचे कारणच.माणूस जन्माला येताना काही घेऊन येत नाही आणी जाताना सुद्धा रिकामाच जातो अशा आशयाच्या म्हणीला महाराष्ट्र अपवाद आहे.कारण इथे माणूस जन्मता जात घेऊनच येतो मग भलेही तो जाताना रिकामा जावो.इथे मराठी माणुस फ़क्त भाषेमध्ये आहे बाकी ज्याची त्याची ओळख ही जातीशिवाय शक्य नाही.ज्यांच्या नावाने महाराष्ट्राला पुरोगामी समजले जाते त्या फ़ुले-शाहू-आंबेडकर यांना पण जात असेल तर मग आम्ही त्यांचे अनुयायी कसे मागे राहू ?.ही मातीच एवढी परिपक्व झालेली आहे की इथे एखाद्याच्या नुसत्या आडनावावरून (कधी कधी तर नावावरून) जात सांगण्याचं कौशल्य जन्मजातच आत्मसात होतं (त्याचा वापर भलेही वेळाने होवो पण होतोच).आजपर्यंत आपण या महान राष्ट्रामध्ये दोनच प्रकारचे लोकं बघितले किंवा तसे आम्हाला दाखवले गेले, ते म्हणजे "पुरोगामी" आणि "प्रतिगामी" आणि आम्हीही असेच समजत राहिलो की खरंच हे दोनच प्रकार ज्वलंत आहेत पण वास्तवात कोणी डोकावण्याचे कष्ट घेतले नाहीत.त्याच्या कडे आता डोळसपणे आणि गांभिर्याने बघण्याची आवश्यकता वाटू लागली आहे.कारण अज्ञानात सुख मिळत असेल पण जास्त दिवस नाही.कारण सत्य सुर्यप्रकाशासारखे असतं, कोणी डोळे झाकून भलेही म्हणो सुर्य उगवणार नाही; पण ज्यावेळी सुर्य उगवतो तेव्हा बंद डोळ्यातूनही प्रकाश दिसायला लागतो.म्हणून वेळ जाण्याआधी सत्य समजून घेण्याची गरज आहे मग ते कितीही क्लेशदायक असो.
       "सैराट" चित्रपट सर्वांनी पाहिला असेलच यात शंका नाही.आता तो चित्रपटग्रुहामध्ये असो किंवा अन्य माध्यमातून असो.त्यामुळे कथा सांगण्यात वेळ नको घालवायला.तर काय आहे त्यात ? संघर्ष; उच्च जाती आणि कथित निच जातीतला.असे विषय बर्याच सिनेमांनी दाखवले आहे पण त्यामधील संघर्ष हा श्रीमंत आणि गरीब यामधील होता.हिंदी तथा मद्रासी मध्ये देखील अशाच आशयाचे चित्रपट येवून गेलेत.सैराट जास्त चर्चेत राहिला तो जातीय मानसिकतेच्या दर्शनामुळे.म्हणजे कलेला जात-धर्म काहिहि नसते याला आपली मराठी चित्रपट स्रुष्टी अपवाद आहे.हे आजपर्यंतच्या चित्रपटांपासून ते आजच्या सैराट पर्यंतचा प्रवास बघता लक्षात येईल.सैराट चर्चेत राहिला तो त्यातील काल्पनिकतेमुळे म्हणजे वास्तव डावलून एका समाजाला समोर धरून वास्तवाला बाजूला सारून केलेला कल्पनाविलास.सैराटला कथित मागासवर्गियांनी जसे समर्थन केले तर उच्च जातीतील लोकांनी विरोध दर्शवला आणी ज्यांचा कोणत्याही सामाजिक चळवळीशी संबंध नाही त्यांनी मात्र चित्रपटाची मजा घेतली आणि चित्रपटाला घबाड मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.अज्ञानाच्या सुखातून बाहेर आल्यानंतर आपणही पैसे मोजून स्वत:चेच धिंडवडे काढून आलोत याचा साक्षात्कार बर्याच जनांना झाला.
             मराठी चित्रपट म्हंटलं की ग्रामीण भाग आलाच तसेच ग्रामीण भाग म्हंटलं की पाटील आलेच आणि पाटील म्हणजे खलनायकच असा काहीसा समज मराठी चित्रपट दिग्दर्शकांचा झालेला दिसतो.जसं प्रत्येकाच्या इतिहासामध्ये चंदन आणि कोळसा आहे पण आमच्या दिग्दर्शकांना बहुतेक कोळस्याचेच डोहाळे लागलेले दिसतायत.त्याशिवाय एखाद्या अपवादासाठी एवढा पैसा आणि वेळ कोणता मुर्ख वाया घालवेल ?.सैराटमधील काही गोष्टी अशाच बर्याच लोकांना खटकल्या मग त्या जातीविषयी असो किंवा शिवरायांची प्रतिमा वापरल्यामुळे असो.अजुनपर्यंत मंजुळेंनी या विषयी मौन बाळगल्यामुळे शंका बळकट झाल्या.उच्चवर्णियातील मराठा जातीतील स्त्रीयांना किंवा मुलींना केंद्र मानून बनवलेला हा पहिलाच चित्रपट असता तर योगायोग किंवा निर्मळ कलाक्रुती समजली जाऊ शकत होती.म्हणजे मंजुळेंच्या शेवटच्या दोन चित्रपटाकडे सदविवेकबुद्धीने पाहिल्यास कोणालाही समजुन येईल की आता मागासवर्गियांच्या नव्यान्नव टक्के समस्या संपल्या आहेत त्यांना त्यांचे हक्क आणि आधिकार मिळालेले आहेत ज्यापासून ते वंचित होते. आता फ़क्त उच्च जातीतील मुलींनी इतर,त्यातही दलित जातीतील मुलांशी प्रेम करावे,विवाह करावेत,अगदी पळून जाऊन करावेत मग मुलगा दमडीही कमवत नसला तरी चालेल पण आम्ही मात्र आमच्या खालच्या जातीत मुलगी देणार नाही,म्हणजे जातीयवाद संपला पाहिजे पण दुसरा करतात ते आम्ही मात्र अजिबात सुधारणार नाही आम्हाला असेच स्विकारा हि मागासवर्गियांची बहुतेक सध्याची सर्वात मोठी सामाजिक गरज वाटत असावी.म्हणजे जातीवर आधारीत आरक्षणाचा लाभ घेणार्यांनी आंतरजातीय विवाहाविषयी बोलावे म्हणजे त्यांच्यासारखे मुर्खशिरोमणी या विश्वात दुसरे कोण नसल्याचेच लक्षण आहे.सैराटमधून दिग्दर्शकाला नेमका काय संदेश द्यायचा होता तेच कुणाला कळालं नाही.असो चित्रपटाचा भाग इथे संपला.
मराठ्यांचा बहुजनवाद
          "अंगलट येणे" हा वाक्यप्रचार तुम्ही ऐकलाच असेल.तशी गत आज बहुजनवादी मराठ्यांची झाली आहे."ना घर का ना घाट का" अशी अवस्था होण्यामागे ते स्वत:चा जबाबदार आहेत.मराठयांचा बहुजनवाद किती तकलादु आहे याची प्रचिती आरक्षणाच्या मागणीच्या वेळी आली होती.पण स्वत:ला बहुजन म्हणवणार्या लोकांची मराठ्यांच्याबद्द्ल काय मानसिकता आहे हे पुन्हा एकदा सैराटच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले.बहुजनवाद आणि परिवर्तनवादी झापडे घातल्यामुळे मराठ्यांना अंधपणा आला होता तो सैराटच्या झटक्याने विस्कळीत झाला.एवढी वाईट अवस्था मराठ्यांची कधीच झाली नसेल.या आधी समाजाने बहुजनवादाची झालर पांघरून ब्राह्मणांना आणि हिंदुत्ववाद्यांना शिव्या देण्याचे काम केले त्यामुळे ते दुर गेले आणि आता बहुजनवाद्यांच्या आतील मानसिकतेमुळे बहुजनवादाला सोडचिट्टी देण्याची वेळ आली आहे.
           बहुजनवादाची संकल्पनाच निव्वळ कोणत्याना कोणत्या जातीच्या द्वेषावर आधारीत आहे.सगळे मिळून आधी ब्राह्मणांचा द्वेष करायचा आणि नंतर मग सोईनुसार  आपापसातच वाद घालत बसायचं.मग मराठा आंबेडकरांना विरोध करनार आणि आंबेडकरवादी महार शिवरायांचा द्वेष करणार हा यांचा अंतर्गत बहुजनवाद.असा गोंधळ हिंदुत्ववाद्यांमध्ये नाही होत त्यांचे दैवत आणि प्रेरणास्थान श्रीराम आणी शिवराय.पण बहुजनांमध्ये मात्र महापुरुषांची मांदियाळीच तीही त्यांच्या जातीसकट,कोणता घेऊ आणि कोणता सोडू अशी अवस्था बहुजनवांद्यांची झालेली आहे.या सगळ्या भानगडीमधली सर्वात विशेष गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या निमित्ताने मराठ्यांवर टिका करण्यात बहुजनवादी / आंबेडकरवादी अग्रेसर होते जे अपेक्षित नव्हते.आज बहुजन विरुद्ध ब्राह्मण किंवा मराठा वि.ब्राह्मण हा वाद बर्याच बहुजन संघटनांचा मुख्य कणा आहे त्यातीलच एका संघटनेच्या खेडेकर नामक लेखकांनी ब्राह्मण स्त्रीयांच्या विषयाचे लिखान केले त्यामुळे ब्राह्मण वर्गाने मराठा समाजावर टिका केली असती तर नवल वाटण्याचे काहीच कारण नव्हते ती साहजिकच प्रतिक्रिया ठरली असती.पण तशी एकही प्रतिक्रिया कुठे पाहायला मिळाली नाही उलट ब्राह्मण तथा हिंदुत्ववादी मंडळींनी चित्रपटाला विरोधच केल्याचे दिसते यातुन जर स्वत:ला बहुजनवादी म्हणवून घेणारे मराठे काही शिकणार नसतील तर या विश्वाच्या पसार्यात त्यांच्या सारखे करंटे तेच.झालं-गेलं ते काही पुर्वरत होऊ शकत नाही,पण चालत्या वेळेमध्ये मिळुन बदल नक्कीच घडवू शकतो.सांगणं एवढंच की "अजुनही वेळ गेलेली नाही".
अभिजीत पाटील, कोल्हापूर.
मराठा । इतिहास । वारकरी । धर्म । अध्यात्म । तंत्रज्ञान । पुरोगामी । शेतकरी । राष्ट्रवादी

11 प्रतिक्रिया:

 1. बहुजनवादाची संकल्पनाच निव्वळ कोणत्याना कोणत्या जातीच्या द्वेषावर आधारीत आहे.सगळे मिळून आधी ब्राह्मणांचा द्वेष करायचा आणि नंतर मग सोईनुसार आपापसातच वाद घालत बसायचं.मग मराठा आंबेडकरांना विरोध करनार आणि आंबेडकरवादी महार शिवरायांचा द्वेष करणार हा यांचा अंतर्गत बहुजनवाद.>
  हे अगदी खरे आहे
  सध्या हेच चालू आहे . मला वाटत या फालतू गोष्टीत अडकण्यापेक्षा आपल्या समाजाचा विकास कसा होईल हे ज्याने त्याने बघावे

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. नागराज सर मी तुमचा खुप मोठा फैन होतो.ज्या पधत्तीने तुम्ही गवा कड़चि परिस्तिति मांडतत खुप सुन्दर ती आजची गरज आहे.पण या वेळि तुम्ही एकच समाजाला टारगेट करून खुप मोठी चुकी केलि.तुमचे आभार कसे मानु समजत नाइ.आज तुमचा एका चुकी मुळे बिखरलेला मराठा समाज जागा होतो हे आणि एकत्र येतो हे.खरच सर तुमचे खुप आभार.आम्हाला या वेळेस उशिरा जाग आली पण पुढचा वेळेस आम्ही एकजुटीने विरोध करू आणि मराठा ज्या वेळेस एकत्र येतो तेवा काय घडत हे सर्व जगाला माहिती आहे.या पुढे जे हरामखोर मराठा समाजाचा विरोधात जातील त्यांना आम्ही त्यांची लायकी नक्की दाखउ.खरच खुप खुप आभार सर्।।।।
  जय शिवराय जय महाराष्ट्र।।।।

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. मला एक गोष्ट खटकली..मराठा या जातीच्या लोकांन बद्दल जे दाखविले ते खरोखरच चुकीचे आहे.. त्यातल्या त्यात जे दाखविले की... पाटलाच्या घरात शिवरायांचा फोटो दाखवला .. पुतळा दाखवला..ज्या घरात शिवरायांचा फोटो अन पुतळे ,अन ज्यांच्या गाडीला शिवध्वज त्या कुटुंबातिल वातावरण तुम्ही कीती खालच्या दर्जाचे मांडले..इतक्यावर नाही थांबलें..तर त्यात शिक्षक बोलतोय कि पोरीसोबत झोपला ना मग दे विषय सोडून...लय माज केलाय पाटलांनी..तुमच्यावर कोणी अन्याय केला असेल मान्य आहे..पण त्यात मराठयांचा काय दोष...?तुम्ही उद्रेक करा आवश्यक पण उगीच मराठयांना बदनाम करू नका..ही कळकळीची हात जोडून विनंती..नाहीतर काय होईल हे दाखवायची वेळ आणु नका..!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. ते दोघेही लहान होते नुकतेच वयात आलेले त्यामुळे त्यांच्याकडे म्यॅच्युरिटी न्हवती म्हणजे त्यांचां प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण होतं .आता परशा देखणा बोट ते ठीक आहे मग अर्चित अस काय होत पराशाने प्रेम करण्यासारखं ? ही मोठी बोंबच आहे चित्रपटाची.असो मराठी चित्रपट का जातीच्या पलीकडे जाणार नाही आपली लायकी टिकवून ठेवणार यापुढेही

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. समाजातील जातीय व्यवस्था आणि त्यामुळे पीड़ित शोषित लोकांची होणारी कुचम्बना आणि अधोगति अधोरेखित करणारे सिनेमे बनवून ... सर्वांनी सैराट फ़िल्म ला थियेटर मध्ये जाऊन पाहावे आणि नागराज मंजुळे यांना मानाचा जय भीम सुद्धा द्यावा.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 6. मनुस्र्मुती मध्ये लिहिलें आहे की चरित्रहीन स्त्रीचे लक्षण आहे ती कामुक होते तेंव्हा समोरच्या पुरुषाचे वय-कुरुपता-जात-कुळ-धर्म-वर्ण काही बघत नाही.आतरजातीय विवाह करणार्या मुली अशाच चरित्रहिन असतात म्हणून ते धाडस दाखवू शकतात.माझ्या मते त्यावेळी त्यांना समोरच्या पुरुषाविषयी काही नको असते त्यांना एकाच अवयवाशी देणं घॆणं असतं.

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. माझे तर मत आसे आहे की जी कोणी मुलगी प्रेमविवाह करणार असे मग तो जातीय किंवा आंतरजातीय असो घरच्यांनी करून द्यावा.विनाकारण एक चरित्रहिन मुलगी दुसर्याच्या गळ्यात घालू नये.

   हटवा
 7. खून की वैकुंठागमन ही चिकित्सा न करणं योग्य.


  बहिणाबाईंनी एका कवितेत म्हटल्याप्रमाणे :
  अरे संसार संसार

  खोटा कधी म्हणू नये

  राऊळाच्या कळसाला 'लोटा' कधी म्हणू नये !

  प्रत्युत्तर द्याहटवा
 8. आपण चित्रपट गंभिरतेने घेतो पण जिवन नाही हे नागराज मंजुळेने म्हंतले होते ते खरे आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 9. सैराटच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून फक्त मराठा जातीला ठोकण्याचे काम केले गेले. फक्त मराठेच जातीय अहंकार बाळगून ऑनर किलिंग करतात असे पसरविले गेले. प्रत्येक जातीमध्ये जातीय अस्मिता आणि खोटा जातीअभिमान असतो हे सांगायचं प्रयत्न केला पण पिवळे चष्मे घातलेल्यांना सर्व पिवळेच दिसत होते.
  आता बुलढाणा जिल्ह्यातील निमखेड्यात एका धनगर समाजातील मुलीने मराठा समाजातील मुलासोबत प्रेम विवाह केल्याने मुलीचे वडील बाळू हिवरे याने लग्नाच्या दहाव्या दिवशी मुलीची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केली.. आंतरजातीय विवाह केल्याने बाळू हिवरेने खोट्या जातीय प्रतिष्ठेसाठी मुलीची हत्या केली.
  हि घटना काल घडली या घटनेनंतर एका जातीला ठोकणारी मंडळी गायब झालेली पाहिला मिळाली. फक्त मराठेच जातीय अस्मिता बाळगून आहेत असा घोशा लावणाऱ्या मंडळीला इतर जातीमधील खोटी जातीय अस्मिता दिसली नाही कि तिला झाकून ठेवायचे होते?? माहिती नाही. प्रत्येक जातीमध्ये जातीय अहंकार असतो प्रामाणिक प्रयत्न करून तो काढायला हवा.
  आता टीव्ही मीडियावर या घटनेची चर्चा होणार नाही.. ना या घटनेबद्दल बोरूबहाद्दर रकानेच्या रकाने भरवणार. या अगोदर त्यांनी मराठ्यांना खलनायक ठरवण्यासाठी त्यांची लेखणी झिजली होती. फक्त एका जातील टार्गेट करून यांनी काय मिळवले ??
  आमची पूर्वी पासून भूमिका आहे कि मुला मुलीच्या इच्छेने होणाऱ्या लग्नाला कोणीच विरोध करू नये. ऑनर किलिंग सारखी अमानवी घटना अशा जोडप्याबद्दल कोणत्याही जातीची असो घडू नये. खोटा जातीय अभिमान गळून पडावा यासाठी खरे जातीअंताचे काम व्हावे. आणि अशी अमानवी घटना करणाऱ्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी. त्याच सोबत अशा जोडप्यासोबत सर्व समाजानी मानवतावादी दृष्टीकोन ठेवून त्यांना कठीण काळात मदत व साथ द्यावी.
  - भैया पाटील / Bhaiya Patil

  प्रत्युत्तर द्याहटवा

टिप : "नाव/URL" च्या सहाय्याने प्रतिक्रिया देताना आपल्या नावासमवेत सामाजिक संकेतस्थळ (उदा. फ़ेसबुक,ट्विटर इ.) खाते जोडणे आवश्यक आहे.तरच प्रतिक्रिया प्रकाशित केली जाईल.तसेच अनामित प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाहीत.