१४ एप्रिल, २०१६

गुरुवार, एप्रिल १४, २०१६
9
       भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त प्रथमत: विनम्र अभिवादन.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपण बरेच वाचलेले आहे,ऐकलेले आहे.पण आज थॊडा वेगळा विषय हाताळायचा आहे.आपण बाबासाहेब आंबेडकरांना जयंती निमित्त अभिवादन करतो तसेच निर्वाणदिनी श्रद्धांजली तथा आदरांजली वाहतो.हे कार्य समाजाच्या सर्वच स्थरातून होत असते.पण प्रश्न हा आहे की समाजाच्या सर्वच स्तरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना उचित आदर मिळतो का ? याचे उत्तर कदाचित नाही असे असेल आणि हे सत्य मान्य करावेच लागेल की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दयेवर म्हणा किंवा त्यागावर जगणारे लोक आज त्यांच्याकडेच तिरस्करणीय द्रुष्टीने पाहतात.याचे कारण काय आहे याचा विचार करून भिम-अनुयायींनी आत्मपरिक्षण करून उत्तर शोधले पाहिजे.
  आजपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दलीत उद्धारक किंवा मागासवर्गियांचा नेता ठरवण्यात प्रतिगामी लोकं पुर्णत: यशस्वी झालेले आहेत.त्यात कमी म्हणून की काय आजचे आंबेडकरी चवळीतील लोकं बाबासाहेबांना महार जातीपुरतेच मर्यादित करण्याचे काम करत आहेत.महापुरुषांचा अपमान त्यांचे अनुयायीच करत असतात हे सर्वच महापुरुषांबाबत होत असतं.डॉ.आंबेडकरांबाबत विचार केला तर आंबेडकरी चळवळीतील अनुयायींकडे बघितल्यावर हे सत्य समजुन येईलच.आजची परिस्थिती नाकारण्यात काहीच अर्थ नाही.सुर्य उगवणार नाही म्हणून डोळे झाकले तरी सुर्य उगवल्यावर बंद डोळ्यातूनसुद्धा प्रकाश दिसतो.त्याचप्रमाणे सत्य ही असेच आहे जे काही वेळेसाठी लपवता येते पण कायमस्वरुपी नाही.जेंव्हा ते बाहेर येते तेंव्हा उग्र रुप धारण केलेले असते.आंबेडकरी चळवळींचा विचार केला तर त्यांच्याकडे इतर समाज अजुनही तिरस्करणीय द्रुष्टीने बघत असतो.एवढेच नव्हे तर जे लोकं आंबेडकरी चळवळीचा प्रचार-प्रसार करतात त्यांच्याशी परक्या व सुड भावनेने वागले जाते.आंबेडकरी चळवळीला एकटे पाडून किंवा त्यांच्यामध्ये फ़ुट पाडुन चळवळ दाबण्याचा प्रयत्न केला जातो.त्यांच्याशी भेदभाव व अन्यायपुर्ण वागणुक दिली जाते.
   वरील सर्व गोष्टींचा विचार केला असता.आंबेडकरी चळवळीतील सर्व लोकांनी या सर्व परिस्थितीचा गांभिर्याने विचार करून आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.निव्वळ जय भिम जयघोषाने प्रश्न सुटणार नाहीत.जय भिम जयघोष सर्व भिम-अनुयायींना एकत्र करणारा धागा असला तरी याच धाग्याने हेच अनुयायी इतर समाजापासून वेगळे झालेत याचा विचार भिम-अनुयायींनी केला पाहिजे.यासाठी अनुयायींच पुर्णत: जबाबदार आहेत ही चुक आहे याला इतर समाजातील जातीय व्रुथा अभिमान आणि अज्ञानी पणाही तेवढाच जबाबदार आहे.पण सुरुवात आंबेडकरी चळवळींमधुनच होते.
    काही दिवसापुर्वीचे ज्वलंत उदाहरण,प्रकाश आंबेडकर हे आमच्या चुलत्यांचे मित्र काही कामानिमित्त गावी आले होते.येण्यापुर्वीच दुपारीच चुलत्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि प्रकाश आंबेडकर येणार असल्याची माहिती देऊन त्यांचे तास भर व्याख्यान घेंण्याविषयी पण सुचवले.ठिक आहे बोलून कामाला लागलो सगळी व्यवस्था करण्यासाठी फ़क्त दोनच तास होते.स्टेज-मांडव उभारणीला वेळ नव्हता.म्हणून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते घेऊन विठ्ठल मंदिरात व्याख्यान घेण्याचे ठरवले आणि तिथेच व्यवस्था केली.व्यवस्था करताना लोकांच्या काय प्रतिक्रिया यायच्या किंवा विठ्ठल मंदीरात व्यवस्था करताना माझ्या कसं नाकीनऊ आले याविषयी वेगळं लिहिन कधीतरी.महत्वाचा भाग काय तर प्रकाश आंबेडकर आले,सुरवातीलाच ते महार समाजातील लोकवस्तीमध्ये त्यांची भेट घेण्यासाठी गेले.तशी मी आधीच त्या वस्तीमध्ये कल्पना दिली होती.तिथुन स्वागत समारंभ पुर्ण करून प्रकाशजी मंदिराकडे आले, येताना आंबेडकरी चळवळीचा काफ़िला सोबतच होता आणि जयघोष होत होता "बोला रे बोला जय भिम बोला" आवाज फ़क्त आंबेडकरी चळवळीचाच येत होता आजुबाजूचा समाज शांत चेहर्याने आणि मनातील खदखदत्या पार्याने सर्वकाही न्याहाळत होता.जयघोषाचा आवाज जस-जसा वाढत होता तस-तसा इतर समाजाचा पारा चढत होता.हे सर्व एका शेजारगावच्या भिमशाहीराने हेरली आणि त्यांनी "शिवाजी महाराज की जय - शाहू महाराज की जय" जयघोष केला आणि वातावरण काहिसं निवळलं.व्याख्यान संपलं थोड्या वेळाने चहा घेउन प्रकाशजी आपल्या कामासाठी रवाना झाले.
   वरील घटनेने एक लक्षात आलेच पाहिजे की बाबासाहेबांविषयीच्या तिरस्कारामागे मुख्य कारण म्हणजे आंबेडकरी चळवळीचा हा गैरसमज की डॉ.बाबासाहेबां सारखा महापुरुष इतिहासात कधी झाला नाही आणि यापुढेही होणार नाही ते एकमेवच जगाचे लोककल्याणकारी महापुरुष आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्यासुद्धा आधी महात्मा फ़ुले आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज या महामानवांनी समाज कार्याची सुरुवात केली आणि त्याच मुळे पुढचे कार्य करणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना सहज शक्य झाहे.पण आज आंबेडकरी चळवळीला महात्मा फ़ुले आणि राजर्षी शाहूंची किती आठवण आहे ? खरंतर डॉ.बाबासाहेबांच्या व्रुथा अभिमानामध्ये महात्मा फ़ुले तथा राजर्षी शाहूंचे आंबेडकरी चळवळीला विसर पडलेला आहे. डॉ.बाबासाहेबांनी केलेल्या समाजकार्याची सुरुवात महात्मा फ़ुले आणि राजर्षी शाहूंनी पुर्वीच केली होती हेच या दोन महामानवांच्या महान होण्याचे प्रमाण आहे.अशी बरेच उदाहरणे देता येतील,आज आंबेडकरी चळवळींमध्ये नवा ट्रेंड आला आहे.जो जय भिम म्हणेल त्यांच्याच महापुरुषांला आदर द्यायला नाहीतर नाही.म्हणजे आम्ही जय शिवाजी म्हणू पण मराठ्यांनी पण जय भिम म्हंटलं पाहिजे नाहीतर आम्हीही जय शिवाजी म्हणनार नाही.यांच्या याच विचारामुळे समाजामध्ये बाबासाहेब जन्मत नाहीत.म्हणजे आंबेडकरी चळवळीसाठी महापुरुषांचा आदर करने निव्वळ व्यापार झाला आहे.तु माझ्या महापुरुषाचा सन्मान कर मग मी तुझ्या महापुरुषाचा सन्मान करतो.म्हणजे महापुरुषांच्या विचारांशी यांचं काही देणं घॆणं नाही तर त्यांची जात महत्वाची आहे.
  आज सर्व बहुजन समाजासाठी शिवराय वंदणीय़ आहेत.धनगर असे म्हणनार नाहीत की यशवंत होळकरांना मानाल तरच जय शिवाजी म्हनू किंवा कोनत्या माळी व्यक्तीने म्हंटले नाही की फ़ुलेंचा जयजयकार करा तरच जय शिवाजी म्हणू किंवा ब्राह्मणांनी शिवरायांना मानावं यासाठी परशुरामाचा जयजयकार बंधनकारक नाही, कारण सर्वांनाच शिवाजीचे विचार पाहिजे आहेत जात नकोय.तीच परिस्थिती मराठा समाजाची आहे.कोणत्या मराठ्याने कधी म्हंटल्याचे ऐकिवात नाही की सर्व जातीतील महापुरुषांना आम्ही मानतो तुम्ही जय शिवाजी म्हणा.तशी वेळच आली नाही कधी.म्हणून तर आज ते सगळे पुढे गेले आणि इतिहासापासून जे मागास होते ते मागासच राहिले.त्यामुळे याविषयी विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे की, आजपर्यंत जे केले तेच पुढेही करत रहाल तर पुढेही तेच मिळेल जे आजपर्यंत मिळाले.त्याचमुळे आजपर्यंत न मिळालेले मिळवायचे असेल तर ते करावं लागेल जे आजपर्यंत केले नाही.
  आज आंबेडकरी चळवळीविषयी जी तिरस्करणीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला आजचे महत्वाचे कारण म्हणजे आरक्षण.तसे पहायला गेले तर हे कारण आजचे नाहीच तर जुणेच आहे.सर्व प्रथम बाबासाहेबांना बाकी बहुजन समाजापासून दुर लोटण्यात आरक्षण काही अंशी कारणीभुत ठरले पण म्हणून आरक्षण नुकसानकारक आहे असे म्हणता येणार नाही.बाबासाहेबांनी मागासवर्गियांना आरक्षण दिले त्यामुळे आम्हाला शासकीय शिक्षण आणि नोकरीच्या संधी कमी झाल्या असा युक्तिवाद सवर्ण वर्गातून उमटत होता आणि आपल्या अशा दरिद्री परिस्थितीला बाबासाहेब आंबेडकरच जबाबदार आहे असे ग्रुहित धरून त्यांच्या विषयीचा द्वेष वाढत गेला.सध्या संभाजी ब्रिगेड सारख्या पुरोगामी सामाजिक संघटना ही परिस्थिती काहीअंशी बदलण्यात यशस्वी झाले आहेत.पण पुर्णत: परिवर्तन करणे अशक्य आहे.आज एक मागासवर्गिय ज्याचे घरचे वार्षिक उत्पन्न पाच लाख असणारा विद्यार्थी आठ-दहा हजारात व्यवसायिक शिक्षण पुर्ण करतो तिथेच हातच्या पोटावर जगणार्यांना मात्र लाख-लाख रुपये खर्च करावे लागतात त्याच शिक्षणासाठी.आरक्षणाचे लाभार्थी जातीच्या आधारावरच उदरनिर्वाह करत आहेत त्यामुळे त्यांना कोठे जातीय शोषणाला बळी पडावे लागले तर नवल वाटायला नको.कारण एकिकडे जाती संपवण्याच्या वल्गना करायच्या आणि दुसर्या बाजूला त्याच जातीच्या आधारावर उदरनिर्वाह करायचा हे अनाकलनीय आहे.
   वरील समस्या ह्या बर्याच समस्यांपैकी थॊडक्या आहेत.तरी याचा विचार व्हावा.निव्वळ विरोधाला विरोध न करता अभ्यास करावा.मुळात बौद्ध धम्म स्विकारलेल्या लोकांचे केवळ धर्मपरिवर्तन झाले आहे विचारपरिवर्तन झालेले नाही असे खेदाने म्हणावे लागेल.तसेच बाबासाहेबांची खरी पारख आजच्या आंबेडकरी चळवळीला झालेली नाही ही दुखा:ची बाब आहे.ज्यावेळी आंबेडकरी चळवळीला बाबासाहेबांच्या विद्वत्तेची,बुद्धिमत्तेची खरी ओळख होईल तेंव्हा चळवळ समाजाचे चांगले नेत्रुत्व करेल यात शंकाच नाही.तुम्हाला बाबासाहेबांनी मंत्र दिला आहे "शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा".मानवी शरीराला सोने बनविणारा पारस रुपी धम्म दिला आहे त्याचं पालन करा.मला डोक्यावर घेऊन नाचू नका,संघटित रहा संघर्ष करा,ऐक्य टिकवून ठेवा,वाघ बनुन जगा ही बाबासाहेबांनी शिकवण दिली.बाबासाहेबांनी सांगितलेल्या शिकवणीचं आपण किती पालन करतो तसेच बाबासाहेबांनी तुम्हाला काय संगितले आणि आपण त्यांच्या विचारांचे किती पालन करतोय याचं प्रत्येकाने आत्मपरिक्षण करा.डॉ.बाबासाहेबांच्या विचारांची कास धरा.एवढं जरी करता आलं तरी तुम्ही भिमाचे खरे अनुयायी म्हणण्यास पात्र आहात.
अभिजीत पाटील, कोल्हापूर.
मराठा । इतिहास । वारकरी । धर्म । अध्यात्म । तंत्रज्ञान । पुरोगामी । शेतकरी । राष्ट्रवादी

9 प्रतिक्रिया:

 1. भुषण विश्वनाथ शिंदेगुरुवार, १४ एप्रिल, २०१६

  पाटील साहेब तुम्ही म्हणता की डॉ.बाबासाहेबां सारखा महापुरुष इतिहासात कधी झाला नाही आणि यापुढेही होणार नाही ते एकमेवच जगाचे लोककल्याणकारी महापुरुष आहेत हा आंबेडकरी चळवळीचा गैरसमज आहे.यात गैर काय आहे सांगा ? खरच आहे ते आज आम्ही आहोत कारण बाबासाहेब होते म्हणून हे सर्वांनी मान्य केले पाहिजे.
  जय भिम जय शिवराय नमो बुद्धाय

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. बाबासाहेब होते म्हनून तुम्ही आहात पण बाकीच्या समाजाला काय फ़रक पडतोय बाबासाहेबांच्या नावाने.बाबासाहेबांच्या सर्व आंदोलनाचा फ़ायदा मागासवर्गियांना झालेला आहे.बाबासाहेब ज्यांना गुरु मानायचे ते महात्मा फ़ुले आणि ज्यांची जयंती दिवाळीसारखी साजरी करायला सांगितले ते शाहू महाराज यांचे नाव किती मागासवर्गिय घेतात ? महाराष्ट्र फ़ुले-शाहू-आबेडकरांचा म्हनून ओळखायचा की फ़क्त आंबेडकरांचा ?

   हटवा
  2. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नक्कीच महान होते त्यांना त्यांच्याच जातीच्या लोकांनी बदनाम केले आहे भिकारीसारखे राहून.बाबासाहेबांच्या कार्या बद्दल आम्हाला अजिबात शंका नाही किंवा वाद नाही पण आज मी बघत होतो भिमाच्या पोरी पण नाचत होत्या आणि बाकीचा समाज त्यांच्याकडे कुत्सित नजरेने बघत होता हेच चालत राहिले तर यांच्या समाजाविषयी तिरस्कार कायमच राहिल.

   हटवा
 2. खुप सुंदर लेख बर्याच दिवसांनी.आत्मपरिक्षण करण्यासारखा आहे खरच परिस्थिती आहे भिमप्रेमिंची.आज गावोगावी गाडीवर अशोक चक्र असते आणि एकच साहेब बाबासाहेब किंवा निळं वादळ असे लिहिलेले आहे पण गाडीच्या मालकाला बाबासाहेबांनी जयंती विचारली कि माहीत नसते किंवा बाबासाहेबांनी त्यांच्या साठी काय केले म्हणून विचारले तर तेही सांगता येत नाही.फ़क्त बाबासाहेब आमच्या महार जातीचे म्हणुन आपले मानायचे असे धंदे चालू आहेत.तसे कोणत्याही महापुरुषाच्या बाबतीत होत नाही.

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद संजय,खरं आहे ही परिस्थिती आहे सगळीकडे पण ती फ़क्त बाबासाहेबांपुरतीच नाही तर सगळ्याच महापुरुषांबाबत आहे.शिवरायांचा जयघोष करणार्या शिवसेनेच्या शाखा आहेत गावोगावी तसेच हिंदुत्ववादी संघटना आहेत.त्यांना तरी कॊठे शिवरायांविषयी काय माहीती आहे ? शिवजयंती आणी पुण्यतिथी काय देणं घेणं नाही.

   हटवा
 3. आज भिमभाईंना विरोध होण्याचे कारण त्यांचे राहणीमान आणि वागणुक आहे.ते एवढे शक्तीशाली आहेत की त्यांना त्यांची जात सांगण्याची गरज नाही कारण त्यांच्या बोलण्या-वागण्यातूनच जात दिसत असते.परवा आमच्या इथे एक लग्न झाले तर जय भिम वाल्या पोरी पण रस्त्यावर येऊन नाचत होत्या.ये-जा करणारे लोकं त्यांच्या कडे बघून आश्चर्य करत चेहर्यावरचे हावभाव बदलत एकप्रकारे त्यांची निंदाच करत होते.त्यांच्या बायका पण अशाच रस्त्यावर येऊन नाचत होत्या.अशा वागण्यामुळे त्यांना तिरस्काराला सामोरे जावे लागत होते.कोणत्याही भिम मोहोल्ल्यामध्ये जाऊन बघा किती घाण आहे सार्वजणीक संडास ब्लोक करून भर रस्त्याच्या कडेलाच बसतात त्यात पुरुषासोबत महिलाही खांद्याला खांदा लावून समानतेने रस्त्याच्या कडेलाच बसतात ही गोष्ट कारणीभुत आहे तिरस्काला.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. भारतीय जास्त अक्कल वापरत नसल्याचे समोर येते भिमराव आंबेडकर आणि राज्यघटना याविषयीचा अभ्यास केल्यास.राज्यघटना भारतीयाने बनवल्याचे सांगितले जाते पण ते सत्य आहे का ? कारण भारतीय राज्यघटना "भारत सरकार ॲक्ट १९३५" वर आधारीत आहे आणी ही ॲक्ट इंग्रजांनी बनवलेले आहे.फ़क्त याची भाषा बदलली आहे. इतर देशांचा अभ्यास करूनच भारतीतीय संविधान बनवलेले आहे.श्रीमदभगवत्गीता आणि मनुस्म्रुती ही संहिता आजतोवर मानन्यात आली आहे आणि आम्ही तीच माननार आहोत आम्हाला कॉपी-पेस्ट घटना मान्य नाही.
  जय रघुराज श्री राम जय यादवश्रेष्ठ श्री क्रुष्ण

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. bharatiy ghatna hi kahi copy paste nahi ahe, jagabharatil sarv ghatanancha sakhol abhyas karun bharatiy vatavaranala sajeshi tharanari banavleli ahe. mansana jatit batavanarya, Basaveshwar, Shivaji Maharaj, Sambhaji Maharaj, Tukobanche bali ghenari manusmriti khushal dokyavar gheun nacha, tumhala bharatiy ghatanechya pudhech zukav lagel.

   हटवा
 5. आंबेडकरांनी देशासाठी काय केले ते अजुनतरी कळायला मार्ग नाही.तरीही जय भिम

  प्रत्युत्तर द्याहटवा

टिप : "नाव/URL" च्या सहाय्याने प्रतिक्रिया देताना आपल्या नावासमवेत सामाजिक संकेतस्थळ (उदा. फ़ेसबुक,ट्विटर इ.) खाते जोडणे आवश्यक आहे.तरच प्रतिक्रिया प्रकाशित केली जाईल.तसेच अनामित प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाहीत.