९ मार्च, २०१४

रविवार, मार्च ०९, २०१४
21
सातशे संस्थानी अशी शक्ती । एक कोल्हापूरी शाहूमुर्ती ।
अलौकीक विलायतेत किर्ती ॥
जो निद्रिस्त महाराष्ट्राला । जागे करण्याला ज्ञानरवी झाला ।
शाहू छत्रपती सत्य आधार । मानवी जाणविले अधिकार ।
म्हणुन शाहू प्रभू शिव अवतार ॥
राजर्षी शाहू महाराजांनी सत्ता आणि संपत्ती ही एक सामाजिक द्रुष्ट्या नैतिक जबाबदारी आणि ठेव समजून आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या स्वभावातील मानवतेचे दर्शन त्यांच्या जीवनकार्यातून प्रेतीत होते.एकवेळ राज्य गेले तरी चालेल पण बहुजन उद्धाराचे कार्य मी कदापि सोडणार नाही.असे म्हणणार्या शाहू छत्रपतींची जयंती एखाद्या सण-उत्सवासारखी साजरी केली पाहिजे असा आर्त संदेश देऊन युगप्रवर्तक बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांचं स्थान स्पष्ट केलं.परंतू आज बहुजन समाजामध्ये आणि बहुजन चळवळ-संघटनेत सुद्धा मनुवादी निर्माण होत आहेत.याच तथाकथित बहुजनवादी संघटनांनी तर शाहू महाराजांचे नावच घेणं सोडून दिले आहे.काही तथाकथित पुरोगामी मंडळी तर फ़ुले-शाहू-आंबेडकर चळवळीला फ़क्त फ़ुले-आंबेडकर चळवळ संबोधून छत्रपती शाहू महाराजांना संपविण्याचा विडा उचलत आहेत.यांचे शाहूकार्य संपले आहे आता यांना शाहू महाराजांची गरज नाही असे यांचा समज आहे.याच बहुजनवादी संघटनांना छत्रपती शाहू राजांच्या बहुजनवादी कार्याचा विसर पडलेला आहे.गादी सोडेन पण बहुजन उद्धारांचे कार्य सोडणार नाही असे म्हणनार्या शाहू छत्रपतींचा समाजाला पडलेला विसर,त्यांचे कार्य घरोघरी न पोहचण्याचे कारण व त्यांचे बहुजनवादी कार्य याचा विचार करणं गरजेचं आहे.
आरक्षणाचे जनक
२६ जुलै १९०२ रोजी युरोप दौर्यावर असताना कोल्हापूरात छत्रपती शाहू महाराजांनी प्रसिद्ध केलेला जाहीरनामा म्हणजे बहुजन समाजासाठी आजवर कोणीही न केलेले उपकार होय.तो असा की सरकारी जागांमध्ये रिकाम्या झालेल्या जागांपैकी शेकडा ५० जागा मागासलेल्या लोकांस भराव्या.ज्या कार्यालयामध्ये मागासलेल्या वर्गाचे प्रमाण शेकडा ५० पेक्षाही कमी असेल तर पुढची नेमणूक ह्या वर्गातील व्यक्तीची करावी.असा जाहीरणामा मागासलेल्यांना सन्मानाने प्रशासनात आणून त्यांच्या गुणांना योग्य वाव देणारा आहे,असे कोणाला का वाटत नाही ? जर छत्रपती शाहू राजे मागासवर्गीयांना हल्ली कळले असते तर त्यांनी किमान शाहूंच्या विचारांचे अनुकरण तरी केले असते.पण हाच तो बहुजन समाज ज्यांच्यासाठी छत्रपती शाहू महाराज राज्य सोडायला तयार होते तोच समाज आपमतलबी बनताना पाहून कीव करावीसी वाटते.विचारांचे अनुकरण करायचे लांबच पण यांना राजे शाहूंचे नाव घ्यायची पण अडचण वाटू लागलीये ! 
          बहुजनांसाठी मुलांसाठी उभारलेली वसतीग्रुहे १८ एप्रिल १९०१ मध्ये शिक्षणात मागासलेल्या खेड्यापाड्यातील शेकडो वर्षापासून अज्ञानात पिचत पडलेल्या बहुजन मुलांसाठी छत्रपती शाहूंनी वसतीग्रुहाची स्थापना "व्हिक्टोरिया मराठा बोर्डींग" च्या नावे कोल्हापूरात प्रथम केली.वसतीग्रुहाला मराठा नाव असलं किंवा संस्थानही मराठ्यांचं समजलं जात असलं तरी फ़क्त मराठाच असा त्याचा अर्थ नाही.छत्रपती शाहूंच्या वसतीग्रुहात मुस्लिम,शिंपी,कोळी,माळी,गवळी असा बहुजन विद्यार्थ्यांचा भरणा होता.सोबतच १९०१ मध्ये जैन,लिंगायत, मुस्लिम, अस्प्रुश्य,सोनार,शिंपी,पांचाळ,गौड,सारस्वत,इंडियन ख्रिश्चन,वैश्य, ढोर, चांभार,सुतार, नाभिज,सोमवंशीय,आर्य,क्षत्रिय,कोष्टी अशी विविध जातीधर्माची वसतीग्रुहे छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन करून देखील बहुजनांच्या जातीतील किती टक्के बहुजन छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करतात याचे चिंतन होणे गरजेचे आहे.
अस्प्रुष्याच्या पंगतीत बसून जेवणारे शाहू :-
        शाहू महाराज हे केवळ मराठाच नव्हे तर सार्या बहुजन समाजात मिळून मिसळून राहत असे.अस्प्रुष्याच्या पंगतीत बसूण जेवन घॆत.त्यांच्या घरचे ,त्यांच्या हातचे पाणी पीत असत.शाहू महाराजांनी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करून नोकर्यांमध्ये आरक्षण दिले.ते एवढ्यावरही थांबले नाहीत तर महाराजांनी दुर्गम डोंगराळ भागात राहणार्या आदिवासी लोकांची सक्षम गाठीभेटी घॆतल्या व त्यांच्या अडीअडणींचे निवारणही केले.महारोग्यांची परिस्थिती पाहून राजांना दुख: होत असे.म्हणुन त्यांनी महारोग्यांसाठी दवाखाना सुरु केला.ते महारोग्याच्या जवळ बसून त्यांच्या प्रक्रुतीची, त्यांना मिळत असलेल्या औषदाची चौकशी करत असत.एवढेच नव्हे तर रोगमुक्त होणार्या रोग्यांना पोटापाण्याची व्यवस्था देखील करीत होते.राजर्षी शाहू महाराज लोकराजा या नावाने प्रसिद्ध झाले,त्यांना आपल्या रयतेची विशेष करून अस्प्रुष्य समाजाची जास्त काळजी वाटत असे,कारण अस्प्रुष्य समाजात त्यांची काळजी घॆणारा,त्यांच्या वेदना जाणणारा,त्यांना बरोबर घेऊन जाणारा कोणी दमदार पुढारी दिसून येत नसे.
छत्रपती शाहू आणि मुस्लिम समाज
         शाहू महाराज यांचे मुस्लिम प्रेम कदाचित मुस्लिम समाजात येवू दिले नाही वा मुस्लिम समाजासही समजले नाही.निदान मुस्लिम समाजाने यावर लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे.छत्रपती शिवरायांचा सर्वधर्मसमभाव हा छत्रपती शाहू महाराजांनी जोपासला.जगाच्या इतिहासात मुस्लिम समाजासाठीही प्रेम करणार्या लोकराजाने १९०६ मध्ये स्वत:च्या पुढाकाराने प्रमुख मुस्लिम मंडळांची सभा बोलावून मोहोमेडन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना करून मुस्लिम बोर्डींग सुरु केले.संस्थानातील दर्गे,मशिदी इ.धार्मिक स्थळांच्या खर्चातून उरलेला पैसा मुस्लिम समाजासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केला.या सोसायटीचे छत्रपती शाहू महाराज खुद्द पदसिद्ध अध्यक्ष होते.इतिहासात मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणारे छत्रपती शाहू महाराज कदाचित पहिलेच असू शकतील.मुस्लिमांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून शाहू महाराजांनी जोरदार प्रयत्न केले.मात्र मुस्लिम समाजाने या संधीचा फ़ायदा घेतला नाही.शिक्षण क्षेत्रात मुस्लिम समाज थंड राहिल्यावरही छत्रपती शाहू राजे मात्र थंड न बसता या समाजातील शिक्षणाची आवड असणार्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग मध्ये प्रवेश देऊन मुस्लिम शिक्षणास चालना दिली.
         मुस्लिम बोर्डिंग साठी चौफ़ाळाच्या माळावर पंचवीस हजार चौरस फ़ुटाची मोकळी जागा व इमारत बांधणीस ५५०० रु.ची भरगोस देणगी दिली व संस्थानच्या जंगलातून मोफ़त सागवान लाकूड दिले.मुस्लिम समाजातील मुलांनी शिकावे यासाठी भरभरून दान छत्रपती शाहू महाराजांनी दिले.मुस्लिम समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा सन्मान करणे प्रत्येक मुस्लिमांचे कर्तव्य नव्हे काय ? उर्दू शाळांमधून छत्रपती शाहू महाराजांचे कार्य जिवंत ठेवण्यास मुस्लिम समाजाने छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा अभ्यास करून हे कार्य जोमाने पुढे नेणे आता आवश्यक बनले आहे.
छत्रपती शाहूं विषयी खोटे प्रेम
           छत्रपती शाहूंचा गौरव करताना यशवंतराव मोहिते म्हणतात की "राजर्षी शाहू महाराजांना जातिभेदाच्या चौकटीत सर्व जातींना सहिष्णुतेने सामावून घ्यावयाचे नव्हते, तर ती जातिभेदाची चौकटच मोडावयाची होती.म्हणुन शाहू महाराज महाराष्ट्राचे गौतम बुद्ध होत."
         हल्ली आमच्या महापुरुषांचा वापर फ़क्त सत्तेसाठी आणि राजकीय समारंभापुरताच केला जातो.जसा हिंदुत्ववाद्यांनी शिवरायांच्या नावाचं भांडवल केलं.हिंदुत्ववाद्यांची दुकानदारी शिवाजी या एका नावाच्या पलीकडे जात नाही.संपुर्ण भारतात कोणतेही आंदोलन करताना श्री रामा चे नाव घेतात पण महाराष्ट्रात शिवरायांच्या नावाशिवाय काहीही चालत नाही हे या मंडळींना चांगलंच ठाऊक आहे.हे शाहूंच्या बाबतीत आहे.पण छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा फ़क्त खोटा आदर करणारे फ़ुले-आंबेडकरांचा तरी वारसा काय चालवणार ? डॉ.बाबासाहेबांच्या जीवनातील एक सच्चा मित्र म्हणजे राजर्षी शाहू महाराज.म्हणून तर बाबासाहेब म्हणतात "छत्रपती शाहू महाराजांसारखा सखा आम्हाला पुर्वी लाभला नव्हता व पुढे लाभेल की नाही याबद्दल मला शंका आहे."
           मुकनायक व्रुत्तपत्रामागे अर्थसहाय्य उभे करणे,माणगांव परिषदेत बाबासाहेबांना भारताचे पुढारी म्हणून गौरव करणे, सोनतळी कॅंम्पवर   बाबासाहेबांच्या  जेवणाचे  निमंत्रण  स्विकारून  कोल्हापूरी जरीपटक्याचा  भावपुर्ण  आहेर करणे,२६ जून १९२० ला बाबासाहेबांनी "मुकनायक" चा विशेषांक  काढून छत्रपती शाहू महाराजांबद्दल क्रुतज्ञता व्यक्त करणे ह्या सगळ्या ठळक घटनेवरून आपण लक्षात घ्यावे की महात्मा फ़ुलें मुळे शाहू महाराज तर शाहू महाराजांमुळेच डॉ.बाबासाहेब!या त्रिमुर्तींचा वसा आणि वारसा एकच होता.
          सामाजिक चळवळीत कार्य करणार्या बहुजनवाद्यांनी ही गोष्ट कायमस्वरुपी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.हिंदुत्ववादी तसेच टिळक कंपुतील मंडळी शाहू द्वेष्टी आहेत.यांना शाहू राजांच्या कार्याचे किंवा जयंतीचे काही देणे घेणे नाही.छत्रपती शाहूंना सुद्धा टिळक कंपुच्या प्रवाहाशी सोयरसुतक नव्हते.शाहू महाराज लढले ते ब्राह्मणेत्तर समाजाच्या उत्कर्षासाठी,बहुजन समाजासाठी! निदान बहुजनवाद्यांनी तरी शाहूंशी बेइमानी करू नये,अन्यथा याचे पातक भोगावे लागेल."शाहू महाराजांचा जन्मदिवस बहुजनांनी सणाप्रमाणे साजरा करावा असे ठासून सांगणार्या बाबासाहेबांचा तरी आदर करावा".राजर्षी शाहू महाराज हे फ़ुले आणि आंबेडकर यांना जोडणारा दुवा आहे शाहू महाराजांशिवाय फ़ुले-शाहू-आंबेडकर चळवळ पुर्णत्वास येणार नाही हे तरी लक्षात घ्यावे.
अभिजीत पाटील, कोल्हापूर.
मराठा । इतिहास । वारकरी । धर्म । अध्यात्म । तंत्रज्ञान । पुरोगामी । शेतकरी । राष्ट्रवादी

21 प्रतिक्रिया:

 1. मस्त लेख आहे खरंच आहे आज बहुजन समाज जागा होत आहे पण काही लोकं नुसतं आपले हित साधत आहेत.मनुवाद्यांच्या सांगण्यावरून आज ते शाहूंना नाकारत आहेत पण शाहू नसतील तर ही चळवळ बिनकामाची ठरेल.प्रत्येक महापुरुषांनी आपली जात धर्म बाजुला ठेऊन समाजाच्या उन्नतीचे कार्य केले आहे.हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
  जय मुलनिवासी

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. खरं तर महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे शिवरायांचा आणि शाहूंचा नुसता राजकारणासाठी उपयोग होतो जय शिवराय म्हंटलं की मराठे आलेच मागे हे सगळ्या जातीयवादी [हिंदुत्ववादी(ब्राह्मणवादी)] टोळक्यांना माहीत आहे.तसेच बहुजन समाजात शाहूंचे नाव घेतले तर सामाजिक चळवळीशी निगडीत शाहू प्रेमी आपल्या सोबत येतिल हाच विचार करून शाहूंचे नाव वापरण्यात येते.हे थांबवणे आपले काम आहे.निव्वळ या महापुरुषांचा नावाचा जागर करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा प्रसार करणे अत्यंत गरजेचे आहे.

   हटवा
 2. खरं तर आजपर्यंत राजकारणी म्हणा किंवा हे खोटे शिवभक्त मग ते बामनवादी असो नाही तर बहुजनवादी असो शिवरायांच्या विचारांनी चालणारे कोणीच नाही.एक म्हणतो मुस्लिम संपवा तर दुसरा म्हणतो बामन संपवा.हेच राजकारण सुरु आहे.शाहू राजांचा जीवावर जे आजपर्यंत मोठे झाले तेच आज त्यांचे नाव घ्यायला जाणुनबुजुन विसरतात.पण हे चळवळीला धोकादायक आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. आज महाराष्ट्र ज्या तीन थोर महापुरुषांची नावे क्रुतज्ञपणे घेऊन धन्य होतो.ते म्हणजे महात्मा फ़ुले-शाहू महाराज-बाबासाहेब आंबेडकर.आज फ़ुले-शाहू-आंबेडकर हे महाराष्ट्राचं वैचारिक आधिष्ठान झाले आहेत.स्वातंत्र्य,समता आणि बंधुता या ध्येय्याच्या सिद्धीसाठी या भक्कम अधिष्ठानाशिवाय पर्याय नाही.
  जय फ़ुले-शाहू-आंबेडकर

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. धर्मातील बामनशाहीला नष्ट करण्याचा त्यांचा महान प्रयत्न कोणीही विसरू नये.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. बडॊद्याचे "जाग्रुती" कार पाळेकर लिहितात,(टिळकांच्या)"केसरी" ने द्वेषाचे बीज पेरण्याचा जो क्रम चालवला आहे,त्याचं फ़ळ त्याला व त्याच्या जातबंधुंना खात्रीने भोगावे लागेल.आणि हे निश्चित होणार आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 6. आपला इतिहास हा पराभवाचा इतिहास म्हणून रंगवण्यात आला आहे.आपल्या समाजाला महात्मा फ़ुले -शाहूजी महाराज-बाबासाहेब यांच्या विचारांचा पाईक असणे गरजेचे आहे.आज प्रतिभावांत लोकांची समाजाला गरज आहे.आज आपल्या लेखणीमुळे जे प्रबोधन होत आहे त्यासाठी पुढील पिढी आपल्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही.आपल्या भावी वाटचालीस सुयश चिंततो.
  जय महाराष्ट्र जय भिम जय शिवराय

  प्रत्युत्तर द्याहटवा
 7. खरं आहे पाटील साहेब मी पण बर्याच वेळा अनुभवले आहे की हे बहुजन वादी म्हणवणारे शाहू राजाच नव्हे तर फ़ुलेंचं सुद्ध नाव घेत नाहीत नुसतं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.यामुळेच ही चळवळ नेस्तनाबूत होणार आहे एकदिवस.नुसतं जय भिम जय भिम म्हणून काही उपयोग नाही त्यापेक्षा किमान बाबासाहेबांचे तरी विचार घ्यावेत.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 8. लोकमान्य टिळक आणी शाहू महाराज यांच्या विषयी बर्याच लोकांच्या मनामध्ये भिन्न विचार आहेत की हे शत्रूच होते आणी हे असले विचार पसरवायला देखील बहुजन मंडळीच पुर्णत: जबाबदार आहेत.आपल्याला विनंती आहे की आपण चांगल्या गोष्टी समाजासमोर आणायला हव्यात.विद्वत्ता येते तेंव्हा जबाबदारी पण येते आपण शाहू राजे आणि टिळक हे किती कट्टर शत्रू होते हे लादत बसण्यापेक्षा त्यांचे वयक्तिक संबंध किती चांगले होते हे दाखवून देत रहा.यामुळेच बंधुता निर्माण होईल अन्यथा हा तिडा सोडविणे अवघड आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. लोकमान्य टिळक आणी शाहू महाराज यांच्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न राजोपाध्ये यांचे उत्पन्न जप्त केले त्या प्रकरणापासूण ब्रिटिशांनी केला.जी नीती त्यांनी हिंदू-मुस्लिम आणि ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर अशी दुफ़ळी पाडण्यासाठी भारतातील राजकारणार वापरली,तीच नीती महाराष्ट्रात वापरली.पुणे व कोल्हापूर यांचे जुळलेले संबंध याच कुटनीतीने यशस्वी होऊन १५ वर्षानंतर दुरावले.

   हटवा
 9. हिंदुत्ववादी शिवरायांचे नुसते नाव घेत नाहीतर तर विचार घेतात.आजपर्यंत आपल्या संभाजी ब्रिगेड ने काय केले किंवा मराठा सेवा संघाने काय कार्य केले लोकांसाठी ? याचा अभ्यास केला आहे का कधी.प्रत्येक मराठा हा हिंदू आणि हिंदुत्ववादी असतो.तुम्ही कितीही अमान्य करा.
  जयस्तु हिंदूराष्ट्र जय हिंदुराष्ट्रसेना जय शिवाजी जय भवानी

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. संशोधनाचा विषय तर हा आहे की हिंदुत्ववाद्यांनी आजपर्यंत काय केले ? ??? संभाजी ब्रिगेड किंवा मराठा सेवा संघ या संघटनेच्या तीस-चाळीस वर्षे आधीच्या असून देखील दोन टक्के पण परिवर्तन करू न शकलेल्या संघटना आहेत.शिवरायांचे विचार जर घेत असते तर एकही दंगल झाली नसती आजपर्यंत हेही महत्वाचे आहे.
   जय शिवराय

   हटवा
 10. टिळकांचे निधन झाले तेंव्हा लोकराजा जेवत्या ताटावरून उठले हे तुम्हाला माहीत नाही का ? तरीही तुम्ही टिळक कंपु आणि शाहूंना वेगळे केलेत.

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. ज्या टिळकांनी उभी हयात शाहूंच्या विरोधात घालवली त्या टिळकांच्या म्रुत्युनंतर मोठा माणूस गेला म्हणून जेवत्या ताटावरून उठणारे शाहू किती मोठ्या मनाचे असतील यावरून कल्पना करता येते.

   हटवा
 11. शाहू महाराज कायम म्हणायचे "अंग रगडून घेणे आणि बामनी व्रुत्तपत्रातील शिव्या खाणे" या दोन सवयी मला जडल्या आहेत.शाहू महाराज कट्टर ब्राह्मणद्व्वेषी होते त्यांनी भटांचं वर्चस्व नष्ट केलं जे कोणालाही जमलं नाही.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 12. लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज त्या युगातील थोर पुरुष.दोघांची तत्वे जरी वेगळी असली तरी आज दोघांच्याही विचारांची गरज आहे आपल्याला

  प्रत्युत्तर द्याहटवा
 13. हे फ़क्त शाहूंच्या बाबतीत झालय असं नाही आजपर्यंत सगळ्यात महापुरूषांच्या बाबतीत असे झाले आहे संभाजी ब्रिगेड तर प्रत्येक महापुरूष आपली खाजगी मालमत्ता असल्यासारखे वागतात.प्रत्येक महापुरुषाला जातीत बंदिस्त करण्याचे पाप त्यांनी केले आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 14. शाहू महाराजांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे.शाहू महाराज एक महान राजे होते.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 15. मराठा आणि प्रशासकीय ब्राम्हण(धार्मिक नाही) हे या दोन गोष्टी एक शक्ती दुसरी युक्ती एकत्र काम करतील तर जग जिंकणे मला वाटत नाही यापेक्षा वेगळं काय असेल.

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. मग बाकिच्या लोकांमध्ये शक्ती किंवा युक्ती ची कमतरता आहे का ?

   हटवा
 16. Narayn desai jara jatipath koni chalu kela aani pratek jatiche dew koni watun, vibhagun dilet he agodr paha aani natrch dusryana bola khar tar tumhala bolnyacha adhikarch dyayla nahe pahije je anyay atyachar tumi ajwar anya jatiwar kelet tich wagnuk aaj tumhala aani tumchya mulana dyayla hawi mag anubhav sanga aani ase selke shbdprayog karun bolayla jamat ka paha.ganesh pawar( solapur)

  प्रत्युत्तर द्याहटवा

टिप : "नाव/URL" च्या सहाय्याने प्रतिक्रिया देताना आपल्या नावासमवेत सामाजिक संकेतस्थळ (उदा. फ़ेसबुक,ट्विटर इ.) खाते जोडणे आवश्यक आहे.तरच प्रतिक्रिया प्रकाशित केली जाईल.तसेच अनामित प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाहीत.